जुने कपडे-1

दोघी सख्ख्या बहिणी,

वयात बरंच अंतर होतं, जवळपास 8 वर्षांचं..

मोठी शहरात रहायची, आपल्या नवऱ्या आणि मुलांसोबत..

खाऊन पिऊन सुखी,

घरच्यांना वाटायला लागलं, मोठीचं सुरळीत झालं,

आता लहानीचं लवकर आटोपून घेऊ म्हणजे जबाबदारीतुन मोकळे,

मोठी सारखाच शहरातला मुलगा पाहायचा ठरलं,

अनेक स्थळं पाहिली, पण एकही पटेना तिला..

चांगली श्रीमंत होती, देखणी होती,

पण हिला श्रीमंतीवर आयतं बसणारी मुलं नको होती,

एखादा कष्टाळू, मेहनती मुलगा तिला हवा होता,

घरचे कंटाळायचे,

मोठी बहिणही समजावे,

शेवटी पैसा माणसाला चांगलं आयुष्य देतो, माझ्याकडे बघ..माझ्या सासऱ्यांनी सगळं करून ठेवलं आहे आमच्यासाठी..काही कमी नाही आमच्याकडे.. नाहीतर माझा नवरा हफ्तेच फेडत बसला असता आणि मी काटकसरीतच आयुष्य घालवलं असतं,

बहिणीचं म्हणणं प्रॅक्टीकल होतं पण लहाणीला पटत नव्हतं,

तिने आपला हेका सोडला नाही,

अखेर एक सुविद्य, संस्कारी मुलगा तिला मिळाला,

भाग 2

जुने कपडे-2

भाग 3

जुने कपडे-3

3 thoughts on “जुने कपडे-1”

  1. अतिशय चांगली कथा .स्थळ पाहताना गरिबी श्रीमंती पेक्षा होतकरू मुलगा पाहणेच योग्य ,हाच या कथेचा बोध .नेहमीप्रमाणेच कथा अतिशय सुंदर.

    Reply

Leave a Comment