गुंतता हृदय हे भाग 33 ©शिल्पा सुतार

गुंतता हृदय हे भाग 33तु खरच माझ्या वर प्रेम करतो का?©️®️शिल्पा सुतारकबीर मीटिंग साठी निघाला. त्याने मामाला काही सांगितल नाही. केबिन ही लॉक करून घेतली. या आधी मामाचा एवढा राग कधी आला नव्हता. तो उगीच त्रास देतो.कबीर डीटेक्टीव एजन्सीच्या ऑफिस मधे आला. छान ऑफिस होत. लगेच त्याला केबिन नंबर चार मधे बसवलं. जरा वेळाने एक माणूस समोर येवुन बसला.” मी राकेश तुमची केस माझ्या कडे असेल. केस बद्दल सांगा. “कबीर बोलत होता. राकेश ऐकत होते.” ठीक आहे. आता तुम्हाला काय अपेक्षा आहेत?””हे खरच घडल का ते बघायच आहे? आणि मामाची चौकशी करायची आहे. परांजपेंची ही.” कबीर म्हणाला.”कामाला थोडा वेळ लागेल. जुनी गोष्ट आहे. आधी कोणत काम व्हायला हव?” राकेश डिटेल्स घेत होते.”आधी जुनी केस, नंतर परांजपे, शेवटी मामा. ” कबीर म्हणाला.”चालेल. मला काही डिटेल्स लागतील. तुमची मदत ही. “ते प्रश्न विचारत होते . कबीर सांगत होता.”आत्ता पुरत हे ठीक आहे. काही वाटल तर फोन करतो. “”हो पण हे कोणाला समजायला नको. गुपचुप चौकशी करा.” कबीरला वाटल की चौकशी सुरू आहे अस समजल तर गुन्हेगार एक्टीव्ह होतील. काम होणार नाही.”नाही समजणार. “कबीरने पेमेंट केल. एक फॉर्म होता त्यात माहिती भरली.कबीर ऑफिस मधे परत आला.खुशीला भेटावसं वाटत आहे . आज दुपारी महत्वाची मीटिंग आहे. कधी भेटू तिला समजत नाही. तिच्याशी बोलाव लागेल……सतीश राव ऑफिस मधे पोहोचले. तिथले मालक पाटील साहेब ते येवून भेटले. त्यांच्या अजून बर्‍याच कंपनी होत्या. हे सिक युनीट सतीश रावांच्या हाताखाली होत.”या युनीटच डीसीजन पूर्ण पणे तुमचा असेल परांजपे साहेब. तुम्ही आणि ही कंपनी, आम्ही मधे मधे करणार नाही. तशी ही कंपनी दोन वर्ष झाले बंद होती.” पाटील म्हणाले.” का बंद होती?” सतीश राव विचारत होते.पाटील सांगत होते.”कामाला उशीर लागेल. लगेच मिरॅकल झाल्या प्रमाणे कंपनी जोरात सुरू होणार नाही. एक तर इथे काहीच नाही. ऑर्डर ही मिळवाव्या लागतील. ” सतीश राव म्हणाले.” हो समजल. या कंपनी साठी खर्चाची रक्कम या अकाऊंट वर आहे. हा तुमचा असिस्टंट.”एक मुलगा समोर आला. “मी विजय. “”तो तिकडे मॅनेजर होता. त्याला कंपनी ठीक कशी करतात ते शिकायच आहे म्हणून त्याने इथे तुमच्या हाताखाली काम मागून घेतल. ” पाटील सांगत होते.” हुशार दिसतो आहे विजय. “थोड्या वेळ बोलल्यानंतर पाटील साहेब गेले. ते सतीश राव जॉईन झाल्यामुळे खुश होते.सतीश राव, विजय सगळीकडे फिरून बघत होते. सुरुवातीला थोडे लोक मदतीला मिळाले होते. त्यांनी एक इंटरनल मीटिंग घेतली. कंपनीच्या साफसफाई पासून मशीन क्लीनिंग पासून सगळं ठरवल. पूर्वी कोणत्या ऑर्डर होत्या. ते बघत होते. कोणते टेंडर निघणार आहेत ते त्यांना माहिती होत. ते सांगत होते बाकीचे लोक लिहून घेत होते.” परांजपे साहेब आज एक मीटिंग आहे. मोठा टेंडर निघणार आहे.” विजय म्हणाला.”चला मग बघून येवू.””पण आपली काही तयारी नाही कंपनी ठीक करायला अजून महिना हवा.””होईल आत्ताशी फॉर्म भरायचा. नंतर रिजल्ट लागेल. ऑर्डर मिळाली तर काम सुरू करायला बराच वेळ मिळतो. या पुढे सगळे टेंडर भरायचे.” सतीश राव म्हणाले.