पालथ्या घड्यावर पाणी


©️®️शिल्पा सुताररात्री झोपताना साक्षी तणावात होती. उद्या लवकर आवरल पाहिजे. किचन मधले भांडे तिने आधीच आवरले होते. ते सकाळी नीट लावावे लागतील. चादरी बदलाव्या लागतील. अजून काय काय काम आहे? ती उजळणी करत होती.प्रशांत, मीनु छान झोपलेले होते. हे बरे आहेत सुखी जीव. मला मात्र घरात ही सुख नाही. नेहमी जशी काही परीक्षा. काय करणार नशीब तस. ती झोपली.
मीनु पाच वर्षाची होती. ती शाळेत जायला रेडी होती. प्रशांत तीच आवरून देत होता. साक्षी किचन मधे भराभर हात चालवत होती. तिने त्यांचे डबे भरले. ऑफिसला जाण्याआधी तिला खूप काम होत.
“मीनु हे घे तुझी वाॅटर बॉटल. डबा पूर्ण खायचा. अक्षर नीट काढ.” तिने तिला जवळ घेतल.”साक्षी तू म्हणत असशील तर मी थोड्या वेळ घरी थांबू का? मीनुला सोडून येतो. आपण थोड्या वेळाने ऑफिसला निघू.” प्रशांत आशेने म्हणाला.तो काय म्हणतोय तिला बरोबर समजल. “आत्ता? नाही मला अजिबात वेळ नाही.””अस काय करतेस साक्षी आजच चान्स आहे. नाहीतर आपल्याला एकांत असा मिळत नाही. अर्धा तास फक्त. “” नाही जमणार. “” साक्षी प्लीज. “” नाही हो, खूप काम बाकी आहेत. तुम्हाला काय? मलाच किती बोलणी ऐकावी लागतात. एका तासात सगळं व्हायला हवं. नाहीतर ऑफिसला जायला उशीर होईल. मग परत लेट मार्क लागेल. ” ती बोलत पटापट आवरत होती.प्रशांत तयार झाला.” मी निघतो मग.”हो. तिला वाईट वाटलं.काय करू. थांबवून घेवू का यांना. ते नाराज तर नाहीत ना. माझी धावपळ होईल पण. नको यांना ही काय कामाच्या वेळी सगळं सुचत. रात्री आरामात झोपून घेतल.प्रशांत ऑफिसला गेला. साक्षी भराभर आवरत होती. तिला खूप टेंशन आल होत. तिने नाश्ता ही केला नाही. कारण तस होत प्रभा ताई आज गावाहून येणार होत्या. तिच्या सासुबाई. तश्या त्या इथेच रहायच्या. आत्ता चार दिवस त्यांच्या गुरूंच्या आश्रमात गेल्या होत्या. सोबत मावशी होत्या. तिथे मोठा सत्संग होता.
आता दुपार पर्यंत येतील मग घराकडे बघून अशी चिडचिड सुरू करतील. हे झाल नाही, ते झाल नाही, इथे घाण, हे आवर ते आवर. किती हि आवरल तरी त्यांना अस वाटत की मी नसतांना हिने काहीच केल नाही.खर तर त्यांच्या या स्वभावाला साक्षी कंटाळली होती. तिकडे देव देव करायच आणि घरी येवून आम्हाला त्रास द्यायच, हेच शिकवतात का तिकडे? मी टीव्ही वर बघितल होत इतक छान मार्गदर्शन करतात. सगळं सांगितलेल कुठे जात मग?ह्या सासुबाई ते आचरणात का आणत नाहीत? तिथे काही ऐकता नाही की काय? स्वार्थ सोडा परमार्थ साधा. दुसर्‍याला त्रास होईल अस वागू नका. संसारातल मन थोड काढून घ्या.पण इथे तर उलट आहे. अतिशय खराब स्वभाव, अप्पलपोटी पणा. स्वतःवर अति प्रेम. मुलगा नात ही दिसत नाही. त्यानाही पाण्यात बघतात. का जातात मग सत्संगाला. वागण तर बदलत नाही.
मीनुला ही सांभाळत नाहीत. शाळेनंतर ती पाळणाघरात रहात होती. साडे पाचला फिरून येतांना प्रभा ताई तिला घरी घेवून यायच्या.साक्षीचा स्वयंपाक झाला. पोळ्या करुन ठेवल्या . तिने घर झाडल, फर्शी पुसली. फर्निचर पुसल. किचन मधे भांडी नीट लावली. खूप आवरा सावरी सुरू होती.ती ऑफिस मधे आली. बापरे मी किती थकली. बाकीच्या मैत्रिणी सोबत ती चहा साठी गेली.”काय झाल साक्षी? आज खूप थकली आहेस .” बाकीच्या मैत्रिणी हसत होत्या.”अग याला काही गोड कारण नाही. मी घरकामाने दमली आहे.” ती ही हसत म्हणाली.”काय झालं नक्की?”” नेहमीच ग, आज आई सत्संगाहून वापस येतील. खूप आवरल तरी त्यांचा ओरडा असतो. मला ना नुसत धडधड होत आहे. “साक्षी म्हणाली.”हो ना ओरडतात ना. काहीही केल तरी तुला बोलणी बसतात. मग करत जावु नको. “एक मैत्रीण म्हणाली.
“अस म्हणायला सोप असत ग, वागायला अवघड. मला जमणार नाही.” साक्षी म्हणाली ते खर होत. अतिशय साधी भोळी साक्षी कोणालाही कधीच उलटून बोलत नव्हती की भांडत नव्हती. ती भले की तीच काम भले. पण अश्या लोकांचा सगळे गैरफायदा घेतात. होईल तितका त्रास देतात.

