जैसे ज्याचे कर्म-2

तिकडे आई आणि दुर्गा तिच्या नवऱ्याने पाठवलेला सुकामेवा मोठ्या उत्सुकतेने बघत होत्या. आई म्हणाली,

“जावईबापू बघ, किती काळजी त्यांना…लाखात एक आहे माझा जावई..”

हे ऐकताच दुर्गा लाजली.

आई म्हणाली, “जावईबापूंना म्हणा इकडेच या राहायला काही दिवस… तेवढाच तुझ्यासोबत वेळ घालवता येईल..”

दुर्गाचा चेहरा फुलला, तिने लगेच आपल्या नवऱ्याला फोन लावला..

“हॅलो, अहो मी काय म्हणते…थोडे दिवस या की इकडे राहायला..”

तिकडून तिच्या नवऱ्याने काहीतरी सांगितलं आणि तिचा चेहरा उतरला…

आईला काळजी वाटली,

“काय गं, काय बोलले जावई?”

“अगं आई हे म्हणताय की ते त्यांच्या बहिणीकडे चाललेत..”

“कशाला??”

“अगं त्यांच्या मिस्टरांचा accident झालाय, त्यांनाच पाहायला गेलेत…तिकडेच थांबणार आहेत काही दिवस..”

आईला राग आला,

“इकडे बायको पोटूशी, कधीही कळ येईल आणि हे काय बहिणीकडे जाऊन बसलेत?”

“जसं मी माझ्या बहिणीसाठी ईथे थांबलोय ना, तसंच..”

सतीश पिशवी घेऊन आत येताना म्हणाला,

आईला कळत होतं पण वळवून घ्यायचं नव्हतं,

आपल्या मुलाने आपल्या बहिणीजवळ असावं, मात्र मुलीच्या नवऱ्याने त्याच्या बहिणीकडे जाणं टाळावं… असा विरोधाभास स्पष्ट दिसून येत होता..

दिवस जात होते, दुर्गाचे दिवस भरत आले होते, तिकडे सतीशच्या बायकोलाही आठवा महिना लागलेला..सतीशने सगळी सोय करून ठेवली, गाडी तयार ठेवली, आप्पा आणि बजरंगला सगळं सांगून ठेवलं. धावपळ करायला बरीच माणसं होती. घरातलीच नाही, तर शेजारीच चुलत्यांची घरं होती. एका हाकेवर सगळे तयार होते.

दिलेल्या तारखेच्या चार दिवस आधी,

“सतीश दाजी, लवकर या तुम्ही, वसुंधराला कळा येताय, दिलेल्या तारखेच्या आधीच तेही..आई आणि बाबा बाहेर गेलेत, त्यांना यायला वेळ लागेल..घरात मी एकटीच आहे, शेजारचे काका नेताय आम्हाला दवाखान्यात, पण तुम्ही लवकर या..”

सतीश प्रचंड घाबरला,

Leave a Comment