सगळे त्यांच्या कामावर खुश होते. सतीश राव अगदी वेगळा विचार करत होते. खूप शिकण्यासारख होत. थोड्या वेळाने ते मीटिंग साठी निघाले……लंच टाइम मधे कबीर मामाची वाट बघत होता.”प्रशांत साहेब बाहेर गेले आहेत.”राऊत म्हणाले.”मामा कुठे गेला असेल ? “कबीर विचार करत होता.” माहिती नाही. ” राऊत सांगत होते.मामा सतीश राव ज्या कंपनी मधे जॉईन झाले त्या पाटील साहेबांना भेटायला गेले होते. मीटिंग त्यांच्या दुसर्‍या कंपनीत होती.”तुम्ही त्या परांजपेंना जॉईन कस करून घेतल? ते डेंजर लोक आहेत. तुम्हाला माहिती आहे ना त्यांनी आमच्या सोबत काय केल?” प्रशांत मामा म्हणाले.” मला माहिती आहे तुमची केस. आम्ही परांजपे साहेबांना पूर्वी पासून ओळखतो. अतिशय हुशार माणूस आहे. ते लबाडी करू शकत नाहीत. आम्हाला त्यांच्या बद्दल काही प्रॉब्लेम नाही. ते खूप चांगले आहेत. आम्हाला, आमच्या कंपनीला त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल. ” पाटील साहेब म्हणाले.” विचार करा एकदा. ते चांगले लोक नाहीत. ” मामा परत म्हणाला.” आम्ही आमच बघून घेवू. या पुढे अस भेटायला बोलवायच नाही. ” पाटील साहेब उठून निघून गेले.थोड्या वेळाने मामा कंपनीत परत आला. वैताग आहे या परांजपेचा. त्या माणसावर सगळेच विश्वास टाकतात. तर त्याची पोरगीही इथे मला त्रास देते. काय कराव अस झाल आहे. कबीर ही ऐकत नाही माझ्याशी बोलत नाही. मला इथे वेगळया केबिन मधे बसवल. त्याने बेल वाजवली. काका डबा घेऊन आले. ते एकटे जेवायला बसले…..कबीर मीटिंग साठी निघाला. राऊत सोबत होते.वेगवेगळ्या कंपनी मधून खूप लोक टेंडर मीटिंग साठी आले होते. सगळ्यांना नंबर दिले होते. सुरूवातीची माहिती दिली जात होती. मोठ काम होत. शिस्त बध्द काम सुरू होत.राऊत सतीश रावांकडे बघत होते. परांजपे आहेत ना हे? बरोबर आहे. ते पाटील इंडस्ट्रीज मधे जॉईन झाले. त्यांच लक्ष नव्हतं. ते मनापासून मीटिंग मधे काय सांगता ते ऐकत होते.”कबीर साहेब… परांजपे.” राऊत हळूच म्हणाले.”कुठे?” कबीर इकडे तिकडे बघत होता. त्यांने खुशीच्या घरच्यांना प्रत्यक्षात बघितल नव्हत.”ते साहेब. व्हाइट शर्ट.””ते इथे कसे?” कबीरने विचारल.”त्यांना पाटील कडे जॉब मिळाला.””कोणती फॅक्टरी?””बहुतेक सीक युनीट.”कबीर बघत होता परांजपे सर किती इप्रेसीव दिसतात. खूपच हुशार वाटत आहेत. माझ्या वडलांच्या वयाचे. तरी किती एनर्जी. त्याला त्यांच्या कडे बघून छान वाटत होत. माझे वडील असते तर असे दिसले असते. परांजपे साहेबांकडुन पॉझिटिव्ह एनर्जी मिळत होती. शांत सात्विक चेहरा. कामा बाबतीत सिरीयस. खुशी थोडी अशी दिसते तिच्या बाबांसारखी.मधेच कबीरला कसतरी वाटल. या लोकांना आपण त्रास दिला. त्यांची कंपनी काढून घेतली. खुशी किती सांगत होती माझे बाबा आजारी आहेत. त्यांना आमच्या घरी राहु दे. तिकडे गैरसोय होते आहे. तरी आपण तीच ऐकल नाही. या साहेबांकडे बघून वाटत नाही ते कोणाला त्रास देतील. तो बराच वेळ त्यांच्या कडे बघत होता. त्याला वाटत होत जावून त्यांच्याशी बोलाव.मीटिंग झाली. सगळे एकमेकांना भेटत होते. परांजपे साहेब सगळ्यांशी बोलत होते.”आम्हाला समजल तुमच्या बद्दल.” एक दोन म्हणाले.”