घरोघरी मातीच्या चुली

विधी तुझी वहिनी सतत तर हसत असते मग आज का इतकी रडते ,सगळे तर मनासारखे झाले तिच्या आणि तिच्या आई वडिलांच्या तरी ही आज भरल्या घरात रडते..? “काकूविधी, “काकू दादाचा लग्नाच्या आधीपासूनच निराली वहिनीला नकार होता, त्याला ती आवडत नव्हतीच तरी आम्ही सगळ्यांनी मिळून त्याला समजवले,पण तरी तो तयार नव्हता ह्या लग्नाला…”
काकू, “मग काय झाले ,कसा तयार झाला हा हिच्यासोबत लग्नाला…आणि काय कमी होती तुझ्या वहिनीमध्ये जो हा नकार देत होता..”
विधी,” त्याने नकार देण्याचे काही कारणच नाही सांगितले ,पण मला लग्न करायचे नाही ह्यावर ठाम होता..मग बाबा आडून होते की निराली हीच ह्या घरची सून होईल तुला हिच्यासोबतच लग्न करावे लागणार आहे..”काकू,”मग बाबा ने त्याला दम देऊन निराली सोबत लग्नाला तयार केलेच तर, बाबा कडक आहे पण मुलाचे ही ऐकायला हवे होते…कोणी आहे का त्याच्या आयुष्यात हे जाणून घ्यायला हवे होते…आजकाल हे सगळेच पालक करतात असे नाही पण समंजस पालक नक्कीच करतात ग ह्यात दोन जीवन सुखी होतात ,आणि नाही ऐकले की दोघे ही दुःखात एकमेकांसोबत अक्खे आयुष्य मन मारून काढतात ,चेहरे हसरे असतात पण मन मात्र दुःखी..”
विधी, “हो खरंय काकू ,बाबा अति स्ट्रिक्टली वागले पण आता त्यांना खूप पछतावा आहे ह्या गोष्टीचा निराली त्यांच्या मित्राची मुलगी आहे ,म्हणून मित्रासाठी त्यांनी हे नाते स्वीकारले दादाला ही भरीस पाडले… तशी निराली माझी ही मैत्रीण आहे ,तिची ही वेगळी कहाणी आहे..न राहून तिच्या वडिलांनी ही बाबांच्या म्हणण्यानुसार तिचे लग्न दादासोबत लावून दिले…तिने वडिलांची इच्छा म्हणून ऍडजस्ट केले पण कुठे तरी दादा साथ देत नाही हे पाहून ती दुःखी आहे…हा निर्णय हा हट्ट खूप चुकला आहे..ह्यात इतक्या लांब आल्यावर माघारी ही फिरता येत नाही…आणि दोघांचे दुःख ही बघवत नाही…”काकू, “आता आपण एक शिकवण घेऊ शकतो की मुलांच्या मर्जीप्रमाणे नाते जुळले पाहिजे नाहीतर हतबलता येते नशिबी ती ही अशी…त्यात आपण ही सुखी होत नाही मग फक्त मनावर ओझे म्हणून नाते निभवायचे ह्याला अर्थ देत बसायचा आणि साजरे करायचे अडलेले सोहळे…मी तर प्रदीपला सांगितले आहे तू म्हणशील त्या मुलीसोबत लग्न कर आम्ही तुझ्या निर्णयात तुझ्या सोबत आहोत..”विधी, “बरोबर आहे तुझे म्हणणे “विधी काकुला सांगत होती की आपल्या दादाचे लग्न हे त्याच्या मनाविरुद्ध झाले आहे आणि त्याला बाबांच्या नसता दबावाखाली ह्या लग्नाला होकार द्यावा लागला…त्यात दोघे ही भरडले गेले…दादा ही भरडला गेला आणि तशीच वहिनी ही, म्हणजे दादा मन मारून जगत आहे तशीच निराली वहिनी ही मन मारून जगत आहे..निराली मोठ्या घरातील थोरली मुलगी ,शिक्षण झाले तसे तिला स्थळ बघणे सुरू केले आणि त्यांच्या घरातील संस्कारी मुलगी आपल्या घरात लग्न होऊन आली तर मग घरात आंनदी आंनद असेल ,देव पूजा ,पूजा विधी ,बाकी संस्कार आपोआपच सुरू होतील..
काकुला ही बरेच दिवसांपासून मनाला जे खटकले ते बोलायचे होते…पण मोठ्या दिराकडे आणि जाउबाई कडे हा विषय काढणे म्हणजे विषयाची परीक्षा घेणे ..आधीच तर ह्या लग्नामुळे कोणी ही खुश नव्हते त्यात आपण जाऊन हा विषय काढणे म्हणजे जणू उगाच जखमेवर मीठ चोळणे असेच..काकूने मग तिची लाडकी पुतणी विधी कडे सहज विषय काढला, तेव्हा विधीने सांगितले ते ऐकून त्यांना खूप वाईट वाटले…कुठे आपला पुतण्या मिहीर हसता खेळता ,मन मोकळा…आणि आता कुठे लग्न झाल्यानंतर बदललेला मिहीर…जो घरात एक क्षण ही थांबत नाही…कोणाशी आधीसारखे बोलत ही नाही…नवरा बायको मध्ये नवरा बायको सारखे नाते नाही…सगळे जणू मन हेलावून टाकणारे…एक कुटुंबाची कथा ,ज्यात सगळ्या कुटुंबात असतात तसे जिव्हाळ्याचे नाते आहेत ,दोन चुली झाल्या आहेत तर अजून ही धरून आहेत..जुळून आहेत..ते फक्त प्रेमामुळे..पण त्यात ही काही असतात जे नात्याला नाते म्हणत नाहीत..आपले समजत नाही ,पाहू कोण आहे ते…पुढे पाहू काय वाढून ठेवले आहे कथेतक्रमशः???

