दुहेरी- 1

गेल्या अर्ध्या तासापासून कार्तिकी सुईत दोरा ओवायचा प्रयत्न करत होती..

तिच्या नवऱ्याने ते पाहिलं, तो म्हणाला,

“अगं सोड ना ते, किती वेळ धरून बसलीये..”

“थांब जरा..”

अखेर सुईत दोरा टाकला आणि ती शांत झाली..

“कोण म्हणेल तू राज्यातल्या टॉप बिझनेसमन ची बायको आहेस ते? दिवसाला नवीन कपडे घेऊ शकतेस इतका पैसा आहे आपल्याकडे…अन तू..”

ती फक्त हसली,

ती अशीच होती, प्रचंड महत्वाकांक्षी… एखादी गोष्ट ठरवली की ठरवली…

आयुष्यात खूप उन्हाळे पावसाळे पाहिलेले तिने..

ऑफिसमधल्या अधिकाऱ्याच्या दबावाखाली येऊन तिच्या वडिलांनी स्वतःचं जीवन संपवलं होतं..

यातून बाहेर येत नाही तोच मोठ्या बहिणीनेही तेच केलं..

एका अज्ञात मुलाने तिची फसवणूक केली होती..

लग्नाचं आमिष दाखवून तिच्याकडून सगळं ओरबाडून घेतलं होतं…

आणि कार्तिकी सोबतही तेच घडणार होतं..

कॉलेजमध्ये एका मुलाच्या प्रेमात ती आकंठ बुडालेली, आरव नाव त्याचं…

पण त्याच्या घरच्यांनी नकार दिला आणि नातं संपलं..

पण ती स्वतःला संपवणारी नव्हती, आलेल्या दुःखाला तिने गिळलं आणि दुःखालाच संपवलं…

कुटुंबात फक्त ती आणि तिची आई उरली..

पण सगळे दिवस सारखे नसतात,

अमोल सोबत तिची ओळख झाली,

एका गर्भश्रीमंत मुलाला ती आवडली आणि लग्नाचा प्रस्ताव आला..मुलीला बघून त्याने तिची माहितीही काढली नाही…तिच्या घराशी त्याचा संबंध आलाच नाही, त्याला फक्त मुलगी हवी होती…

तिनेही एवढंच सांगितलं, की तिला वडील नाही आणि बहीण एका आजाराने गेली…

त्यानेही चांभारचौकश्या न करता लग्न केलं आणि तिला घेऊन गेला लांब…

अमाप पैसा, अमाप सुखसोयी मध्ये ती वावरू लागली..

अमोल सकाळी कामावर जाई..

गेल्या गेल्या रिसेप्शनिस्ट मायराला खाणाखुणा करत काहीतरी इशारे करी..

तिने दुर्लक्ष केलं अन एक दिवस नोकरी सोडली..

ऑफिसमध्ये कुठल्याही मुलीसोबत त्याचे हेच चाळे चालत..

****

भाग 2
भाग 3

दुहेरी -3

3 thoughts on “दुहेरी- 1”

Leave a Comment