कुलिंग पिरेड-3

अक्षता सासरी आली. घरात इतकी सारी मंडळी होती की रोज तिला पाहुणे आल्याचाच भास होई. तिच्या माहेरी इन मिन 3 लोकं. ती एकुलती एक. भावंडं नसल्याने एकटेपणाची सल तिच्या मनात होतीच, त्यामुळेच तिने हे एकत्र कुटुंब पसंत केलेलं.

सासूबाई अक्षताकडे आल्या,

“चला सुनबाई, आज तुमच्या हातची भाजी खायचिये सर्वांना…कुलिंग पिरेड पर्यंत कर काय करायचं ते..”

अक्षताने मान डोलावली, पण सासूबाई हे काय म्हटल्या? “कुलिंग पिरेड?” ही कसली भानगड??

ती स्वयंपाकघरात गेली आणि कामाला लागली. मनात धाकधूक होतीच. हळूहळू तिने कामाला सुरुवात केली. तेवढ्यात मोठ्या जाउबाई आल्या,

“काय बनवताय नवरीबाई?”

“बटाट्याची भाजी..”

“हम्म…कुलिंग पिरेड पर्यंत कर मजा.. तोवर मी पर्यायी भाजी टाकून ठेवते..”

परत तेच? सालं हे कुलिंग पिरेड काय भानगड आहे??

पण विचारावं तरी कसं? तिने नेट वर पाहिलं…

period of time during which you can change your mind about an agreement that you have made or something that you have decided to buy: Once you have bought an annuity, you cannot change your mind after the 14-day cooling-off period.

ती उडालीच…Change your mind? Agreement?? म्हणजे मला हे घर आवडलं नाही तर 14 दिवसांच्या आत पळून जायची मुभा?? नाही नाही, हे भलतंच काहीतरी आहे…

47 thoughts on “कुलिंग पिरेड-3”

  1. Wow, wonderful weblog layout! How lengthy have you ever been blogging for?

    you made running a blog glance easy. The whole look of your website
    is great, as neatly as the content material! You can see similar here e-commerce

    Reply

Leave a Comment