गुंतता हृदय हे भाग 25

गुंतता हृदय हे भाग 25तु खरच माझ्या वर प्रेम करतो का?©️®️शिल्पा सुतार”खुशी आपल्या लग्नाची तारीख कधी काढायची? मी कधी येवू तुमच्या घरी? ” कबीर म्हणाला.काय बोलतोय हा. काहीही आपल. ती त्याच्या कडे बघत होती.” वाह कबीर सर तुम्ही कोणत्या तोंडाने हे अस म्हणताय ते समजत नाही. आम्हाला त्रास द्यायचा. आमच्याशी लग्न करायच. हे जमणार नाही. ” खुशी म्हणाली.” मला माहिती आहे तू रागावलेली आहेस. तुला माझे कारण कळतील तेव्हा तू काही म्हणणार नाही. मला तुझ्याशी मोकळ बोलायच आहे खुशी. जे झाल ते सगळं सांगायच आहे. ” कबीर म्हणाला.” पण मला काही ऐकायच नाही. आपला काही संबंध नाही. मला माहिती आहे कबीर सर तुम्ही काहीतरी गैरसमज करून घेतला आहे . ते मनात ठेवून तुम्ही आम्हाला त्रास देत आहात. जेवढ मी माझ्या घरच्यांना ओळखते ते असे वाईट लोक नाहीत. मला नाही वाटत त्यांनी तुम्हाला काही त्रास दिला असेल. मग तुम्ही का अस करताय. तुम्हाला माहिती नसेल माझ्या घरचे किती त्रासात आहेत.”
” तुला फक्त तुझ्या घरच्यांचा त्रास दिसतो. बरोबर आहे तुझ्या नजरेत त्यांची इमेज खूप चांगली आहे. “” कस असत ना कबीर सर . कोणी तरी आपल्या इमोशनचा फायदा घेत आपल्याला काहीतरी सांगून देत. आपण तेच खर पकडून चालतो. वाटत असच झाल असेल. जरा डोळे उघडे ठेवा. नाण्याला नेहमी दोन बाजू असतात. तुम्ही बहुतेक एका बाजूला आहेस. तिथून तुम्हाला ते दिसत जे दाखवल जात. जरा सगळ्या बाजूने विचार कर. ” खुशी म्हणाली.” विचार केला चौकशी केली मग ही स्टेप घेतली खुशी.”” ठीक आहे तुम्ही मिळवल ना तुम्हाला हव ते कबीर सर . छान आनंदात रहा मला इथून जावू द्या . मी परत कधीच तुमच्या वाटेला जाणार नाही. ” खुशी म्हणाली.” मला तू हवी खुशी. लग्ना साठी तयार हो. आधी तु माझ्या मागे होतीस आता मी तुला सोडणार नाही. “
” कबीर सर तुम्ही हे मुद्दामून करता आहात ना. काही प्रेम वगैरे नाही. उगीच त्रास देताय. एवढे मोठे साहेब एका नोकर सोबत लग्न. नका अस करु.” ती म्हणाली.” प्रेम आहे. खूप प्रेम आहे. मी दिवसरात्र तुझा विचार करतो. आपल पटत ही. मी येतो आज तुझ्या घरी. “कबीर तिच्या कडे बघत म्हणाला.” नाही अजिबात नाही. बाबा आजारी आहेत त्यांना त्रास देवू नका. आमच्या कुटुंबापासून लांब रहा कबीर सर. “” मग तारीख सांग. लग्न कर माझ्या सोबत रहायला ये. तुझ्या घरच्यांना सोडल. ” तो म्हणाला.
