पट्टी-2

एखादी गळाला लागली तर तिला फूस लावून फिरवत असे, तिचा फायदा करून घेत असे,

हे सगळं करताना कुणाला समजणार नाही याची पुरेपूर काळजी तो घ्यायचा,

आईला वाटायचं मुलगा किती कष्ट करतोय, दिवस दिवस बाहेर असतो,

पण बायकोला हळूहळू त्याचं आकलन व्हायला लागलं होतं,

तिला त्याची प्रत्येक हालचाल संशयास्पद वाटायची,

एकदा त्याच्या बॅगेत महागडी लिपस्टिक तिला सापडली,

तिने जाब विचारला तेव्हा तो म्हणाला,

“अगं ऑफिसमध्ये एका कलिग चा वाढदिवस आहे तर तिच्यासाठी घेतलं आहे”

तिला सुरवातीला खरं वाटायचं,

नवरा बायकोमध्ये विश्वास हवा याला धरून ती बऱ्याच गोष्टी दुर्लक्ष करायची,

खूपदा वाटायचं की सासूबाईंना सगळं सांगावं,

पण त्यांना उगाच त्रास व्हायचा, असा विचार करून ती टाळायची,

एके दिवशी एक विचित्र घटना घडली,

तिथल्याच एका रेडलाईट एरियामध्ये छापा पडला होता,

अवैध मद्यविक्री आणि अवैध धंदे तिथे सुरू होते,

त्याच दिवशी तो रात्री उशिरापर्यंत बाहेर होता,

त्याचा फोन लागत नव्हता,

रात्रभर बायको आणि त्याची आई काळजीत होत्या,

दुसऱ्या दिवशी दोन माणसं तिच्या नवऱ्याला उचलत घरी घेऊन आली,

आई त्याला बघून रडायलाच लागली,

“काय झालं? काय झालं याला?”

“कशाला एवढी काळजी दाखवताय? काळजी करण्याच्या लायकीचा माणूस नाही हा…त्या रेडलाईट एरियात हा दारू पिऊन एका खोलीत एकीसोबत पडला होता, पोलिसांनी छापा टाकला. सगळेजण पळून गेले, हा कसातरी उठला आणि मागच्या बाजूला एका कोपऱ्यात पडला, पोलिसांचं लक्ष गेलं नाही ते नशीब. आज सकाळी आम्ही याला असं पडलेलं पाहिलं, याच्या पाकिटातून पत्ता मिळवला आणि आलो. हे घ्या पाकीट आणि त्याचा मोबाईल..”

“तुम्ही लोकं खोटं बोलताय, माझा लेक असं करूच शकत नाही. माझ्या लेकाला अडकवताय तुम्ही..”

“घ्या, ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं, उगाच उचलून आणलं याला, पडू द्यायला हवं होतं तिथेच..”

बायकोने धीराने घेतलं,

“त्यांना खूप धक्का बसलाय, त्यांचं मनावर घेऊ नका, तुमचे खूप खूप आभार..”

बायकोने त्यांचे आभार मानले,

नवऱ्याला खोलीत नेलं, अंघोळ करायला सांगितली, त्याचं डोकं अजूनही जडच होतं आणि त्याला काही सुचत नव्हतं..

त्याचा मोबाईल बाहेर होता,
*****


1 thought on “पट्टी-2”

Leave a Comment