पालथ्या घड्यावर पाणी भाग 2©️®️शिल्पा सुतारपण अश्या साध्या लोकांचा सगळे गैरफायदा घेतात हे मैत्रिणीला माहिती होत. ” तू थोडा तरी स्वतः चा विचार कर साक्षी. ऑफिस ही, घरकाम ही. अति होतय. परत शाबासकी नाही. नेहमी तोंड वाकडे. “”घरच्या सुनेला शाबासकी दिली तर कस होईल? देता आला तर अजून त्रास देतात त्या. ” साक्षी म्हणाली. त्या जागेवर येवून बसल्या. ऑफिस काम सुरू झाल.
तिला एकदम प्रशांत आठवला. आज मी सासुबाईं साठी यांना नाराज केल. यापुढे अस करायच नाही. सगळ्यांच होत मग त्यांच्या वेळी मी कंटाळा करते. तिने त्याला सॉरीचा मेसेज पाठवून दिला.
दुपारी प्रभा ताई, मावशी दोघी आल्या. प्रभा ताई घरात सगळीकडे फिरून बघत होत्या.” काय झाल ग?” मावशीने विचारल.”घर कस करून ठेवल आहे बघ.””कुठे काय? छान आवरल की.” मावशी सोफ्यावर बसत म्हणाली.”किचन मधे ही बघ भांडी तशीच आहे.” प्रभा ताईंनी नाक मुरडल.
“एक डिश, कप बशी आहे. ठीक आहे ना. उशीर होत असेल साक्षीला. नोकरी करते ती. कितीही आवरल तरी थोड रहातच.”दोघींनी जेवून घेतल. भांडी तशीच किचन मधे ठेवली.” आण मी आवरते. ” मावशी म्हणाल्या.” पडू दे ग.””तुला आवडत नाही ना भांडी राहिलेली. आता तू साक्षीला बोलत होती ना प्रभा ताई. ” मावशी आश्चर्याने बघत होती.” म्हणजे दुसर्‍या साठी नियम वेगळे स्वतः साठी वेगळे अस आहे का ताई तुझ? निदान तू दुसर्‍याला शिकवते तस वाग तरी.” मावशी म्हणाली.दोघींनी आराम केला.टी ब्रेक मधे साक्षीने प्रशांतला फोन लावला.” बोला काय सुरू आहे मॅडम?” तो नेहमी प्रमाणे प्रेमाने म्हणाला.” अहो तुम्ही नाराज आहात का? “” तुझ्यावर नाराज होवुन कस चालेल. काय झाल पण आज तुला साक्षी? तुझी काय धावपळ सुरू होती? ” त्याने विचारल.” दुपारी तुमची आई, मावशी येणार आहेत ना आज. बहुतेक आल्या असतिल.”” मग?”” मग काय आवरत होती. ऑडिट आहे माझ. ” ती हसत म्हणाली.” तू ही ना काय टेंशन घेते? आई काय नेहमी बोलत असते.” प्रशांत सहज म्हणाला.
“तुम्हाला नाही समजणार ते. ज्याला त्रास होतो ना तो बरोबर घाबरून असतो. लवकर घरी याल का प्लीज. मला तुमचा सपोर्ट हवा आहे. “” हो येईल काही आणायच का? “” नाही मी घेईन. अहो मी तुमच्या सोबत वेळ घालवायचा प्रयत्न करेन. ” साक्षीने खरतर या साठी फोन केला होता.”ठीक आहे ना साक्षी. इतक काही झाल नाही. जरा रीलॅक्स रहात जा. तू नेहमी इतकी का घाबरते? त्यामुळे सगळे तुला त्रास देतात. तुझ्या भोळे पणाचा फायदा घेतात. किती वेळा सांगू तुला.”” अहो चिडू नका ना. “” चिडत नाही. पण मी काय म्हणतो त्याचा विचार कर. लवकर येतो.”तिने फोन ठेवला.संध्याकाळी साक्षी ऑफिस मधून निघाली. काय होईल घरी जावून काय माहिती? तिला टेंशन आल होत. तिने मीनुला घेतल. दुकानातून एक दोन भाज्या घेतल्या. कोशिंबीर साठी काकडी घेतली, दही घेतल, गुलाबजाम घेतले. मीनु खूप बोलत होती. साक्षीच लक्ष नव्हतं. दोघी घरी आल्या.साक्षी.. प्रभा ताई, मावशींना भेटली.”कशी आहेस साक्षी? ऑफिस काय म्हणतय?” मावशी म्हणाल्या.”नेहमी प्रमाणे छान सुरु आहे.”” हुशार ग तुम्ही आजकालच्या मुली.””चहा टाक ग बाई. लवकर लाग स्वयंपाकाला. सकाळच गार जेवण काही घश्या खाली गेल नाही.” प्रभा ताई पाय दाबत मोठ्याने म्हणाल्या .हो.”साक्षी अग छान होती दुपारची भाजी. प्रभा ताई काहीही काय बोलतेस. “साक्षी आत गेली.मावशी मीनु सोबत बोलत होत्या. साक्षी चहा घेवून गेली.” किती पसारा करून ठेवला घरात. माझ्या कपाटाला कोणी हात लावला? ” प्रभा ताई ओरडल्या.
” कोणी नाही आई. आम्हाला काय काम त्यात. ” साक्षी घाबरली, हे काय आता नवीन.”नुसत उचक पाचक करून ठेवल. घरात ही जिथे बघाव तिथे पसारा आहे. मी दोन दिवस कुठे गेली तर घराचा उकिरडा करून ठेवला.”” आई मी रोज आवरत होती.” साक्षीचा चेहरा उतरला. ती स्वयंपाकाला लागली.बाहेर प्रभा ताईंनी देवाला दिवा लावला, श्लोक म्हणत त्या फर्निचर पुसत होत्या. आत येवून त्यांनी तेला तुपाचे भांडे पुसले. मांडणीवरचे भांडे उगीच इकडे तिकडे केले. त्यांची बडबड सुरू होती.

