चूक-1

वडिलांना ऍडमिट केलं तेव्हापासून त्याची प्रचंड धावपळ सुरू होती,

डॉक्टरांना भेटणं, गोळ्या औषधं आणणं, वडिलांकडे लक्ष देणं, डबा बनवणं, ते खाऊ घालणं,

आई बऱ्याच वर्षांपूर्वी सोडून गेलेली,

बायको होती, पण अवास्तव अपेक्षा आणि उच्च जीवनमानाची सवय असलेल्या तिला नवऱ्याबरोबर राहायला लाज वाटू लागलेली आणि 2 वर्षांपूर्वीच ती माहेरी जाऊन राहिली,

लग्नानंतर 2 वर्षातच घटस्फोटाचे पेपर तिने पाठवून दिले,

तो एकटा पडला, सोबत ना आई ना बायको,

वडील अन तो,

नातेवाईक अश्या वेळेस बरोबर पाठ फिरवतात,

त्याने जगण्याची सवय करून घेतली होती,

सकाळी उठून स्वतःसाठी डबा बनवायचा,

वडिलांसाठी जेवण तयार ठेवायचा,

वडील घरातलं बाकीचं आवरून घेत,

मग ते थोडावेळ tv बघत, थोडावेळ मित्रांसोबत फिरून येत,

दिवस निघून जात होते,

पण त्यांचं वय वाढत होतं,

ते असे अचानक आजारी पडले आणि सगळा भार त्याच्यावर आला,

हॉस्पिटलमध्ये पैशांची तजवीज म्हणून नोकरीवर जाणं भाग होतं, वडिलांची हेळसांड होऊ नये म्हणून त्यांना डबा बनवायला घर ते हॉस्पिटल हेलपाटे मारावे लागायचे, त्यात घर अस्ताव्यस्त…

तो सुन्न झाला होता,

मालकाकडे त्याने वडिलांच्या उपचारासाठी जास्तीचे पैसे मागितले होते,

मालकाने होकार दिला होता,

तो मालकाच्या केबिनबाहेर बसून होता,

मालकाने 2 तास उशीर केला यायला,

हातावर उपकार करतोय असे पैसे टेकवले,
*****


Leave a Comment