निचरा-2

“आईचं बोलणं गं..”

त्याला ही गोष्ट फरक क्षुल्लक वाटत होती, त्याने दुर्लक्ष केलं..

दुसऱ्या दिवशी तिच्या नणंद बाईने तिच्या ऑफिसमध्ये वन पीसवर घातलेले फोटो सोशल मीडियावर टाकले होते, सासूबाई अगदी कौतुकाने ते बघत होत्या.

हे बघून मधूला राग अनावर झाला, लेकीने असे कपडे घातलेले चालतात, पण सगळी बंधनं मात्र मलाच..

तिने पुन्हा आपल्या नवऱ्याला सांगितलं,

“काय पुन्हा कटकट आहे..” असं म्हणत या गोष्टीला क्षुल्लक समजून परत त्याने सोडून द्यायला लावलं..

एके दिवशी नोकरीवरून आल्यानंतर तिला आपल्या खोलीतल्या वस्तू इतरत्र पसरलेल्या दिसायच्या. ती नसतांना तिच्या खोलीत येऊन कुणीतरी उचकपाचक करे हे तिच्या लक्षात येत होतं..पण तिला वाटायचं आपलीच माणसं आहेत, केलं तरी काय बिघडतं…

नंतर एके दिवशी तिला समजलं की सासूबाईंची एक सोन्याची चेन गहाळ झाली आहे, ती त्याच शोधत होत्या,

आता मात्र तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली,

तिने तडक नवऱ्याला सांगितलं,

“मी चोर वाटते तुम्हाला? तुझ्या आईची चेन गहाळ झालीये ती माझ्या खोलीत शोधणं का सुरू आहे??”

“काय??”

“हो…मला समजलं आहे की मी ऑफिसला गेले असता माझ्या खोलीत शोधाशोध सुरू होते..”

“वेडी आहेस का? अगं आई आहे ती..”

“तुझी आई आहे…माझी नाही..”

“हे जास्त बोलतेय हा..”

“मग काय बोलू? मला मुलीप्रमाणे वागवावं अशी अपेक्षा नाहीच, पण किमान संशय तरी घेऊ नये..”

त्याने तो विषय पुन्हा अर्धवट सोडला आणि म्हणाला,

“सोड…तुझ्याशी डोकं लावण्यात अर्थ नाही..पण पुन्हा मला अशी कटकट अजिबात नकोय..समजलं??”

मधू आता पुरती निराश झाली.. नवरा ऐकून घेईना आणि सासूच्या कुरापती थांबेना…

तिने शेवटी नवऱ्याला सांगणं सोडून दिलं..

तिने तक्रारी करणं बंद केलं तसं त्याला हायसं वाटलं,

तो मजेत आपापलं रुटीन सांभाळत होता..

सकाळी ऑफिस, संध्याकाळी मित्र आणि रात्री मोबाईल…

काही महिने उलटले..

तो नोकरीवरून परत आला तेव्हा खोलीत त्याला मधू दिसली नाही..
****


2 thoughts on “निचरा-2”

  1. It was great seeing how much work you put into it. The picture is nice, and your writing style is stylish, but you seem to be worrying that you should be presenting the next article. I’ll almost certainly be back to read more of your work if you take care of this hike.

    Reply

Leave a Comment