©️®️शिल्पा सुतारप्रशांत ऑफिस मधून आला. अपेक्षित होत तस वातावरण होत. साक्षी घाबरून स्वयंपाक करत होती. प्रभा ताई तिला त्रास द्यायची एक ही संधी सोडत नव्हत्या.तो आवरून आला. मावशी सोबत बोलत बसला. थोड्या वेळाने साक्षीने आवाज दिल्यावर त्याने मीनुने जेवणाचे पान घेतले. साक्षी ताट करत होती.
मसाले भात, भरली भेंडी, कोशिंबीर, पोळ्या, गुलाबजाम पापड तळलेले.
“अरे वाह साक्षी अग किती करतेस तू?” मावशी म्हणाल्या.साक्षी खुश होती. “बसा जेवायला.””खूप छान झाली भाजी.” प्रशांत म्हणाला.”हो आई माझी फेवरेट भाजी.” मीनु खुश होती.”पुढच्या वेळी जरा तिखट मीठ व्यवस्थित घाल साक्षी. भेंड्या वाफवू दे. आहे तस कच्च पक्क खायचं.” प्रभा ताई म्हणाल्या.प्रशांत साक्षी कडे बघत होता. तिने मुद्दाम त्याच्या कडे बघितल नाही. ती कमजोर पडली असती.सगळ आवरून ती प्रशांत जवळ येवून बसली. जरा गप्प गप्पच वाटत होती.”तुला एक गोष्ट माहिती का साक्षी, लोक घोड्यावर ही बसु देत नाही आणि पायी ही चालू देत नाही. “” हो माहिती आहे.” ती म्हणाली.” याचा अर्थ काय? “”की आपण काहीही केल तरी लोक समाधानी नसतात. त्या पेक्षा स्वतः च्या मनाप्रमाणे करावे.” साक्षीने सांगितल.”समजल ना.” त्याने विचारल.”हो. अहो पण मला नाही जमणार हे. आईं समोर मी घाबरून जाते. “”मी किती दिवस तुझी बाजू घेणार? त्या पेक्षा तू ठरव काय करायच ते. ” प्रशांत नेहमीच तिला सपोर्ट करत होता.
हो. ती त्याच्या जवळ बसुन विचार करत होती.” आईं समोर माझा कॉन्फिडन्स डळमळीत होतो. अस वाटत काही येत नाही. “
” साक्षी अगदी उलट सुलट नाही पण थोडं तरी बोलल पाहिजे. ऑफिस मधे कस आपण आपली बाजू धरून ठेवतो. प्रसंगी बोलतो. हे असच आहे. तू काही म्हटली नाही तर नेहमी तूच दोषी अस होईल.””अहो पण हे घर आहे, ऑफिस नाही प्रुव्ह करायला. इथे सगळ्यांनी एकमेकांना समजून घेतल पाहिजे. मला नाही आवडत अस.”” तू राहू दे मी बघतो. तू आज पासून आई पासून दूर थांब. त्रास करून घेवू नकोस. आईला ही किती वेळा सांगा अस वागू नको म्हणून तरी ती त्रास देते . “त्याने साक्षीला जवळ घेतल. ती त्याच्या जवळ अगदी खुश होती. देवाचे आभार निदान नवरा तरी चांगला दिला.सकाळी नेहमी प्रमाणे साक्षी डबा करत होती. एकीकडे चहा होत होता. प्रभा ताई नेहमी प्रमाणे उठून आंघोळ करून रेडी होत्या. त्या देवपूजेला बसल्या.” साक्षी फुल दे पाणी दे, कपडा दे. “तिने प्रशांतला ते काम सांगितल. काहीही करा म्हणा आता. मी असच करेन. या आईंशी जास्त बोलायच नाही. त्यांचा मुलगा त्यांना नीट करेल.प्रशांत मीनुच आवरत होता. “थांब आई. तुला तुझ काय लागत ते घेवून बसता येत नाही का?”
प्रभा ताई बर्‍याच वेळ तश्याच बसल्या होत्या. नंतर त्यांनी त्यांच्या हाताने वस्तु घेतल्या. तरी त्यांच लक्ष सगळं किचन मधे होत.मावशी किचन मधे आल्या.”तुम्ही चहा घेता का मावशी?” साक्षीने विचारल.”हो तू कर पोळ्या मी घेते गाळुन.””चहात मसाला टाक साक्षी.” प्रभा ताई देवाचे फोटो पुसत म्हणाल्या.”टाकला आहे.” मावशीने उत्तर दिल.मावशी, साक्षी काय बोलता आहेत ते प्रभा ताई वाकून बघत होत्या. आता त्या पोथी वाचत होत्या.प्रशांत, मीनु, साक्षी, मावशी किचन मधे चहा घेत होते.” चल आई. “” मी पूजा झाल्या शिवाय काही खात नाही. माहिती नाही का तुला?””टोस्ट घ्या मावशी. ” साक्षी म्हणाली.” हो तू घे ना.””साक्षी त्या नानकटाई दे ना.” प्रशांतने आवाज दिला.”हो हे खावून बघा मावशी.””साक्षी आता तुम्ही घेता आहेत तर मला ही जरा अर्धा कप चहा दे. रात्री विशेष जेवण झाल नाही तर पोटात खड्डा पडला आहे. भेंडीची भाजी मला अजिबात आवडली नाही. ” प्रभा ताई मधेच म्हणाल्या.”आई आता दुसरा दिवस सुरू झाला आहे. कालची भेंडी पचली. पुरे आता. मावशी तू बघते ना? अस आहे इथे. ” प्रशांत चिडला.” तेच तर, साक्षीच करण चांगल आहे. तस ही कोणीही शंभर टक्के पर्फेक्ट नसत. “” कोण सांगेल पण. “