जावू द्या त्या बद्दल बोलण्यात काही अर्थ नाही.” सतीश राव म्हणाले.”आता काय पुढे? तुम्ही अशी नोकरी करताय. “” काही नाही परत सुरुवात करायची. चोरीला गेलेल्या गोष्टी परत मिळतात का? एकदा आपल्या हातातून कंपनी गेली तर गेली. होईल काहीतरी देवाच्या मनात असेल ते. ” सतीश राव म्हणाले.कबीर समोर उभा होता. तो कोणाशी तरी बोलत होता. कोण आहे हा यंग मॅन. ते त्याच्या कडे बघत होते. छान मुलगा आहे. डॅशिंग अगदी.” हा कोण आहे.” त्यांनी विजयला विचारल.तो सतीश रावांकडे बघत होते.” तुम्हाला माहिती नाही का साहेब ? तुमची कंपनी घेतली ना याने. कबीर भालेराव.””काय? हा आहे का तो?” या आधी कधीच त्याला बघितल नव्हतं. इतक झाल तरी सतीश राव कधीच भांडायला गेले नाही.हा खुशीचा मित्र आहे? बरोबर आहे प्रचंड देखणा आहे. हा कॉलेज मधे तिच्या सोबत असेल तर कोणीही त्याच्या प्रेमात पडेल इतका तो रूबाबदार दिसत होता . मुलगा तर चांगला वाटतो आहे. मग अस का केल असेल?सगळं चांगल असत तर हा मुलगा खरच खुशीसाठी चांगला होता. बाकीच्या लोकांशी ही चांगल बोलतो आहे. याच्या मनात आमच्या बद्दल इतका द्वेष असेल? की खुशी म्हणते तस मामा मुळे याने अस केल असेल? या लोकांची चौकशी करावी लागेल.”चला परांजपे साहेब.” विजय बोलवत होता. ते तिथून निघून गेले…….कबीर ही थोड्या वेळाने ऑफिस मधे आला. अजूनही तो परांजपे बद्दल विचार करत होता. खुशी म्हणते ते बरोबर आहे वाटत. तिचे बाबा चांगले वाटतात. आता चौकशी होईलच. कोण बरोबर कोण चूक ते समजेल.त्याला खूप वाटत होत खुशीला फोन करावा. पण काय बोलणार. त्यात ती रागावलेली आहे. त्याने मोह आवरला…..अंजली ऑफिस मधून लवकर निघाली. खुशी तिला रस्त्यात भेटली. दोघी कॉफी शॉप मधे आल्या.”काय सुरू आहे सध्या खुशी?””आता एमबीएची तयारी तेच योग्य आहे. ऑफिस मधे कस आहे वातावरण?”खुशी विचारत होती.” नेहमी प्रमाणे कबीर बिझी असतो मामा रोज येतात आता. “”बर झाल मी ऑफिस मधे नाहिये .नाहीतर मला मामांनी त्रास दिला असता. “”तुमच काय सुरू आहे हे? कबीर का अस वागतो? तुम्ही दोघ आधी सोबत होते का?” अंजलीने बोलायला सुरुवात केली.”हो अंजली मॅडम.””खुशी प्लीज मला अंजली म्हण.””कबीरने कॉलेज मधे माझ्याशी ओळख वाढवली. म्हणजे आम्ही कॉमन फ्रेंड द्वारा भेटलो. मी त्याच्याशी बोलायला इंट्रेस्ट दाखवला. आमची मैत्री झाली. त्याने गोड बोलून माझ्या कडून सही घेतली. काय सांगणार आता जावू दे. माझीच चूक झाली. मला समजल नाही तो अस का करतो ते. नंतर ही कसा वागला तुला माहिती आहे अंजली. मला ऑफिस मधे कामाला लावल. मी किती रीक्वेस्ट केली की आई बाबांना आमच्या घरी राहू दे तरी त्याने ऐकल नाही. घरी अजून माहिती नाही. मी त्याची असिस्टंट होती. ” खुशी म्हणाली.” तू त्याला सर का म्हणते? “” त्याने सांगितल होत. की मी तुझा बॉस आहे काही मॅनर्स आहेत की नाही. “” एवढ? “” हो ना. खूप ओरडायचा. “”मग आता काय ठरलं तुमच?”कॉफी आली. अंजलीने खुशीला कप दिला.”काहीच नाही. मला त्याच्याशी बोलावसं वाटत नाही. इतक काही घडून गेल ना. तेच आठवत. ” खुशी म्हणाली.” काल तुला सोडायला आला तेव्हा काही म्हणाला का? “” विशेष नाही. श्रुती ही सोबत होती. ” खुशीला सांगायला कसतरी वाटत होत की कबीर लग्नाबद्दल विचारतो आहे.”