चूक-2

तो धावतच हॉस्पिटलमध्ये गेला, पैसे भरले,

जेवणाची वेळ झालेली,

आता घरी कधी जाणार, बनवणार केव्हा..

ऐन वेळी कुणी विकतचा डबाही देणार नाही,

तो आधी वडिलांकडे गेला,

त्याने तिथे वेगळंच चित्र पाहिलं,

एक नर्स तिच्या डब्यातलं जेवण वडिलांना भरवत होती,

आणि वडिलांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते,

त्याला काही कळेना,

त्याने जवळ जाऊन पाहिलं आणि त्याच्या अंगावर शहारेच आले,

कारण ती दुसरी तिसरी कुणी नसून ‘नयना’ होती,

‘नयना’, भूतकाळातील त्याची प्रेयसी,

एका सामाजिक कार्यनिमित्ताने त्यांची ओळख झालेली,

ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं,

नयना सुंदर, सुशील होती..अनाथ होती,

आश्रमतच वाढलेली,

वडिलांना नयना नक्की आवडेल म्हणून एकदा त्याने दोघांची भेट घालून दिली,

वडिलांनी साफ नकार दिलेला,

“अरे कोण कुठली मुलगी ती, खानदान माहीत नाही ना जात पात, अश्या मुलीशी लग्न केलंस तर माझ्यासाठी तू अन तुझ्यासाठी मी मेलो असं समज…”

वडिलांनी आपला निर्णय सांगून टाकला,

त्यांच्याच ओळखीतल्या त्यांच्या एका मित्राच्या मुलीशी लग्न करण्यास भाग पाडलं,

लाडाकोडात वाढलेल्या तिला सांसारिक जबाबदाऱ्या नको होत्या,

तिला सगळं नको नको वाटू लागलं,

“आमच्या मुलीला मोलकरीण बनवलं” म्हणत तिच्या घरचे तिला घेऊन गेले..

तिच्या जाण्याने फार काही फरक पडला नाही,

पण त्याचं आयुष्य मात्र उघड्यावर पडलं,

आज नयनाला बघून वडिलांना खूप मोठा पश्चात्ताप होत होता,

त्यांना तिचा चेहरा चांगला लक्षात होता,

सोज्वळ, सुंदर, निरागस चेहरा…

ती अनाथ नसती तर वडिलांनी हसत हसत दोघांचं लग्न लावून दिलं असतं..

“बाबा खाऊन घ्या, तुम्हाला ताकदीची गरज आहे..”

जणू काही झालंच नव्हतं अश्या समजुतीत ती वडिलांची काळजी घेत होती…

वडिलांचं जेवण झालं आणि ती बाहेर आली,

तो तिच्या मागोमाग गेला,

दोघांनी काही क्षण एकमेकांच्या डोळ्यात बघून डोळ्यातलं पाणी लपवलं,

ती अडखळतच म्हणाली,

“माझं कर्तव्य केलं मी..”

त्याने तिच्याकडे निरखून पाहिलं,

तिच्या गळ्यात ना मंगळसूत्र होतं ना कपाळाला कुंकू,

ती तशीच होती,

याच्या आठवणीत जगत होती..

तो वडिलांकडे गेला,

वडील शून्यात नजर लावून बसले होते..

मग हळूच म्हणाले,

“माझ्या कर्माचं फळ आज भोगतोय मी..तेव्हाच तुझा हात तिच्या हातात दिला असता तर आज हसतं खेळतं कुटुंब असतं आपलं…”

तो काहीच बोलला नाही,

वडील चुकले होते,

पण वडिलांना काय बोलणार?

त्याचं मौन बघत ते म्हणाले,

“बाळा तू बोल मला, सगळा राग काढ माझ्यावर…मीच कारणीभूत आहे तुझ्या दुःखाला..”

“बाबा असं बोलू नका, आपण फक्त निमित्त असतो..जे घडणार असतं ते घडूनच जातं…”

त्याने तात्पुरता दिलासा दिला..

वडिलांची तब्येत सुधारत होती,

बाबांना रोज डबा आणत होती,

त्याला म्हणायची, “माझं प्रेम मी निभावते आहे याचं समाधान म्हणून तरी मला डबा आणू दे..”

त्याला नाही म्हणता आलं नाही,
*****

1 thought on “चूक-2”

Leave a Comment