ट्रिप-1

“दादा वहिनी, तुम्हाला जमत नसेल आई बाबांना सांभाळायला तर मला सांगा..”

राधिका आपल्या भावाशी फोनवर रागारागत बोलत होती.

“राधिका तुझा काहीतरी गैरसमज झालाय, त्यांना एकटं नाही सोडत आम्ही”

“तू तर निघून जातोस रे ऑफिसला, वहिनी काय करते दिवसभर? लक्ष कुठे असतं तिचं? आईचा काल फोन आलेला, म्हणत होती तिला चहा हवा होता आणि आवाज देऊन देऊन थकली ती. स्वतः उठायला गेली तर पाय मुरगळला..”

साकेत हे ऐकून अवाक झाला, कारण घटना वेगळी होती आणि राधिका वेगळं बोलतेय, आईनेच वहिनीला वरच्या खोलीत जाऊन तिची एक वस्तू शोधायला पाठवलं होतं, बाबांनी tv चा आवाज जोरात केलेला… आई ते विसरली आणि चहासाठी आवाज देऊ लागली, सून वर आहे, आपणच तिला पाठवलं हे तिच्या लक्षातच राहिलं नव्हतं… पण राधिकाशी डोकं लावण्यात अर्थ नाही हे त्याला समजलं. मागून त्याची बायको, समीक्षा..सगळं ऐकत होती. तिच्या डोळ्यात पाणी आलं.

“मी पूर्णवेळ घर आणि त्यांच्याकडे बघण्यात घालवते, आणि मला हे ऐकावं लागतं? कुठे कमी पडले हो मी?”

साकेत सगळं जाणून होता, त्याने तिला शांत केलं…

“काळजी करू नकोस…”

“काळजी नाही हो, नेहमीचं आहे…सासूबाई दिवसभर बसून सगळं लक्ष माझ्यावर ठेवतात, आणि एकूनएक गोष्ट त्यांच्या मुलीला सांगत बसतात…पदोपदी भीती वाटते, काही चुकेल का, काही घडेल का…कायम धाकातच वावरावं लागतं”

साकेत चांगला होता , आई बायको की बहीण…अशी कुणा एकाची बाजू न घेता ज्याची बाजू योग्य तो त्याची बाजू घेई. मग ती आई असो, बहीण असो व बायको. यावेळी त्याची बायको बरोबर होती. आई वडिलांसाठी सगळं काही करतांना त्याने पाहिलं होतं. त्याने विचार केला आणि एक शक्कल लढवली.

काही दिवसांनी त्याने राधिकाला फोन केला,


Leave a Comment