घरोघरी मातीच्या चुली असतातभाग 2इकडे घरात आलेली सून फक्त काम आणि कामात मग्न असते ,तिचे सगळे सोपस्कार नेटाने पाळते ,आलेल्या गेलेल्यांचे सगळे कर्तव्य पार पाडते… कोणीही घरात येऊ दे ती सगळ्यांचे हसून स्वागत करत आणि जेवायचा आग्रह करत..नवऱ्याकडील नाते जीवभावाने सांभाळत ..तरी ती मात्र सुखी नाही हे दिसत होते तिच्या डोळ्यातून..ती आपले कर्तव्य चोख करत असली तरी सुखी नाही हे कळत होते ,अगदी सगळे तेच चर्चा करत..तिचा संसार नीट नेटका नाही ह्याबद्दल चर्चेला उधाण आले होते…काय नेमके झाले असेल..कोणाचे बिनसले असेल…हिच्यात काही दोष असेल की त्याच्यात…की तिचे लग्नाआधीचे प्रकरण तर समजले नसेल आणि म्हणून मिहीर ने हिला बायको मानण्यास नकार दिला असेल, की मिहिरचेच काही प्रकरण आहे बाहेर हे आता लोक काही वाही तर्क लावू लागले होते…
काकूच्या कानावर जेव्हा ही बाब आली तेव्हा तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली…आमच्या घराबद्दल कोणाची ही कधी टाप झाली नाही ,कोणी नजर वर करून लेकी ,सुनेबद्दल बोलले नाही आणि हे काय पीक फुटले अफवांचे…आता हे थांबवायला हवे वेळीच..म्हणून काकू सरळ घरी आली आणि तिने विधीकडे विचारणा केली..विधी,”काकू अग आज जे मी सांगितले आहे ना ,ते कोणाकडे बोलू नकोस चुकून ही…”
काकू, “मी कश्याला बोलू कोणाकडे ,हे माझे घर नाही का ?? ही माझी माणसं नाहीत का ? ही सून हा लेक माझा नाही का…!! “
विधी, “तसं नाही ग ,वहिनी खूप सहन करते…निराली आता फक्त माझी मैत्रीण नाही ग ती माझ्या दादाची बायको आहे…तिला नाही आवडणार मी तिच्या आणि दादाच्या वैयक्तिक जीवनाबद्दल कोणालाही सांगितलेले..”काकू, “मी जाऊन समजावून सांगते तिला ,तू सून आहेस आता ह्या घरची तर तू समजावून घेत जा..नवरा आहे तुझा मिहीर तर तू पुढे पुढे करत जा..”लगेच काकू उठली आणि ती निराली कडे जायला पुढे सरसावली तोच विधी म्हणाली..”काकू तू फक्त तिला सांगू नकोस ,ह्यात ती तिचा संसार चोखपणे निभावत आहे…तिने स्वतःला घराच्या सुखासाठी वाहून घेतले आहे बरं…”काकू लगेच विधीकडे बघत म्हणाली, “मुलींना आपण नाही सांगणार मग कोण सांगणार…तिला माझा राग नाही येणार…तुझ्या आईसारखी मी ही सासू आहे तिची.. “
विधी, “काकू अग आई तिला जरा ही सासुपणा दाखवत नाही ,ती आईची लाडकी आहे बरं.. आणि आईला तिच्या सुनेला कोणी बोलेल तर टाप…फोडून काढेन ती….फक्त तिचा मुलगा तिला बायको म्हणून घेत नाही…पुढे तो ही घेईल जुळते….तोपर्यंत आपण सगळेच सासरचे आहोत आणि ती सून आहे हा पडका विचार बाजूला ठेवू…”काकू, “बसू का मी जरा तिच्या जवळ जाऊन, मी काही काही बोलणार नाही तिच्या आणि मिहिरच्या नात्याबद्दल…फक्त तिला सांगते मी तिची काकू सासूबाई आहे ते…ओळख करून देणे आपले कामच आहे ना…”विधी, “तिला तुझी चांगलीच ओळख आहे…बघ ती येईल तर तुझ्या आवडते आंब्याचे पन्हे घेऊन येईल…तिला आपल्या घरातील सगळ्यांचे नाव..आवडी माहीत आहे…वाढदिवस ही माहीत आहेत…”काकू, “म्हणजे ती रुळते ,आणि जुळून ही घेते तर ह्या घरातील माणसांशी !!…”विधी, “म्हणजे काय काकू…काल नारळाच्या वड्या पाठवल्या होत्या तुझ्याकडे त्या तिनेच केल्या होत्या बरं..”
काकू, “विधी ही अशी गुणाची पोर गमावता कामा नये ग…मला आता दया येते तिची…काय नेमके झाले कळत नाही मिहिरला…काय मनात आहे ग.?विधी ,”मला नेमके माहीत नाही पण कोणी आवडली असेल असे वाटत नाही पण निराली बद्दल प्रेम निर्माण व्हायला वेळ लागेल ,पण प्रेम नक्कीच निर्माण होवो…देव करो..”तिकडून लगेच निराली ट्रे घेऊन येते ,त्यात आंब्याचे पन्हे आणि सोबत खोरड्या असतात… आणि भाजलेले शेंगादाने ही असतात…निरालीच्या हातात हे सगळे पाहून काकू तर खूपच खुश होते…कधी लहानपणी तिने हे खाल्ले होते…तिच्या आवडीचे होते हे पदार्थ अगदी लहानपण आठवले….ते ही निराली मुळे… किती मनकवडी आहे ही हा मनात विचार आला…निराली ने काकूच्या समोर तो ट्रे ठेवला आणि काकू कडे बघून हसली आणि म्हणाली, “काय काकू आहे ना तुमच्या आवडत्या ह्या खारोड्या आणि शेंगादाने… तुम्ही खूप आवडीने खायच्या असे ऐकले होते…मग आज तेच आणले मी तुमच्यासाठी माझ्या माहेरावरून…”पुढे पाहू काय वाढून ठेवले आहे या कथेतक्रमशः?????