” कंपनी, घर , शेअर्स वापस करा. हीच माझी अट आहे. ” खुशी म्हणाली.”नाही, ते होणार नाही. “” मग हे लग्न होणार नाही. “” अजूनही परिस्थिती माझ्या हातात आहे खुशी. ” तो तिच्या जवळ येवून उभा राहिला. तिच्या अंगावर काटा आला.”असू द्या जो पर्यंत मी हो म्हणत नाही तो पर्यंत तुम्ही काही करणार नाही. मला माहिती आहे. ” ती बाहेर निघून गेली. तेवढी तर ती कबीरला ओळखत होती.कबीर विचार करत होता ही काय म्हणाली. हो बळजबरी मला आवडत नाही.खुशी खुर्चीवर बसली होती. “काका मला थोड पाणी द्या ना.” कबीरला माझे घरचे नको आहेत ना. मग तो का परवानगी घ्यायचे नाटक करतो. तस तो हव ते माझ्या सोबत करू शकतो. पॉवर फूल आहे. ओह माय गॉड. पण त्याने ते केल नाही. थोडा तरी चांगला आहे वाटत हा. मी सत्य शोधेल. कबीरला पटवून देईल आम्ही काही केल नाही….” खुशी काय झालं. चेहरा का उतरला. काही टेंशन? त्या मुलाचा परत फोन आला का? ” अंजली हसत म्हणाली. ती कबीरच्या केबिन जवळ उभी होती. काहीतरी काम असेल.आता एक टेंशन आहे का? हिला काय सांगणार. इथे रोज वेगवेगळे टेंशन असतात.अंजली तिच्याशी बोलत होती.” तू कोणत्या कॉलेज मधे होती खुशी?”खुशीने सांगितल .”अरे वाह टॉप कॉलेज आहे. पुढे काय करणार? “” एमबीए. “” वाह मग अस हेल्परच काम का करतेस? नेहमी ज्यातून काही शिकता येईल अस काम कराव खुशी.” अंजली म्हणाली.”आता काही ऑप्शन आहे का?”अंजलीला माहिती नव्हतं खुशी किती चांगल्या घरची आहे. संकट आल होत. थोडा त्रास तर होणारच.”अंजली मॅडम आधी तुम्ही या ऑफिस मधे नव्हत्या ना ? “”हो मी कबीरच्या दुसर्‍या ऑफिस मधे होती. आता त्याने आम्हाला इकडे शिफ्ट केल.””तुम्ही ओळखतात का कबीर साहेबांना?””हो तो माझा कॉलेज फ्रेंड आहे.” अंजली सहज म्हणाली.”कोणत कॉलेज?”तिने नाव सांगितल. ते कॉलेज इथे नाही. तिने नाव मोबाईल मधे लिहून घेतल.अंजली आत गेली.” खुशी इकडे ये. ” राघव बोलवत होता. खुशीने बघितल कबीर तर नाही बघत.” चल चहा घेवू. ” तो ग्रुप कॅन्टीन कडे गेला.” काय झालं खुशी तुझा चेहरा उतरलेला आहे.” राघवने विचारल. ती बाकीच्या फ्रेंड्स कडे बघत होती ते त्यांचे त्यांचे बिझी होते.”राघव तुला माहिती ना कबीर बद्दल. तो माझ्या घरच्यांना त्रास देतो मला म्हणतो माझ्याशी लग्न कर. कस शक्य आहे?”