पण तो तुझ्यावर खूप प्रेम करतो. त्याच्या कडे बघून समजत. ” अंजली म्हणाली. खुशीला ही ते दर वेळी जाणवत होत. तरी ती दुर्लक्ष करत होती.”आता काय उपयोग अंजली. सगळ संपल. ” खुशी म्हणाली.” अस का म्हणतेस खुशी?”” साधे आपले पाच रुपये जरी हरवले किंवा कोणी घेतले तरी किती हळहळ होते .इथे आमचे सगळं गेल ते ही कबीर मुळे. माझ्या आई बाबांना बहिणीला किती त्रास होत आहे. माझ्या मनातून हे जाणार नाही. जावू दे नको तो विषय. मला कबीर बद्दल माहिती सांग. “”अग तो खूप चांगला मन मिळावु हेल्प करणारा असा आहे. खडूस बॉस नाही. आता असा का करतो ते समजत नाही. ” अंजली म्हणाली.”त्याच्या मनात कोणी तरी काहीतरी भरवल असेल. पण त्याने ही शहानिशा करायची ना. ” खुशी म्हणाली.”बहुतेक मामा. “”हो ते मामा वाटता आहेत. पण का अस केल असेल?”” त्यांच्या काहीतरी स्वार्थ असेल.” अंजली म्हणाली.” ते मामा कायम त्यांच्या घरी असायचे का? “” हो वाटत. “”का अस?””माहिती नाही. “”अजून कोण कोण आहे तिकडे ?” खुशी माहिती विचारत होती.”आई भाऊ आणि मामाच कुटुंब. ती मामी तिचे मूल खूप चांगले आहेत. “” त्याचे बाबा कसे वारले? “” माहिती नाही तो कधीच त्यांच्या बद्दल बोलला नाही. त्यांच तर काही नसेल ना? ” अंजली म्हणाली.” बरोबर तेच असेल. ते कसे वारले हे बघाव लागेल. “” खुशी तू कबीरच्या गावाला जावून चौकशी कर. “अंजली म्हणाली.”तिकडे या लोकांची फॅक्टरी किंवा कंपनी आहे का ?”” हो मोठी फॅक्टरी आहे. खूप शेती आहे. मोठा बंगला. खूप गाड्या. बरेच लोक कामाला आहेत. “” मग इतक असून आमची कंपनी का घेतली? ती कबीर साठी काहीच नाही. त्यापेक्षा फारच श्रीमंत आहे तो. म्हणजे नक्की काहीतरी वेगळं कारण आहे. गैरसमज झाला असावा. माझ्या समोर गरीब म्हणून आला होता. अगदी कॉलेज फी साठी काम करणारा मुलगा. ” खुशी सांगत होती.” का पण? “” पैसे नाही म्हणून मी लोन पेपर वर सही केली ना. त्याने सांगितल आई आजारी आहे पैसे हवे आहेत. “खुशी म्हणाली.” ओह. खूप वाईट वागला. तो तुला काही म्हणाला का? “” त्यांची प्रॉपर्टी माझ्या बाबांनी घेतली. काहीतरी नुकसान केल आहे अस म्हणतो आहे . काय ते नक्की समजल नाही. तो मोकळ सांगत नाही. माझ्या घरचे म्हणता आम्ही कोणाच काही घेतल नाही जे आहे ते परिश्रमाने मिळवल. “” तु त्याच्याशी नीट बोलून घे ना. “” हो ना, राघव म्हणाला होता चीड चीड करू नको तरी माझी चिडचिड झाली. ” खुशी म्हणाली.अंजलीने दिलेली माहिती खुशीने लिहून घेतली.” थँक्स काही लागल तर विचारेन केव्हाही. तू कुठे राहतेस? “” ती तिच्या बद्दल सांगत होती. मी माझा नवरा सचिन आणि कबीर कबीर एका ग्रुप मधे होतो. मी पुर्वी पासुन कबीर कडे जॉब करते. “” तुझ लग्न झाल? वाटत नाही.”दोघी बोलत निघाल्या. बाय खुशी भेटून छान वाटल. “”थँक्स अंजली आपण नेहमी बोलत राहु.”अंजली गेली. खुशी बस स्टॉप वर आली.चला कबीर बद्दल बरच समजल. आता त्याच्या गावाला जावून त्याच्या बाबांना काय झाल ते बघाव लागेल. पैसे हवेत इकडे तिकडे जायला. मला जॉब हवा. सारखे आईकडे पैसे मागता येत नाही. आई मला तिकडे कबीर कडे जावू देणार नाही. श्रुतीला सोबत घेईन. ती हेल्प करते

Leave a Comment