पट्टी-1

माझा मुलगा असं करूच शकत नाही”

वसुधाताई सुनेवर चिडल्या होत्या,

मुलाचं बाहेर प्रेमप्रकरण चालू आहे हे सुनेला कळलं तेव्हापासून तिने घरात मोठं आकांडतांडव केलं होतं,

वसुधाताई मान्य करायला तयारच नव्हत्या..

त्यांच्या मुलांचं वर्षभरापूर्वीच लग्न झालं होतं,

त्यांनी स्वतःच त्यांच्या पसंतीची सून करून आणलेली,

मुलाचं लग्न आटोपलं आणि त्या जबाबदारीतुन मोकळ्या झाल्या,

त्यांच्या नवऱ्याने 4 वर्षांपूर्वी हे जग सोडले होते तेव्हापासून मुलाच्या लग्नाची त्यांना खूप काळजी होती,

मुलगा आतल्या गाठीचा होता,

तोंडावर एक अन मनात एक,

एकुलता एक असल्याने लाडात वाढलेला,

त्याचे वडील गेले तेव्हापासून आई त्याला जास्तच जपत होती,

त्याच्यावर सर्व जबाबदारी पडली असा आईचा गैरसमज झालेला,

प्रत्यक्षात तो जबाबदार व्यक्ती नव्हताच,

आई वडिलांच्या अति लाडाने तो बिघडला होता,

शाळा कॉलेजातून त्याच्या खूप तक्रारी येत,

पण लहान आहे म्हणत आई त्याचं सगळं पोटात घाले,

त्याचे पाय घरात टिकत नसत,

तो जिथे कामाला होता तिथे बऱ्याच मैत्रिणी होत्या त्याला,

सोशल मीडियावरून बऱ्याच मुलींशी बोलत असायचा,
******

2 thoughts on “पट्टी-1”

Leave a Comment