“तु या संधीचा फायदा का करून घेत नाही. “राघव म्हणाला तस खुशी त्याच्याकडे बघत होती.”म्हणजे ?””नीट वाग त्याच्याशी .समजून सांग आम्ही काही केल नाही. त्याला तुझ्या बाजूने करून घे. “”अस केल तर आमच लग्न होईल, बाकी काही होणार नाही, माझ्या फॅमिलीला त्रास दिलेल्या मुलासोबत मी रहाणार नाही. “खुशी म्हणाली.” विचार कर काही वेळेस फायदा ही होईल. अस ही तो कबीर खूप मोठी स्ट्रॉग पार्टी आहे. त्याला काही अशक्य नाही. जर त्याने तुझ्याशी बळजबरीने लग्न केल तर तू काय करणार? त्या पेक्षा गोड बोलून काम काढ ना. ” राघव तिला समजावत होता.” तुला काय वाटत मी नीट वागली तर तो आमची प्रॉपर्टी वापस करेल?””नाही करणार पण थोडा तर फरक पडेल. मग तू सावकाश विचार काय झाल ते. ते तुझ्या बाबांना सांग म्हणजे नक्की सस्पेन्स काय ते समजेल. “”हो ना आता नक्की तो का अस करतो ते समजत नाही .””कबीरला तू आवडते ती जमेची बाजू आहे खुशी .यातून गोष्टी चांगल्या होवू शकतात. “खुशी विचार करत होती नक्की काय करू? कबीर सोबत नीट बोलण म्हणजे कठिण गोष्ट आहे. तो मला सारख प्रपोज करतो. लग्न कर म्हणतो.ती आत येवून बसली.थोड्या वेळाने एक सर आले. खुशी बाहेर बसलेली होती. ते तिच्या कडे बघत होते. त्यांच्या कपाळावर आठ्या होत्या. त्यांच्या बरोबर अजून दोन लोक होते.” कबीर कुठे आहे?” त्यांनी रागाने विचारल.”इथे आत मधे.”ते आत गेले. कोण आहेत हे आता? राघव कुठे आहे. त्याला सांगायला हव की फोटो घे. राऊत सर कुठे आहेत त्यांना विचारायला हव….प्रशांत मामा आत आले. कबीर कामात होता. तो सगळ्यांना बघून उभा राहिला. त्यांनी ओळख करून दिली.ते बोलत होते. कबीरला बघून, कंपनी बघून खुश होते. ते कबीरला खूप प्रश्न विचारत होते. त्याला खूप राग आला होता. हे नक्की मला बघायला आले आहेत.
कबीरने बेल दाबली. खुशी आत गेली. “कॉफी सांग सगळ्यांना. तू नाही काकांना आणायला सांग.”” हो सर.” खुशी बाहेर आली. आज कस काय मला नाही म्हटला हा? ते लोक कोण आहेत? एक माणूस सारख माझ्या कडे बघतो आहे. त्याच नाव काय? प्रशांत कोण आहे. दीक्षित काकांनी त्यांच्या बद्दल माहिती विचारली आहे.”ही मुलगी कोण आहे? ” एकाने विचारल. त्यांना आवडल नव्हत. कबीरच्या आजुबाजूला अश्या सुंदर मुली का आहेत.” अशीच इथे काम करणारी मुलगी आहे. कबीर तिला गरज नसेल तर या ऑफिस मधून दुसरीकडे शिफ्ट कर.” मामा म्हणाले.ते लोक आता कंपनी बघत होते.बापरे काय आहे हे? ते लोक सगळीकडे का फिरता आहेत? कोण आहेत ते? कबीर कंपनी विकतो की काय? खुशी घाबरली.ती ऑफिसच्या बाजूला आली. राऊत समोरून आले .” राऊत सर कोण आहेत हे ?”” ते कबीर साहेबांचे नातेवाईक आहेत . “” असे का कंपनी बघत आहेत?””सहज पाहिल्यांदा आले ना म्हणून.””नातेवाईक म्हणजे कोण?””ते मामा आहेत.”” काय नाव? “” प्रशांत .”