घरोघरी मातीच्या चुली असतातभाग 3काकूने लगेच सूनमुख म्हणून तिला पाच हजार रुपये दिले आणि तिच्यावरून बोटे फिरवून मोडले ,अगदी सगळ्याच बोटांच्या मोडण्याचा आवाज झाला..विधी, “मग काय काकू माझी वहिनी तुझी सून भरली ना मनात तुझ्या ही ,मी म्हंटल होत ना निराली वहिनी निराली आहे म्हणून..”काकू, “खूप निराली आणि गुणाची ग खऱ्या अर्थाने..”विधी, “वहिनी तू आणि काकू अगदी सारख्याच आहात बरं ,म्हणजे बघ काकुला मन वाचता येते ,आणि पटकन कोणाशी ही जुळून घेता येते..तुझ्यासारखे..”निराली, ” ताई इतके पण नाही हो सारखे,मी काकुपेक्षा एक पाऊल मागेच बरी ,त्या किती मोठ्या आहेत मानाने आणि मनाने त्यांनी लगेच मला आपले से केले, पण मला असे सहज जमत नाही..”
निधी,”तू नेहमी का कमी समजतेस स्वतःला निराली,मी आहे तुझ्या सोबत…ह्यात मी मदत करेन तुझे मन ह्या घरात रमायला…”
काकू,”अग ताई का म्हणतेस ,तुम्ही मैत्रिणी आहात ना !!! “काकू असे म्हणतात निराली गप्प झाली ,विधी स्मित करून काकूच्या हातात हात घेऊन डोळ्यांच्या इशाऱ्याने सांगून गेली ,तरी काकुला काही समजेना…मग विधी म्हणाली..विधी,”काकू मी सांगते तुला तो किस्सा मोठा आहे..निवांत बोलू ह्यावर”विधी आणि निराली शांत झाल्या ,काकुला वाटले अजून काही नवीन ऐकायला मिळेल ,सुनेबद्दल तशी जास्त माहिती काढायला आले होते गोड बोलून ती तर मिळाली नाही..पण ठीक आहे विधी शेवटी आपल्या वहिनीची बाजू चांगली घेत असली तरी कधी तरी भोभटा ऐकू येईलच…नात्यात काही तरी चुकले आहे हे सिद्ध होईल..काकूच्या चेहऱ्यावर आंनद दिसत नव्हता ,ती बाहेरून किती ही चांगली असल्याचा आव आणत असली तरी मनातून दुष्ट नियतीची होती, घरात हे सगळ्यांना माहीत होतेच,निधीला ही अवगत होते काकूचा मूळ स्वभाव…पण तिने ते सहज दाखवले नाही ना जाणवू दिले..
विधी आपल्या घरातील कोणतीच बाब बाहेर जाऊ द्यायची नाही म्हणून काकुला प्रेमाने समजून सांगत होती..पण तिला काकुला ही तडक दुखवायचे नव्हते म्हणजे ती घरातील गोष्टी बाहेर वाढून चाढून सांगणार नाही..इकडे काकुला वाटले आपल्या हेतूची शंका नको यायला म्हणून लगेच काकू निरालीकडे कडे बघत राहिली आणि म्हणाली,”अश्या सुना नशिबानेच मिळतात, मुली सासरी जातात आणि ह्या लेकीची कमी भरून काढतात..”विधी, “मी म्हणत असतेच सगळ्यांना बाकी कोणी भरभरून कौतुक करू किंवा नको करू पण वृंदा काकू नक्कीच निरालीच्या प्रेमात पडतील ,आणि पहा अगदी तसेच झाले..”निराली ही खूप खुश झाली की काकू किती चांगल्या आहेत ,आपण किती निशीबवान आहोत की आपल्याला ह्या घरात अशी इतकी चांगली माणसे मिळाली आहेत..निराली लगेच पुन्हा काकूच्या पाया पडली आणि काकूने तिला उठवून गळाशी लावले.. तिला सुखाने नंदा म्हणून आशीर्वाद दिला…सगळ्या गप्पा करून झाल्या होत्या ,तर विधीची आई आली ,त्यांना बघताच छोटी जाव वृंदा काकू चपापलीच…आणि सावध झाली…तिला माहीत होते की मोठ्या जावेला आपला स्वभाव माहीत आहे…आपण नक्की कश्यासाठी आलो आहोत घरी हा हेतू समजला असेल…
