घास-2

तो प्रसंग तिच्या मनावर कोरला गेला.

तिचं कुटुंब गरीब असलं तरी तिचा मामा चांगला शिकलेला होता, शहरात राहत होता. त्याने हट्ट करून पुढे शिकवण्यासाठी तिच्या आई वडिलांना समजावून तिला शहरात घेऊन गेला. शहरातील वातावरण अगदी वेगळं. तिला रुळायला बराच वेळ लागला.

कॉलेज, मित्र मंडळी या सर्वात ती चांगली रमू लागली. तिथेच तिची भेट कौस्तुभ सोबत झाली. तिला तो आवडला. पण तेंव्हाचं प्रेम म्हणजे केवळ चोरून भेटायचं, बघायचं…एवढंच..

चोरून भेटायला आधी त्याच्याकडून पण प्रतिसाद तर यायला हवा. तो तिच्याकडे बघायचा, त्याच्या हळूहळू लक्षात येत होतं की ही आपल्यात गुंतली आहे. हळूहळू मित्र मंडळी दोघांना एकमेकांच्या नावाने चिडवू लागले.

एके दिवशी कॉलेजमध्ये त्याचा वाढदिवस सर्वांनी साजरा केला. एका मित्राने केक आणला. ती त्याच्या जवळच उभी होती. त्याने केक कापला, आणि आतुरतेने वाट पाहू लागली की हा आता पहिला घास कोणाला भरवणार? कारण तो जर तिला भरवला तर त्याच्याकडूनही प्रेमाची कबुली तिला समजणार होती.

त्याने केक कापला, पहिला घास तिच्या तोंडाजवळ नेला..तिला जग जिंकल्यासारखं वाटलं होतं..तिने आ केला…पण त्याने पटकन हात पुढे नेत  तिच्या शेजारी असलेल्या मित्राला भरवला…हे बघताच सर्वांमध्ये एकच हशा पिकला..तिचा झालेला पोपट बघून सर्वांना हसण्यासाठी भलतीच संधी मिळाली. कौस्तुभ सुद्धा तिच्याकडे बघून हसत होता…

तिच्या डोळ्यात पाणी आलं..तिला कळून चुकलं, की कौस्तुभचं प्रेम वगैरे काही नाही.. आपणच भलतीच स्वप्न बघत होतो. ती स्वप्न पूर्ण होणार नव्हती ते ठीक होतं पण त्याची अशी शोभा व्हायला नको होती. तिचा भ्रमनिरास झाला आणि तिने तिथून काढता पाय घेतला.
******

2 thoughts on “घास-2”

  1. Wow, wonderful blog layout! How lengthy have you been blogging for?
    you made running a blog glance easy. The total glance of your website
    is fantastic, as neatly as the content material!
    You can see similar here ecommerce

    Reply

Leave a Comment