खुशी अलर्ट झाली. मला काहीही करून यांचा फोटो घ्यायचा आहे. ती राघव जवळ गेली.” राघव तू मला काहीही मदत करत नाही. “” काय करू खुशी. “” या लोकांचा फोटो घे स्पेशल व्हाइट शर्ट वाले. “ठीक आहे.ते लोक गेले. प्रशांत मामा त्यांना बाहेर पर्यंत सोडवायला गेले.” राघव फोटो घे ना.””अस कस घेणार खुशी?” मूर्ख मलाच काहीतरी कराव लागेल. “तिने दीक्षित काकांना फोन केला. “ते प्रशांत ते आलेत ऑफिस मधे. “” ठीक आहे मी बघतो ते भेटतील का. परांजपे साहेबांना सांगतो. ” दीक्षित म्हणाले.खुशीने एक दोन फोटो भराभर काढले.मामांना फोन आला. त्यांनी बघितल दीक्षित. याचा कसा काय फोन आला त्यांनी फोन उचलला.” प्रशांत साहेब आपण भेटू या का? “” काय करणार भेटून. मला वेळ नाही. ” प्रशांत मामा चिडले.ह्या दीक्षितला कस माहिती मी इथे आलो ते. खुशी दिसते तेवढी साधी नाही. हिने पिन मारली. म्हणजे ही माहिती गोळा करते आहे. कबीर नुसता आत बसुन असतो. लक्ष देत नाही.” थोड बोलायच होत. कंपनी बद्दल. “” तुमचं काय राहील आता त्या कंपनीत सगळं आमच्या ताब्यात आहे. आता बोलून काय करणार.” त्यांनी फोन ठेवला. ते रागाने आत आले.खुशी केबिन बाहेर बसली होती. ते तिच्याकडे बघत होते “काय नाव तुझ?””खुशी.”” तू इथे काय करते?”” माझ हेच काम आहे कबीर सरांची असिस्टंट आहे.”त्यांच्या कपाळावर आठ्या होत्या. ही अशी कबीरच्या आसपास राहिली तर काय खर नाही. हीच काहीतरी करायला हवं. ह्या नवीन पार्टी सोबत कबीरच लग्न झाल तर सगळी परिस्थिती माझ्या हातात राहील. ही खुशी घरी आली तर काही खर नाही. ही नको.” तू आता दीक्षितला फोन केला होता का? मी इथे आलो ते सांगितल का? हे उद्योग करते का? थांब कबीरला सांगतो.” त्यांनी मोठ्याने विचारल.कबीर आतून बघत होता. तो पटकन बाहेर आला. खुशी कडे बघितल. ती गरीब तोंड करून उभी होती. तिने कबीर कडे बघितल.”काय झाल मामा? चल आत.”” तुला माहिती का या पोरीने काय केल?”मामा म्हणाले.”काय?”” माझ्या वर लक्ष देवून आहे. “खुशीने नाही अशी मान हलवली. “मला माहिती नाही हे सर कोण ते. आज पहिल्यांदा बघितल.””खोट बोलते का तू? मला दीक्षितचा फोन कसा आला.” मामा ओरडले.”मला माहिती नाही कबीर सर. वाटल तर माझा फोन बघा.” खुशी शांत पणे म्हणाली.” मामा आत चल. ” कबीर खुशीला काही म्हणाला नाही. मामा रागात होते.ते आत गेले. खुशी घाबरली होती. प्रशांत सर किती रागीट आहेत. ते रोज येतील का इथे? कबीर माझ्या बाजूने आहे. खरा व्हिलन हा मामा आहे. कबीर नाही. कबीर तरी थोड ऐकुन घेतो. प्रेमाने वागतो. मामा डेंजर आहे. कबीरशी थोड नीट वागलं तर थोड नीट होवू शकत. कबीरच करेल माझी मदत. त्याच्यावर चीडायच नाही.