लगेच छोटी जाऊ नेहमीप्रमाणे आपल्या हेतूची शंका येऊ नाही म्हणून लगेच मोठ्या जावेच्या पाया पडते…अगदी पदर बिदर घेऊन..वाकून बिकून ,हसून जणू काही खास नाही सहज घरी येणे केले असे भासवायचा प्रयत्न होता..संपदा म्हणजे विधीची आई ,निरालीची सासूबाई आणि वृंदाची मोठी जाऊबाई होत्या… त्यांचा घरात खूप दरारा होता जेव्हा वृंदा लग्न करून घरात आली होती, आणि त्याच घर चालवत आणि संभाळत ही होत्या…त्याचा निर्णय म्हणजे अंतिम आणि सगळ्यांना मान्य असणारा…मग त्यांच्या पुढे कोणाची बोलायची ही हिम्मत होत नसत… मोठ्या दिरामुळे घर चालत आणि मोठ्या जावे मुळे घर एकत्र टिकून होते..जेव्हा वृंदा लग्न करून ह्या घरात आली होती तेव्हा तिला घरकाम ,स्वयंपाक ,नाती जपणे, संवाद साधणे मान देणे हे काहीच कळत नव्हते, फक्त उलट बोलणे वाद घालणे, भांडण लावणे..एकाचे दोन करणे हा तिचा सवयीचा भाग होता माहेरी तो तसाच सवयीने सासरी ही आला होता..तिच्या आई वडिलांना वाटायचे मोठया कुटुंबात लेक दिली म्हणजे समजदार होईल..पण तसे जमता जमेना…मग काय मोठ्या जाऊ बाईने तिला वळण लावयचे ठरवलेच…तशी तशी ती कामात भाग घेऊ लागली…उद्धट पणा कमी होऊ लागला.. आणि थोडी हुशारीने वागायला लागली…पण भांडण लावणे किंवा एकाचे दोन करणे कमी होईना…त्यात मग शेवटी वेगळे होण्याची वेळ आली..पण दिराला वेगळा संसार झेपेना म्हणून तो पुन्हा मोठ्या भावासोबत रहायला आला…वेगळे होते तेव्हा वृंदा सुखी होती ,कोणाची लुडबुड नव्हती..कटकट नव्हती..पण तिच्या नवऱ्याला घर खर्च परवडत नसल्याने तो भावासोबत जाण्याचा निर्णय घेऊन बसला….वहिनीला ही पुन्हा वृंदाचा ताप होऊ लागला पण एकत्र रहाण्याशिवाय पर्याय नव्हता..त्यांची मुले मोठी झाली…वृंदाच्या मुलांना मोठी काकू सांभाळू लागली…त्यांना ही काकू हवी हवी वाटू लागली…आणि मोठ्या जावेचा मुलगा मिहीर छोट्या काकूंसोबत रमू लागला..मग काय पुन्हा वेगळे होण्याचा विचार मागे पडत गेला… सगळ्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च मोठा भाऊ करू लागला.. मग जरा ही वाद होत नसे..मोठ्या जावेची कटकट वाटत नसे..उलट घरात त्यांची मदत करण्यासाठी वृंदा हात भार लावत…मिळून घेत…आपले हित कश्यात आहे हे समजल्यावर तिला एकत्र राहून आपला हेतू साध्य करण्याची किंमत कळली..क्रमशः???

घरोघरी मातीच्या चुली भाग 4मोठया जावेला ही तिचा खरा हेतू कळत होता ,आपल्या पैश्यावर तिचे ही घर आणि मुले मोठे होत आहे ,पण अजून किती दिवस हे करावे लागणार हे जेव्हा नवऱ्याला विचारत तेव्हा तो म्हणत जोपर्यंत अर्पिताचे लग्न होत नाही तोपर्यंत ते एकत्र राहतील ,ह्यात मला वाद नकोय..तू मोठी आहेस मोठ्या सारखे रहा…आज भावाला गरज आहे म्हणून मी ही त्याच्या पाठीशी उभा आहे आणि असणार…मुलं मोठी झाली ,तसे मग मोठा भाऊ म्हणाला, “अर्पिता ही माझी जबाबदारी आहे आणि राहील त्यात माघार नाही ,पण आता घर पुरत नाही, मुलांना अडचण होते…तर तुम्ही दोघे त्या भाड्याच्या घरात रहा..”
संपदा, “आता थोड्यासाठी कश्याला वेगळे रहायला सांगत आहात ,होऊद्या अर्पिताचे लग्न मग राहतील वेगळे ते ही, मग उरतो सुमित तर त्याचे करायला ते सक्षम असतील..”
मोठी जाऊ अशी म्हणाली म्हणजे नक्कीच तिने भाऊजीच्या कानात वेगळे होण्याचा मंत्र फुकला आहे ही शंका वृंदाच्या मनात घर करून गेली..आणि इथूनच तिला मोठ्या जाऊ बाई बद्दल राग निर्माण झाला, तिच्या सोबत तिच्या मुलांबद्दल ही राग निर्माण झाला..तेव्हाच ती पुढे येऊन म्हणाली”तुम्हाला आमची आणि आमच्या मुलांची अडचण होत असेल तर हे आम्ही लगेच हे घर सोडतो दादा, आम्ही खूप त्रास दिला आहे पण आता अर्पिताच्या लग्नाची ही जबाबदारी आम्ही आमचीच घेऊ..तुम्ही तुमच्या मुला मुलीचे पहा..”तिला राग आला हे पाहून ,मोठ्या जाऊबाईने तिला समजवण्याचा प्रयत्न केला.”अग वृंदा कधी तरी हे होणार होतेच पण हे आत्ता नको होते आम्हाला, तुम्ही अजून ही रहा आमच्या सोबत..””ताई आधीच सांगायचे तुम्ही मला ,दादाचे कान का भरायचे..!”