©️®️शिल्पा सुतारमीनु तयार होवुन हॉल मधे बसली होती.” मीनु काय आहे तुझ्या डब्याला?” प्रभा ताईंनी आरती म्हणत विचारल.प्रभा ताईंना माहिती होत मीनु साठी छान पदार्थ होतो.” आजी पोळी भाजी आहे. आज आईला वेळ नाही. “” हो का नाहीतर काय करते तुझी आई वेळ नसायला इकडचा डोंगर तिकडे.”प्रभा ताई कडवटपणे म्हणाल्या.”प्रभा ताई तुझ देवाकडे सोडून सगळीकडे लक्ष आहे. आरती तरी नीट कर .” मावशी म्हणाली.मीनु हसत होती.त्या चिडल्या. देवपूजा झाली.”नाश्ताला काय आहे साक्षी?”साक्षी आत आवरत होती. ती बाहेर आली नाही.साक्षी….” तयार आहे सगळं. घे ना तिला उशीर होतो. ” मावशी म्हणाली.त्या किचन मधे आल्या उपमा होता .” मला अजिबात आवडत नाही. रवा अजून भाजायला हवा होता.”साक्षी आवरून आली. “अहो चला.””तू नीघ साक्षी. मी थोड मावशी सोबत आहे . हाफ डे जातो.” प्रशांत म्हणाला.साक्षी ऑफिसला गेली. मावशी, प्रशांत नाश्ता करत होत्या.
“अरे प्रशांत तू चहा घेणार का? करते जरा छान. नाहीतर त्या साक्षीच्या हातच्या पांचट चहाने मन भरत नाही.” प्रभा ताई किचन मधे जात म्हणाल्या.
“आई तू चहा करते ते ठीक आहे, पण त्यासाठी साक्षीला का मधे बोलते. इतकी घाण सवय आहे ना ही.” प्रशांत मावशी कडे बघत म्हणाला.”बरोबर आहे. मी पण काल पासुन बघते आहे. प्रभा ताई काय आहे हे? हे बघ तुला एकच मुलगा आहे. इथेच राहण आहे. का तणाव वाढवतेस? प्रेमाने सगळ्यांना सांभाळून रहा ना. मोठी आहेस ना तू. इतके दिवस सत्संगात काय शिकलो आपण? त्रासदायक वृत्ती सोड ना.”आई मला अस वाटत या पुढे तू तुझ करून घेत जा. तुला कोणत्याही गोष्टीत समाधान नाही. आमच पण जगण मुश्किल करून ठेवल आहे. हिच्या अश्या वागण्याने ती साक्षी नेहमी तणावात असते .” प्रशांत म्हणाला. खर तर आज तो हेच बोलायला घरी थांबला होता. “मावशी, आईला समजून सांग ना थोड.”प्रभा ताई त्याच्या कडे बघत होत्या. “चार दिवस काय मी बाहेरगावी गेली तर तू तिच्या बाजूने बोलायला लागला आहेस. नक्की काय आहे हे?”
