निचरा-1

“आई मला आज माझ्या कपड्यांबद्दल बोलल्या..” – मधु आपल्या नवऱ्याला सांगत होती.

लग्न होऊन सहा महिने होत आले आणि हळूहळू सर्वांना एकमेकांचा स्वभाव समजू लागला होता. मधुने नवीन जॉबसुद्धा शोधला होता आणि ती कामावर जाऊ लागलेली.

ऑफिस तसं मॉडर्न, सगळी माणसंसुद्धा उच्चवर्गीय..

त्यामुळे साहजिकच सर्वांचं राहणीमान उत्तम होतं,

बायका निव्वळ साडी व ड्रेसमध्ये नसत,

छानपैकी स्कर्ट, टॉप्स, जीन्स, वेस्टर्न ड्रेसमध्ये दिसत..

या वातावरणात समरस व्हावं म्हणून मधूही तसे कपडे वापरू लागली, तशी तिला लग्नाआधी सवय होतीच अश्या कपड्यांची..

पण तिच्या या कपड्यांवरून सासूबाईंनी एकदा तिला हटकले,

“लग्न झालंय तुझं, आता असे कपडे नको घालत जाउ..”

“अहो आई ऑफिसमध्ये सगळे असेच घालतात..”

“ऑफिस बदल मग..”

सासूबाईंनी डायरेक्ट तोडगा काढला तसा तिला राग आला..

संध्याकाळी तिने नवरा घरी आल्यावर त्याच्याकडे सगळं सांगितलं..

तो मोबाईलवर स्क्रोल करत बसला होता,

ती सांगत होती त्याकडे त्याचं लक्ष नव्हतं…

तिने पुन्हा हटकले,

“मी काय बोलतेय महेश..”

“अगं एवढ्याश्या गोष्टीचा का इतका issue करतेस?? सोडून दे ना..”

“काय? नोकरी?”

*****

1 thought on “निचरा-1”

  1. I loved you better than you would ever be able to express here. The picture is beautiful, and your wording is elegant; nonetheless, you read it in a short amount of time. I believe that you ought to give it another shot in the near future. If you make sure that this trek is safe, I will most likely try to do that again and again.

    Reply

Leave a Comment