“मला हे कधीच जमले नाही ,कान भरणे हे माझे काम नाही हे तुला चांगलेच माहीत आहे हो वृंदा..””वहिनी जाऊदे मी आता थोडा कमावतो आहेच ,तर मी राहू शकतो वेगळा..इतके केले आहेस तू पण घर छोटे पडत आहे हे समजते मला..फक्त दोन दिवस मी घर शोधले की राहू वेगळे आम्ही ” छोटा दिरअर्पिता,मिहीर,विधी सुमित हे सगळे बघतच होते त्यांना खूप धक्का बसला की आपण आता वेगळे होणार हे ऐकून..पण मोठ्यांच्या बोलण्यात ते बोलू शकत नव्हते.तसे सगळ्यांच्या समजुतीने छोटा दोन दिवस राहून वेगळे राहण्याचा निर्णय घेऊन बसला होता..पण छोटी जाऊ रुसली होती ,त्यात ती दोन दिवस कोणाशी ही बोलली नव्हती की पुतण्या आणि पुतणी सोबत ही अबोला धरला होता.इकडे मिहीर आणि विधी काकुला समजावत होते ,तर कधी आईला आणि बाबाला ही समजावत होते..अर्पिता आणि मिहीर दोघांचे खूप छान सूत होते ,तर विधीचा सुमितवर खूप जीव होता आणि आता ते वेगळे झाले तर परत असे सोबत रहायला येणार नाहीत असे वाटत होते..——–सगळे जिकडे तिकडे गेलेदिवस वर्ष सरले..इकडे मिहिरचे लग्न ठरले ,तेव्हा कुठे काकू वृंदा जरा लगीन घर म्हणून दोन दिवस आली ,सोबत सुमित ,अर्पिता ही होती…अर्पिताचे लग्न झाले होते..लग्नानंतर कुठे तरी काहीतरी चर्चा ऐकू आली नवीन सुनेबद्दल आणि मिहिरच्या नात्या बद्दल म्हणून काकू घरी जाऊ की नको जाऊ…पण जावे तर लागणारच…माहिती तर घ्यावी लागणारच..पण मोठी जाऊ बाई तिला शंका येईल हे नक्की…म्हणून ती घरी नसतांना जाऊन येऊ…आणि विधीला विचारू काय शिजत आहे मिहिरच्या आणि निरालीच्या नात्यात..आज ते सगळे विचारून निघणार तोच मोठी जाऊ समोर उभी होती…जणू वृंदाची चोरी पकडली गेली होती…ती मोठा श्वास घेत होती..तेव्हा संपदा म्हणाली, “आलीच आहेस इतक्या दिवसांनी आपल्या घरी तर जरा बसून बोलू..काही महत्वाचे बोलायचे आहे तुझ्यासोबत मला..”वृंदा जरा चपापली आणि आता नक्कीच आपली पोल खुलणार ह्या भीतीने ती जाण्याची घाई करू लागली…”मी निघते ताई हो..सुमितला जेवण वाढायचे आहे ,आणि अर्पिता घरी येणार आहे आज..मग मी घरी असायला हवे हो..””बस ग ,इतकी काय घाई मी सुमितला बोलवले इथेच ,अर्पिताला ही बोलवले सरळ इथेच..हम्मम “”हो हो काकी आज इथेच मिळून स्वयंपाक करू, तुम्ही थांबा इथेच. ” निराली म्हणालीकाकू थांबते का पाहूक्रमशः ????

“थांब ग काकू किती पळापळ तुझी, किती दिवसांनी मोकळा वेळ मिळाला आहे आपल्याला ,मग अर्पिता ताई ,सुम्या आले तर मज्जाच मजा..” विधी” बघ दोघी थांब म्हणत आहेत ग ,त्यात माझा आग्रह म्हणजे तुला नक्कीच थांबाव लागणार वृंदा ,ती तुझ्या हातची दाल बट्टी होऊन जाऊ दे.” मोठी जाऊ हात धरून तिला खाली बसवत
वृंदा, “काय ताई, तुम्हाला तर माझ्या हातची बट्टी आवडत नाही ना ,तरी गम्मत करत आहात का माझी..?”
“तुला खूप दिवसांपासून काही सांगायचे म्हणत आहोत आम्ही ,पण तुझ्या दादाने आणि भाऊजी यांनी माझ्यावर एक कठीण जबाबदारी सोपवली आहे वृंदा…मन घट्ट करशील जरा ” मोठ्या जाऊबाई तिला धरून जवळ बसवत म्हणाल्यावातावरण जरा शांत आणि गूढ झाले होते ,जाऊबाई अश्या का म्हणत आहेत हे वृंदाला कळेना….त्यात दोघी जणी विधी आणि निराली आई कडे खूप साशंक नजरेने पाहत होत्या…काय झाले कोणाला काही कळले नाही..पण आता त्या तिघी त्यांच्याकडे बघत होत्या…काय झाले असे इशाऱ्याने विचारत होत्या..संपदा, “थांब जरा दादा येत आहे अर्पिताला घेऊन घरीच तेव्हा खुलासा करते माझ्या बोलण्याचा..”तोपर्यंत कोणाला ही धीर होत नव्हता ,इकडे अर्पिता का येते अचानक हे समजल्यावर वृंदाला छातीत धडधडत होते,आता अजून काय नवीन तक्रार, ह्यांना काही समजले तर नसेल ना अर्पिताच्या बाबत…आता माझ्या घरातील बाब चोहट्यावर येणार ,सगळी इज्जत मातीत जाणार..मी लोकांच्या घरचे वाद जाणून घ्यायला आले आणि इथे माझ्याच घरचे प्रकार उघडकीस येणार आहे बहुतेक…ह्या अर्पिताचे मिहिरला न राहून सगळे सांगितले असणार.
