जेव्हा त्या उमगतात-2

मला काय धाड भरलीये? वयानुसार थोडीफार दुखणी लागतातच..

डॉक्टरकडे जायचं म्हटलं की त्यांना राग येई,

तात्पुरत्या गोळ्या घेऊन आराम करत,

एखाद्या दिवशी तिला खूप जीव लावत,

एखाद्या दिवशी झेपणार नाही इतकं काम सांगत,

सकाळी ती आज सासूबाईंचा काय मूड असेल या चिंतेतच उठत असे,

एके दिवशी कहरच झालं,

दिवाळीची खरेदी सुरू होती,

मुलगा आई आणि बायकोला मोठया दुकानात घेऊन गेला,

सासूबाईंनी चांगली महागडी साडी घेतली,

तिने एक साडी उचलली तर तिला बोलायला लागल्या,

“इतकी महागडी साडी कशाला घेतेस? कितीदा घालणार आहेस अशी? पुढे तुम्हाला भरपूर पैसा लागेल संसाराला त्याचा विचार कर..”

तिचा संताप झाला,

“म्हणजे तुम्ही महागडी साडी काढतात ते चालतं, मी तरी तुमच्या साडीहून कमी किमतीची उचलली तरी तुम्हाला अडचण..तुमचं काय ते कळतच नाही मला..ह्या अश्या वागण्याला कंटाळली आता मी”

“काय गं? ठेवतेस ना साडी??”

सासूबाई म्हणाल्या तशी ती भानावर आली,

ती मनातल्या मनात बोलत होती, मनातलं ओठावर यायला संस्कारांचा बांध आडवा आला,

तिने गपचूप दुसरी साडी घेतली,

नवरा हळूच कानात म्हणाला,

“तुला देईन मी नंतर हीच साडी घेऊन”

“नको..आता ईच्छा नाही राहिली..”

दिवस सरत होते,

पण सासूबाईंमध्ये मोठा फरक तिला जाणवू लागलेला,

त्यांचं दुहेरी वागणं बंद झालेलं,

खूप प्रेमळपणे वागत होत्या त्या सध्या,

एके दिवशी तिला जवळ बसवलं आणि सांगितलं,

“आयुष्य सोपं नसतं, अनेक अपमान पचवावे लागतात, मनाला मुरड घालावी लागते, वेळप्रसंगी सहनशक्तीची कसोटी पणाला लावावी लागते..हे सगळं पार करता आलं तर संसार सुखाचा होईल पोरी..”

सासूबाई आज अचानक असं का सांगताय तिला कळेना,

1 thought on “जेव्हा त्या उमगतात-2”

Leave a Comment