“आज पहिल्यांदा सांगतो का मी हे आई? नेहमी बोलतो ना मी तुला की साक्षीला त्रास देवू नकोस. तू ऐकतच नाही. ती भोळी आहे. कोणाला कधी काही बोलत नाही. म्हणून तिच्या बाजूने मी बोलतो. आता का वाईट वाटल तुला आई? तरी मी तुला हे हळू आवाजात सांगतो आहे. तु अस कित्येक वर्ष झाले सगळ्यां समोर साक्षीला बोलतेस. अस असेल तर मी साक्षीला घेवून दुसरीकडे रहायला जाईल. “” प्रशांत अरे अस दुसर टोक गाठू नकोस.” मावशी म्हणाल्या.” मग काय करू मावशी? किती वेळा हिला सांगा. साक्षीला माझ्या शिवाय कोण आहे. तिला घरात चांगल वाटायला नको का? ” प्रशांतच बरोबर होत घर सगळ्यांच असत. तिथले रहाणारे लोक कंफर्टेबल हवे. पण होत काय, कोणी तरी एक त्या घरावर सत्ता चालवत आणि दुसर्‍याला त्रास देत. हे चुकीच आहे.” बरोबर आहे तुझ. प्रभा ताई आता तरी नीट वाग एवढ सुनेच्या मागे नको लागत जावू. बरोबर करतात पोरी. ” मावशी समजावत होत्या.” आपणही तरुण होतो की, असायची का एका तरी कामातून सुटका. आपली नाही कोणी बाजू घेतली. उलट प्रत्येकाने दोन शब्द ऐकवले. ” प्रभा ताई जुन्या गोष्टी आठवत म्हणाल्या.” म्हणून तू आता साक्षीला मोकळीक मिळू देत नाही का? आता काळ बदलला आहे. जुनी रीघ ओढु नको. तुला वाटत का तुझ्या सासुबाई विषयी प्रेम?” मावशीने विचारल.नाही. प्रभा ताई म्हणाल्या.” तस साक्षीच होईल. तुला काही झाल तर ती कर्तव्य म्हणून करेल. पण नंतर पडून राहशील एका कोपर्‍यात. जवळ बोलवलं तरी कोणी येणार नाही.आता आपण सत्संगात काय ऐकल. वेळेत संसारातून मन काढून घ्या. मुलांना निर्णय घेवू द्या. अतिरेक नको ना ताई. नाहीतर तू एकटी पडशील. आणि तु मीनुला का सांभाळत नाही? ती का पाळणाघरात जाते?” मावशीने विचारल.” अग अडकल्या सारख होत. कुठे जाता येता येत नाही. देवळात भजनाला. “” नाहीतरी अस भजनातुन तू काय शिकते आहेस? जरा माणसात देव बघत जा. त्यांच्याशी तू तुटक वागतेस. इतक देव देव करून काय उपयोग? आणि अस वागल, मुलांना नाही सांभाळल तर आपला घरासाठी काय उपयोग. साक्षी सहा वाजता येते ना. त्या नंतर जात जा.”बघू. प्रभा ताईंना मावशीचा विचार आवडला नाही.