वृंदा चलबिचल करत आत बाहेर करत होती दर झटकत होती…कोणाकडे ही बघत नव्हती..तिला घाम फुटला होता..तोंडात काही तरी बडबडत होती… बोटे मोडत होती..अशांत होती नजर..बाहेर डोकावत होतीइकडे विधी आणि निराली काकू असे का वागत आहे ,काय बिघडले आहे बघत होत्या…त्यांना अजून ही काही कळत नव्हते..निरालीने लगेच मिहिरला फोन लावला.”हॅलो, कुठे आहात तुम्ही घरी कधी येणार आहात ,आम्ही सगळ्या तुमची वाट बघत आहोत..आणि अर्पिता ताई ही आहेत ना ? “इकडे अर्पिता नाव ऐकताच काकू निरालीकडे गेली आणि म्हणाली ,”कुठे आलेत हे दोघे ,तू विचारलेस का कुठे आहेत ते ??'”निरालीने काकुला शांत बसायला सांगितले आणि म्हणाली,”मी ह्यांना फोन केला आहे आणि ते जवळच आहेत, येतील इतक्यात, तुम्ही स्वस्थ बसा ,दगदग नको काकू..””तू अजून नवीन आहेस बाई ,तिला संसारातील अडचणी नाही ग माहीत ,काय काय भोग भोगावे लागतात आई वडिलांना मुलं सुखी नसल्यावर..” काकू डोक्याला हात लावून रडत म्हणाली
इकडे संपदा आणि विधी ही जवळ आल्या आणि तिला समजावू लागल्या, धीर देत संपदा म्हणाली, “आता काही काळजी करायचे कारण नाही, फक्त तू धीर धर अर्पिता आल्यावर बोलू आपण तिच्याशी… फक्त तिच्यावर रागवू नकोस…तिला आपली गरज आहे, आपल्या स्पोर्ट ची गरज आहे..”वृंदा पटकन फिरून संपदाकडे बघते ,त्या नजरेत खरे उघडकीस आले आहे आणि ते जाऊबाईला ही कळले आहे ,पण कसे कळाले हा भाव दिसून येतो..ती आलेल्या संकटाला घाबरलेली नसते ती घाबरते ते फक्त आपली दुखरी बाजू लोकांना कशी कळली म्हणून…शेवटी हे भाऊबंदच आहेत ,ह्यांना आपले दुःख ऐकल्यावर आंनदच होणार…आम्ही कसे अडचणीत सापडलो ह्याचे सुख मिळणार आता..”ताई तुम्हाला काय म्हणायचे आहे..?” वृंदा”ये दे दोघांना मग कळेन तुला मी काय सांगते ते ,मी त्या दोघांची वाट बघत आहे..” संपदा”मला माहीत आहे ,पण तुम्ही काय केले ते सांगा ताई ” वृंदा अधीर होऊन विचारते”काही नाही मी जे केले ते तू आधीच करायला हवे होतेस बरं वृंदा ,तुझा स्वभाव नडला ह्या गोष्टी ला , नाहीतर प्रकरण हाता बाहेर गेले नसते ,कळतंय का तुला..” संपदा आता वृंदाला ओरडून बोलत होती..ती संतापली होती वृंदावर..”काय काय केले हो मी असे ,की तुम्ही मला दोष देत आहात मयझ्यावर ओरडत आहात अश्या..मी सहन केले तुम्हाला खूप आता नाही, हे आमचे मॅटर आहे ते आम्ही बघून घेऊ जाऊबाई..” आता वृंदा ही संतापली आणि रागवली.क्रमशः???

घरोघरी मातीच्या चुली असतात भाग 6″काकू काय करतेस तू हे असे ,आईवर का ओरडतेस अशी ,तुम्ही दोघी समजदारी ने घ्या ,काय हा प्रकार आहे कळू द्या..” विधीतितक्यात सुमित ही येतो आणि तो ही पटकन येऊन त्याच्या आईकडे जाऊन तिला ओरडतो

“किती वेळ तुला शोधायचे ग ,मला सांगून आलीस की तू आज मामाकडे जाणार आहेस आणि वेळ लागणार आहे..आणि तू इथे आलीस..खोटं का बोललीस ,मी ही आलो असतो ना ह्या घरी ,भेटलो असतो विधी दिदीला आणि वहिनीला…मग हे खोटं का सांगून आलीस. आणि त्या सारंग काकू वहिनी बद्दल बोलत होत्या ते ऐकल्यार तू इकडे असशील हे वाटलेच होते मला…?”आता वृंदाचे खोटे पकडले गेले होते…तिला इथे का यायचे होते त्याचे कारण फक्त घरातील नवीन सुनेच्या बाबतीत काही वाही ऐकले ते खरे आहे का जाणून घ्यायचे होते..वृंदा अजून चपापली ,आपला हेतू जाहीरपणे सगळ्यांना समजला ,पण तरी आपले प्रकरण कळाले म्हणजे अजून नाचक्की होईल..मुलगी आगाऊ सांगून बसली असेल तिला झालेल्या त्रासाचे किस्से ह्या लोकांकडे..”विधी आणि निराली जा तुम्ही जाऊन सगळ्यांसाठी चहा ठेवा ,आणि हो सुमितला ही काही करून खाऊ घाला त्याला भूक लागली असेन ,त्याला भूक सहन होत नाही ,मग तो चीड चीड करतो…” संपदा
सुमित लगेच काकूच्या गळ्यात पडतो आणि म्हणतो ,”काकू तुला माझ्या सगळ्या सवयी माहीत आहेत ग अजून ही ,किती वेगळी आहेस ग तू किती काळजी आहे ग तुला अजून ही आमची..”इकडे अर्पिता आणि मिहीर घरात येतात…अर्पिताला पाहून वृंदा एकदम तटस्थ उभी राहते.. तिला जरा ही तिची कदर नाही असे तिच्या देहबोलीवरून समजते..मिहीर अर्पिताची बॅग खाली ठेवतो आणि तिला घरात धरून आणतो..तिची अवस्था खूप नाजूक झालेली असते ,रडून रडून डोळे लाल झालेले असतात, डोळ्या खाली काळे डाग असतात ,जरा सूज ही असते…केस कसे तरी विस्कटलेले अशी जणू किती दिवस फनी फिरवली नाही की स्वतःकडे लक्ष दिले नाही. ती जणू मानसिक दबावाखाली वावरत होती असे जानवत होते ..