मामा आत येवून बसले. “कबीर तुला वाटत तेवढी खुशी साधी नाही. भामटी आहे. लगेच इकडच्या न्यूज तिकडे करते. जरा सावध रहा. “”मामा अस तू त्या बाकीच्या लोकांना घेवून इकडे नको येत जावू. आणि तु खुशी वर का चिडला होता? अस करु नको. ती घाबरली होती.” कबीर लॅपटॉप मधे बघत म्हणाला.” मी काय म्हणतोय तुला समजत का कबीर? ती खुशी अतिशय हुशार आहे. ती चौकशी करत असेल. तिला कामावरून काढून टाक.” मामा अजूनही चिडले होते.” करू दे चौकशी. त्याने काय होणार आहे मामा. खुशी निरागस आहे. तिला काही माहिती नाही. ती ऑफिस मधे काम करून थकली आहे. तू उगीच तिच्या बद्दल काहीही सांगू नकोस. “” तुझ्या डोळ्या वर पट्टी बांधली का? तुला चांगले वाईट लोक समजत नाही का कबीर? “” काही करत नाही खुशी. दिवस भर माझ्या डोळ्यासमोर असते. तीच तीच काम करते. आता तर कॉलेज झाल. ती इतकी हुशार असती तर मला सही दिली नसती. तू उगीच तिचा राग राग करतो. ” कबीर म्हणाला.” थोडे दिवस तू या ऑफिस मधे यायच नाही. जुन्या ऑफिस मधे बस मी इथे बघतो. ” मामा म्हणाले.” जमणार नाही. मी इथे काम करेल. हे माझ ऑफिस आहे . “कबीर पूर्वी मी म्हणेल ते ऐकत होता, आता हल्ली विरोध करतो, हे मामांना सहन झाल नाही. ते गप्प झाले. कबीर कामात होता.”आज संध्याकाळी आपल्याला डिनर साठी जायच आहे.””कुठे?””याच लोकांकडे. काल सांगितल होत ना.””मामा मला जमणार नाही.””तुझ कारण दिसल आहे मला इथे आजुबाजूला वावरतांना. तिच्या मुळे होत आहे हे.” मामा परत म्हणाले.”नाही मामा. मी सध्या बिझी आहे. आता हे परांजपे प्रकरण नीट होवु दे मगच पुढच्या गोष्टी. “” त्यात काय नीट व्हायच. आपण जिंकलो. ” मामा गर्वाने म्हणाले.” सगळ आहे खुशी नाही म्हणाली तर या गोष्टीला काय अर्थ आहे. ” कबीर सावकाश म्हणाला.” ती मुलगी आपल्याला चालणार नाही. तू तुझ्या वडलांना विसरला का? “” नाही मी काही विसरलो नाही. मी बरोबर करतो आहे. ज्याना द्यायची ती शिक्षा बरोबर देतो आहे. “”नाहीतर आता अशी परिस्थिती आहे कबीर की तू किती प्रयत्न केले तरी खुशी तुला हो म्हणणार नाही. कशाला दुश्मनच्या पोरीच्या मागे लागतो.”” मला काहीही झाल तरी खुशी हवी. सगळी परिस्थिती आपल्या हातात आहे. मी बरोबर करतो आहे. “” काम पटकन आटोप. “” मामा मी तिकडे येणार नाही. माझा विचार कर. माझ्या मनाविरुद्ध लग्न ठरवु नकोस. “कबीर चिडला.राऊत आले. प्रशांत मामा त्यांच्याशी बोलत होते. कबीर नुसता बसलेला होता. त्याचा विचार सुरू होता. बाकी सगळं तर ठीक आहे मामाचं, पण हा विचार आवडला नाही. तो मला सगळ्या गोष्टीची एवढी बळजबरी का करतो तेच कळत नाही. त्याला खुशी बद्दल काय प्रॉब्लेम आहे समजत नाही. मी मामाचं ऐकणार नाही.सहा वाजले. खुशी आत आली. “मी घरी जावू का कबीर सर ?” तिने सॉफ्ट आवाजात विचारल.प्रशांत मामा. राऊत बघत होते.कबीर हो म्हंटला. थोड हसला. ती पण हसली.ती निघाली. बस स्टॉप वर आली. ती विचार करत होती हीच आयडिया ठीक आहे. त्या कबीरने प्रेमाने वागून माझी सही घेतली. मी पण अस करणार. काट्यानेच काटा निघतो. ती विचार करत होती. अजून बस आली नव्हती. खुशीच्या मागे येणारा तो माणूस समोरून लक्ष देत होता.” एक मिनिट.” तिने आवाज दिला. तो दचकला.”