पालथ्या घड्यावर पाणी भाग 5 अंतिम©️®️शिल्पा सुतारसाक्षी संध्याकाळी घरी आली. प्रशांत आणि मावशी घरी नव्हते. कुठे गेले हे काय माहिती?मीनु बाहेर खेळत होती.” आई काय भाजी करू?” तिने प्रभा ताईंना विचारल.” कर तुला करायच ते. ” प्रभा ताई रागात होत्या.”मीनु काय करू ग? “” आई पुरी कर.””ठीक आहे श्रीखंड पुरी करू. ” तिने प्रशांतला फोन लावला. “कुठे आहात तुम्ही?””येतो आहोत. मार्केट मधे आहे मावशीला थोड सामान घ्यायच होत. “

” मावशींना साडी घ्या. आणि येतांना श्रीखंड घेवून या. “हो.ती काय बोलते ते प्रभा ताई ऐकत होत्या.”आई आज बटाट्याची भाजी करते. पुरी करू का? “” काहीही कर. ” त्यांना राग आला होता.” काय झाल आई?””बाई तू सगळ्यांची लाडकी. तुला काही बोललं की सगळ्यांना राग येतो.” त्यांनी परत टोमणा मारला.”आई मी स्वतः तुम्हाला काही बोलते का? तुमच तुमच्या मुलाशी भांडण होत. तुम्ही तो राग माझ्यावर काढतात. तुम्हाला काय वाटल मला बोलता येत नाही का? ऑफिसमध्ये अर्धा एक तासाची मीटिंग घेते मी. तुमच्यासमोरच काही बोलत नाही कारण मी तुम्हाला मान देते.
मी जर बोलायला लागली ना तर तुम्हाला या घरात राहणं मुश्किल होईल. जेवढ माझं आहे त्याच्यापेक्षा जास्त हे घर तुमचं आहे. आपण आनंदाने न भांडता राहू शकतो का या घरात?
मला माहिती आहे तुम्हाला चांगल वागायची सवय नाही. पण प्रयत्न करा. जमेल तुम्हालाही.अगदीच मला मुलगी मानू नका. पण एक माणूस म्हणून तरी माझ्याकडे बघा. नेहमी तिरकस बोलणे टाळून एखाद्यावेळी प्रेमाने हो नाही म्हणून बघा.शेजार पाजारच्यांशी सुद्धा आपण नीट वागतो आणि जिच्या बरोबर आयुष्य काढायचं असतं त्या सुनेशी आपण फटकून वागतो. हे कितपत योग्य आहे? “प्रभा ताई काही म्हटल्या नाही.” तुम्हाला माहिती आहे का तुमचा मुलगा मला किती वेळा म्हटला की आपण सेपरेट राहू. पण मीच दरवेळी नाही म्हणते. मला तर ते सहज शक्य आहे. माहिती आहे लोक नाव ठेवतील पण आम्ही काय सहन करतो ते आमचं आम्हाला माहिती.त्यामुळे आत्ताच प्रेमाने सांगते जरा व्यवस्थित वागा. रोज उठून तुम्हाला बोलायला मला आवडत नाही. पण यापुढे मात्र तुम्ही तिरकस बोलल्या तर याचे परिणाम काय होतील तुम्हीच विचार करून ठेवा.मीना ही भेटली होती आज. ती विचारत होती तुमच्या बद्दल. ” साक्षी किचनमध्ये निघून गेली.मीनाच नाव ऐकुन प्रभा ताई पहिल्यांदाच एवढ्या गप्प झाल्या होत्या. मीना पोलीस इन्स्पेक्टर होती. साक्षीची मैत्रिण.जरा वेळाने मावशी आणि प्रशांत बाहेरून आले. सगळे आनंदाने जेवायला बसले. प्रभाताई बऱ्यापैकी शांत होत्या. जेवणात खोट काढली नाही.