बॅग खाली ठेवतात वृंदाचे लक्ष त्या बॅग कडे गेले ,अरे ही तर अर्पिताची बॅग आहे ,ती कोपऱ्यात जरा शिवलेली होती ,त्यावर तशीच धूळ होती…हे तिला कळले ,मागच्या वेळी मीच तिची ही बॅग शिवली होती…म्हणजे याचा अर्थ अर्पिता घर सोडून आली ,कपडे सगळे भरलेले दिसत होते ,एक दिवासाठी येऊ का म्हणत होती काल आणि आज ही इतकी मोठी वजनदार बॅग घेऊन आली जणू इथे महिनाभर राहणार आहे..वृंदाने लगेच तिच्याकडे वळली आणि तिचा हात कचकन धरला आणि रागाने तिच्या कडे नजर टाकली, जणू नजरेत आग होती…तिला विचारत होती तू इकडे अशी कशी निघून आलीस…तिकडे रहा सांगून ही सासर सोडून आलीस कशी…वृंदाने हात धरतात अर्पिता धायमोकलून रडू लागली ,तिला आईच्या रागाची कल्पना होतीच ,आता ती आपल्याला पुन्हा सासरी जा म्हणणार ,तिथेच रहा म्हणणार…कसे ही असो तू तिथे नांदयचे ,इकडे तक्रार घेऊन यायचे नाही…माघारी येत नसतात लग्न करून दिलेल्या मुली, सासरी काही त्रास असला तरी सतत तो माहेरी सांगायचा नाही, नवरा म्हणणे तसे करायचे..भांडण चार चौघात येऊ द्यायचे नाही हे तिला सांगितले होते आईने पण अति मार खाऊन सन्मान गमावून तिला सासरी रहाणे मुश्किल झाले होते , मग कोणाला सांगितले तर बघ ही ताकीद दिली होती…पण आज मिहिरचा अश्यात फोन आला आणि आपल्या भावाला काही सांगायचे नाही ठरवून ही त्याने तिच्या आवाजावरून ओळखले आणि तिला खरी परिस्थिती सांगण्यास भाग पडले…
महिरला हे प्रकरण आधीच माहीत होते ,त्याच्या मित्राने संगीतले होते..म्हणून पूर्ण खात्री करून घेतल्याशिवाय काही पाऊल उचलायचे नाही हे ठरवले ,मग आपण आपल्या छोटीला सरळ विचारू म्हणून फोन केला..मिहीर जवळपास सहा महिन्यांपासून ह्या प्रकरणाचा शोध लावत होता…त्याला आपली बहीण खरंच सुखात आहे की ती काही लपवते हे कळत नव्हते ,मग त्याने मित्राला शोध घ्यायला लावला…आणि तेव्हा कळले जे चालले आहे ते ठीक नाही..इकडे एका मित्राने सुचवले की, तुला एक स्थळ आहे ,तू लग्न करशील तर बरेच प्रश्न सुटतील, तुझी बहीण सुखी होईल आणि सासरचे त्रास ही देणार नाहीत हे नाते केल्यावर..मिहीरला मित्राच्या बोलण्यात तथ्य वाटले ,ती मुलगी म्हणजे बहिणींची नणंद होती ,तिला लग्न करून आणले तर मला त्या घरात जावई म्हणून जोडता येईल मग माझी बहिण तिला कोणी त्रास देण्याचा विचार ही करणार नाही…पण झाले भलतेच ,त्याला घरातून बाबांच्या मित्राच्या मुलीचे स्थळ आले…खूप समजावून सांगितले पण कोणी ऐकले नाही…मग निराली सोबत लग्न जुळले…ती चांगली मुलगी आहे हे पटत होते पण बहिणीला सुखात बघण्यासाठी तिच्या नंदे सोबत लग्न करणे ही जास्त गरजेचे होते…इकडे मिहीर हळूहळू गुंतत चालला होता निराली मध्ये ,पण मग अचानक पुन्हा आपली बहीण सुखात नाही हे कळल्यावर जरा त्यावर लक्ष देण्यासाठी तो बाहेर पडत होता… इकडे निराली नव वधू ,तिला नवऱ्याचा वेळ हवा तसा मिळत नव्हता…तिला ह्यात काही तरी शंका येत होती..आपण नाते टिकवू शकत नाही की त्यांना हे नाते मुळात आवडले नाही म्हणून दुर रहात आहे हे कळत नव्हते…त्यात मिहीर ने ही तिला काही कळवले नव्हते…क्रमशः????

घरोघरी मातीच्या चुली असतात भाग 7अंतिमबरेच दिवस तिला ही घरात करमत नव्हते, नवरा असे का वागत आहे समजायला मार्ग नव्हता..त्यात विधीला ही तिची चिंता समजून येत होती, दादा विचित्र वागतो हे पटत नव्हते ,पण दादा नक्कीच काही तरी लपवत आहे हे कळून चुकले होते…म्हणून ती जास्तीत जास्त वेळ निराली सोबत तिला समजवण्यात ,साथ देण्यात घालवत होती…दादाचे कौतुक करत तर कधी निराली ला हिम्मत देत होती…काही नाही बघ सगळे ठीक होईल..हे तिचे बोल होते..आज सगळ्या गोष्टींचा खुलासा झाला…मिहीर का सतत बाहेर असायचा ,तो का कोणाशी ही काही बोलत नव्हता…त्याने ही गोष्ट फक्त आई कडे आणि बाबांकडे बोलून दाखवली…काकाला ही सांगितले… पण काकुला काहीच कळू दिले नाही…कारण काकू ह्यात पडली तर कोणाला ही काही करता येणार नाही..——–आज तेच दिसत होते वृंदा (काकूच्या) चेहऱ्यावर ,तिला अर्पिताची दया ही नाही आली, उलट राग राग ,आणि आग पखड.. मुलीला काय त्रास होत असेल ,ती कसल्या मानसिकतेतून जात असेल हे जाणून ही घ्यायचे नव्हते जणू तिला..फक्त ती सासर सोडून घरी का आली ,ते ही सगळ्यांना का हे सत्य सांगितले…आपल्या आपल्यात का ठेवले नाही..माझ्या अहंकाराला चुर केलं…लेक मोठ्या घरी दिली आहे ,सुखात मजेत ,ऐश्वर्यात नांदत आहे…हेच मी किती सांगत होते त्यावर पाणी फिरवले…आमची लेक जावयला सगळे सुख देते, तिला ही तो हवे ते देतो सांगण्यात मी गर्वाने फुलायचे आता सगळे पितळ उघडे पडले ह्या पोरीने…वृंदा कडे लेकीने धाव घेतली ,आणि गळ्यात पडली पण आई ने तिला जणू हात ही नाही लावला.. ती तशी तटस्थ होती
वृंदा, “अर्पिता तुला जरा ही धीर नव्हता का ,लगेच सासर सोडून मिहीर सोबत आलीस निघून..?”