थांबा मला तुमच्याशी बोलायच आहे.”तो माणूस घाईने निघाला. समोरून बस येत होती. तो क्रॉस करून पटकन बाजूला गेला. खुशी त्याच्या मागे गेली. बस जोरात ब्रेक मारून तिच्या जवळ थांबली. खूप गर्दी झाली. खुशी कानावर हात ठेवून उभी होती. लोकांच्या मदतीने ती बस स्टॉप वर येवुन बसली. पाणी पिलं. खूप धडधड होत होती.कबीरचा फोन वाजत होता. बोला.तो घाबरला.”कबीर काय झालं?” मामा विचारत होते.कबीर पळत निघाला. बस स्टॉप वर आला. खुशी बसलेली होती. “तू ठीक आहे ना खुशी? रस्ता क्रॉस करून कुठे चालली होतीस? तुला लागलं का?” तो बघत होता.खुशी त्याच्या जवळ सरकली. त्याने तिला जवळ घेतल. “घाबरायचं नाही.”” कबीर मला घरी जायच.”ही खूप घाबरली आहे. मी सोडायला गेलो तर मामाच काय करू? तो चिडेल. मला सोडणार नाही.त्याने टॅक्सी बोलावली. खुशी घरी निघाली. टॅक्सीत ती विचार करत होती पुढे काय करू या? तो माणूस सापडायला हवा. त्याला सांगू माझ्या मागे यायच नाही. तो अस मागे मागे करतो सारख कबीरला रीपोर्ट करतो. काहीच करता येत नाही.तिने श्रुतीला फोन लावला.” कुठे आहेस खुशी?” श्रुतीने विचारल.”मी ऑफिस हून घरी जाते आहे. “” काही समजल का तो कबीर असा का करतो ते ? “” नाही ना, काहीच समजायला मार्ग नाही श्रुती. आणि त्याला कबीर बोलायच नाही. कबीर सर बोलायच. मोठा साहेब आहे तो.””तुमच ऑफिस, घर घेवून साहेब होतात का? स्वतःच्या कर्तृत्वावर मिळव ना म्हणा इतक. “श्रुती चिडली.”काय बोलणार त्यांना? चोर लोक ते. दुसर्‍याची कंपनी घेतात. मला ना खूप राग येतो आहे. पण ऑफिस मधला राघव म्हणतो की कबीरशी नीट वाग. काय झालं ती माहिती काढून घे. मी काय करू श्रुती?””पण तो कबीर बोलतो का तुझ्याशी? “” हो सारखच लग्न कर म्हणतो. “”म्हणजे त्याला तुझ्या बद्दल प्रेम आहे. तस तर मला ही हे बरोबर वाटत आहे. काय झाल ते समजायला हव .” श्रुती म्हणाली.” काय करू?”” तस कर, कबीर सोबत नीट वाग. पण त्याने तुझ्याशी लग्न करून घेतल तर तुला सासरी जाव लागेल. ” श्रुती हसत होती.” श्रुती मूर्ख गम्मत काय करतेस. इथे माझ ऑफिस मधे काय होत तुला काय माहिती. “” जोक सोड. माझी काही मदत लागली तर सांग. “” चल घरी आली बोलते नंतर. “खुशी म्हणाली.” काका काकू दीपू माई ठीक आहेत ना. “” हो. “” आणि तू?”” मी पण ठीक आहे. “” वेळ मिळाला की भेटायला ये खुशी. “” हो नक्की. “

4 thoughts on “गुंतता हृदय हे भाग 25”

  1. Howdy! Do you know if they make any plugins to assist with SEO?
    I’m trying to get my website to rank for some targeted
    keywords but I’m not seeing very good success. If
    you know of any please share. Cheers! I saw similar text here: AA List

    Reply

Leave a Comment