दुसर्‍या दिवशी मावशी घरी गेल्या.आता या गोष्टीला महिना झाला थोड्या प्रमाणात त्रास द्यायचा चालू असतं प्रभाताईंचं. पण ते सहन करण्यासारख आहे.इतक्या वर्षाचा खराब स्वभाव लगेच कसा नीट होईल? तरी त्या बऱ्यापैकी प्रयत्न करत असतात. त्यांच्या मनात भीती होती की हे दोघेच वेगळे राहायला गेली तर मी एकटी पडेल. दुसऱ्यासाठी नाही तरी स्वतःसाठी त्या व्यवस्थित वागत होत्या.”साक्षी पुढच्या महिन्यापासून मनूला पाळणाघरात ठेवू नको.” त्या म्हणाल्या.”नाही आई. तिला पाळण्या घरातच राहू द्या. अजून दोन-चार वर्षांनी ती थोडी कळती होईल. मग शाळेतुन घरी येईन. तुम्हाला त्रास नको. तिथे तिचा अभ्यास होतो. ट्युशन लावलेली आहे.” साक्षी म्हणाली.प्रभाताई विचार करत होत्या साक्षी कोणालाच तिचा त्रास होऊ देत नाही. यापुढे जमलं तर आपणही थोडसं सांभाळून घेऊ.जमेल बहुतेक प्रभा ताईंना. कोणतीही गोष्ट अवघड नसते. मनापासुन ठरवल की झाल. नाहीतर कितीही चांगल्या गोष्टी शिकल्या आणि त्या प्रमाणे वागलं नाही तर मग काय? पालथ्या घड्यावर पाणी.

5 thoughts on “पालथ्या घड्यावर पाणी”

  1. Howdy! Do you know if they make any plugins to assist
    with Search Engine Optimization? I’m trying to get my blog
    to rank for some targeted keywords but I’m not seeing very good success.
    If you know of any please share. Thanks! I saw similar blog here: Backlink Building

    Reply
  2. Wow, awesome blog format! How long have you ever been running
    a blog for? you made running a blog glance easy. The full look of your site is
    wonderful, as well as the content! You can see similar here
    sklep online

    Reply
  3. Wow, fantastic weblog layout!
    How long have you ever been blogging for? you make running
    a blog look easy. The full look of your website is fantastic, as neatly as the content material!
    You can see similar here prev next and those was wrote by Alane99.

    Reply
  4. Howdy! Do you know if they make any plugins to help with Search Engine Optimization? I’m trying to get
    my site to rank for some targeted keywords but I’m not seeing very good
    gains. If you know of any please share. Thank you!
    You can read similar blog here: Best escape rooms

    Reply

Leave a Comment