खापर-1

“गाडीला पण आत्ताच बंद पडायचं होतं.. महत्वाचं काम राहिलं की बंद पडायलाच हवी गाडी..”

सुधीर स्वतःशीच पुटपुटत होता. गाडीत मागे त्याची आई आणि बहीण बसली होती. बहिणीचं लग्न ठरलं असल्याने तिघेही खरेदीसाठी निघाले होते. लग्न 2 महिन्यांवर आलेलं आणि घरात सर्वांची धावपळ सुरू होती. सुधीरची बायको तिची आजो गेल्याने महिनाभर माहेरी गेली होती आणि तिला बोलावणं इतक्यात तरी शक्य नव्हतं..

“अशी कामं वेळीच करायला हवी सुधीर, पण ते नको…तू तरी कुठे कुठे लक्ष घालणार म्हणा..तुझ्या बायकोने तरी तुला वेळेवर आठवण करून द्यायला नको का?” -सुधीरची आई

“अगं आई काय बोलतेय हे? ती माहेरी, तिच्या घरात सुतकी वातावरण… आणि त्यात तिला गाडीचं काय माहित असणार?? काहीही काय बोलतेय?”- सुधीरची बहीण..

“असुदेत, पण हा फोनवर बोलतो तिच्याशी रोज.. किती वेळ घेते ती याचा..मग विसर पडणार नाही तर दुसरं काय होणार?” – आई

“आई तू अशक्य आहेस” – बहीण

सुधीरला खूप राग आलेला पण त्याने मौन पाळलं.

हे नेहमीचं असायचं, घरात काहीही झालं तरी सगळं खापर सुधीरच्या बायकोवरच फुटायचं.

आई पुढे म्हणाली,

“माझ्या बोलायचा राग येतो, पण सुशीलाच्या साखरपुड्याला काय झालेलं? किती धावपळ झालेली सांग बरं.. भाजी अळणी झाली, पाहुण्यांना वाढायला उशीर झाला, कार्यक्रमाला उशीर झाला…कुणामुळे?”

“आई ते तर प्रत्येक कार्यक्रमाला होतंच गं… त्याचंही खापर तू वहिनीवर फोडणार का आता?”

“फोडणार काय…तेच कारण आहे..कार्यक्रम म्हटला की नियोजन नको? सकाळी कितीवेळ खीरच चाळत बसली, नंतर ओटा आवरायचा सोडून बाहेरचं झाडत बसली होती…तिच्यामुळेच तर सगळा उशीर झाला”

“ठीक आहे आई, मान्य करू थोडा वेळ..पण आता वहिनी नसेल यावेळी, त्यामुळे तुला सगळं नियोजन करायचं आहे…आणि तू तर अगदी चोख नियोजन करशील यात शंकाच नाही.”

बहीण गाडीच्या आरशातून भावाकडे बघत म्हटली आणि दोघांना हसू फुटलं..

“हसताय काय, नियोजन कसं असतं बघाच तुम्ही आता..”

ठरल्याप्रमाणे साखरपुड्याचा दिवस आला, सुधीरच्या बायकोला कार्यक्रमाच्या वेळी यावं लागणार होतं.. आजी गेल्याने तिला इथे राहणं शक्य नव्हतं..

सुधीरची आई सकाळी लवकर उठून कामाला लागली, भाज्या चिरण्यात अर्धा वेळ गेला. तेवढ्यात एकेक पाहुणे येऊ लागले. त्यांचा चहा झाला आणि स्वयंपाक सोडून त्यांना नाष्टा बनवायला लागल्या. हाताशी सुधीरची बहीण होती पण ती पटकन मेकप साठी पार्लरमध्ये जाऊन बसली. स्वयंपाक अर्धवट राहिला, घरच्याघरी साखरपुडा असला तरी 10-15 मंडळी जमणार होतीच. साखरपुड्यासाठी चौरंग, पाट मांडणी, रांगोळी, किरकोळ सजावट बाजूलाच राहिलं.. तेवढ्यात त्यांची बहीण गावाहून आली, ती मदतीला लागली पण मधेच त्यांच्या मावस भावांचा विषय निघाला वेळ कसा निघून गेला कळलंच नाही..

काही वेळाने सुधीर चे मामा आले, त्यांनी पाहिलं..

“अरे काय हे? कार्यक्रमाची वेळ झाली…चौरंग पाट कुठेय? स्वयंपाक झाला असेल तर गावाकडच्या पाहुण्यांना लवकर जेवू घालूयात..मुलगी कुठेय?”

आईला चक्कर येऊ लागली,

सगळं अर्धवट झालेलं, स्वयंपाक अर्धवट,

अंगण, ओटा धड झाडून पुसलाही नव्हता,

स्वतःची तयारी तर बाजूलाच, साखरपुड्यासाठी लागणारे नारळ, पुजेचं सामान सापडत नव्हतं,

सगळीकडे शोधाशोध सुरू,

म्हणता म्हणता कार्यक्रम प्रचंड उशिराने पार पडला,
*****

4 thoughts on “खापर-1”

  1. It was great seeing how much work you put into it. The picture is nice, and your writing style is stylish, but you seem to be worrying that you should be presenting the next article. I’ll almost certainly be back to read more of your work if you take care of this hike.

    Reply
  2. I thoroughly enjoyed the work that you have accomplished thus far. The sketch is appealing and your written material is stylish. However, you seem to have a bit of a lingering impatience regarding when you will deliver the following. If you protect this hike, you will almost certainly be required to return sooner rather than later.

    Reply
  3. I just discovered this brilliant website, they provide valuable content for customers. The site owner understands how to engage visitors. I’m so happy and hope they maintain their awesome efforts.

    Reply

Leave a Comment