हे म्हणताच सगळे जण तिच्या ह्या बोलण्याकडे आणि वागण्याकडे बघतच राहिले ,कमाल तिच्या ह्या निगरगट्ट पणाची ,आई असून अशी कशी बोलू शकते ही बाई..संपदा ने तिला चांगले झापले, “अग आई आहेस ना तिची ,मग तिला धीर दे म्हणाले होते मी तुला तर तू तिला ढकलते दूर..””राहू द्या मी अशी आहे कारण जास्त लाड केले की ती नांदने मोडून येईल आणि नवरा ही सोडून देईल हो ताई ते मला परवडणार नाही..” वृंदा”काकू ती आता परत तिथे जाणार नाही ,आज मी गेलो नसतो वेळेवर तर आज अर्पिता आपल्यात नसती..तिला मारले असते जाळून त्यांनी कळते का तुला..” मिहीरवृंदाला आता काहीच कळेना हे काय ऐकत आहे ती मिहिरच्या तोंडून…तिला आता त्याचे शब्द दुखावून गेले ,आणि डोळ्यात अश्रू उभे राहिले तशी ती खाली कोसळली ,ती ही रडू लागली
संपदा आणि मिहीर बाकी सगळे स्तब्ध होते ,की असे कसे हे सासरचे आहे की आमच्या लेकीला जाळून टाकायला निघाले..आज वेळीच आम्ही पोहचलो नसतो तर काय हा अनर्थ झाला असता..तरी वृंदा लेकीला सासरी पाठवत असायची ,जरी तिला सासरी जाण्याची इच्छा नसली तरी ,नेहमी मार खाणे..उपाशी ठेवणे…कोंडून ठेवणे हे प्रकार आता आता सुरू केले होते…कशी बशी अर्पिता पळून जीव वाचून यायची आणि तिची आई तिला पुन्हा त्या नरकात पाठवायची का तर लोक काय म्हणतील म्हणून..इज्जती खातर सहन करू म्हणायची..मग अर्पिता काही झाले तरी कोणाला ही सांगत नसे कारण तिला आपल्याच घरच्यांची साथ नसे..मिहीर, “काकू तिला मेलेले बघायचे आहे की तिला माहेरी ठेवायचे आहे ते ठरवा ,पण मग आयुष्यभर आपल्याला आपली अर्पिता दिसणार नाही..”हे म्हणताच वृंदा जोर जोरात टाहो फोडून रडू लागली ,तिला हे दुःख दाबता येत नव्हते..तर कणखर ही राहू शकत नव्हती..अर्पिता महत्वाची आहे हेच खरे…नुसत्या दिखाव्यासाठी मोठ्या घरात लग्न करून दिले पण पाहिले नाही की माणसे कशी आहेत..पाहिले नाही की लेक सुखी आहे की नाही…आणि तिने सांगितले तरी वेळीच दखल ही घेतली नाही…लेकीला ह्या ऐश्वर्यात गुदमरुन टाकले…विधी आणि निरालीला खूप धक्का बसला ,त्या ही घाबरल्या होत्या की असे ही सासर असू शकते ,जरा ही कदर न करणारे ,असा ही नवरा असू शकतो जनावरा प्रमाणे बायकोला त्रास देणार..लोकांचे ऐकले होते पण तेच आपल्या घरात आपल्या लेकिसोबत झाल्यावर पाया खालची जमीन हदरली
आता निरालीला आपल्या नवऱ्याबद्दल अभिमान वाटत होता ,किती चांगला आहे मिहीर ,किती दक्ष भाऊ आहे ,किती गुणाचा मुलगा आहे…तिला मनोमन अभिमान वाटत होता…कळले सगळेच बंधन बंधन नसतात…आपण उगाच समजयचो बाबांनी मैत्रीच्या बंधन निभवायसाठी माझा बळी दिला..पण आता इथून पुढे तसे वाटणार नाही हे नक्की.संपदा, “वृंदा तुला जर अक्कल आली असेल ह्या प्रसंगातून तर आपण आता अर्पिताच्या काडी मोड घेण्यासाठी प्रकरण सुरू करू…अर्पिता पुन्हा तिथे जाणार नाही हे आमचे ठरले आहे पण तुझा शिक्कामोर्तब हवा आहे…परत जर तुझे मन बदलले तर सांगा…अर्पिताला पुन्हा सासरी पाठवू..”वृंदा लगेच संपदाच्या पाया पडते आणि आपली चूक कबूल करते आणि म्हणते मला माझी लेक हवी आहे ताई…मी चुकले आता तुम्ही तिची आई आणि काकू म्हणून काय योग्य तो निर्णय घ्यायचा तो घ्या…इकडे सगळेच ठाम होते ,सुमित ही ताईला परत जाऊ देणारच नाही मी त्या सैतान कडे ह्यावर आडला होता.. मिहीर ही काका आणि बाबासोबत जाऊन पोलीस हिंसाचारबाबत तक्रार करण्यासाठी आता बाहेर पडला होता..कथा समाप्त…घरच्या लोकांनी मुलीला लग्न करून दिले म्हणजे जबाबदारी संपली असे समजू नका, आता खरी जबाबदारी सुरू झाली हे लक्षात असू द्या..©®अनुराधा आंधळे पालवे

7 thoughts on “घरोघरी मातीच्या चुली”

  1. Hello! Do you know if they make any plugins to assist with SEO?
    I’m trying to get my site to rank for some targeted keywords but I’m not seeing very good gains.
    If you know of any please share. Many thanks! You can read similar blog here: Backlinks List

    Reply
  2. Hello! Do you know if they make any plugins to help
    with SEO? I’m trying to get my blog to rank for some targeted keywords but I’m not seeing very good results.
    If you know of any please share. Thank you! I saw similar article here:
    List of Backlinks

    Reply

Leave a Comment