तळतळाट-1

मंजिरी आणि प्रशांत,

आयुष्याच्या उतारवयात जगणं सुरू होतं,

अचानक एक फोन आला,

“सुधीर साहेब ऍडमिट आहेत, भेटायला येऊन जा”

धक्काच बसला,

धडधाकट माणूस,

कधीही व्यायाम चुकवला नाही, कधी बाहेरचं खाल्लं नाही,

त्या माणसाला काय झालं असावं?

मंजिरी त्यांचं नाव ऐकताच भूतकाळात गेली,

वर्धा मधील एका शहरात दोन्ही जोडपी जवळजवळ रहात होती,

सुधीर आणि प्रशांतचं एकच सरकारी डिपार्टमेंट,

सुधीर तसा वरच्या हुद्द्यावर होता, बरीच पॉवर होती त्याच्याकडे,

दोन्ही कुटुंबाचं एकमेकांकडे येणं जाणं असायचं,

मंजिरी सुधीर आणि त्याच्या बायकोची श्रीमंती बघून अवाक व्हायची,

सुधीरची बायको दरवेळी नवीन साडी, नवीन दागिने दाखवायची,

घरात कायम नवनवीन वस्तू यायच्या,

शेवटी स्त्रीमन,

ईर्षा वाटू लागली,

आपल्यालाही हवं म्हणून आस वाटू लागली,

नवऱ्याला सांगितलं तर तो फक्त ऐकून घेई,

मौन बाळगे,

तिला फार राग येई,

भाग 2


Leave a Comment