कुलिंग पिरेड-2

“ही गोष्ट आई बाप समजून घेतात, सासरचे नाही..जाऊद्या तुम्हाला नाही कळणार..अक्षता, चल आजपासून तुझ्या ट्रेनिंगची सुरवात… आज बटाट्याची भाजी टाक बरं तुझी तूच..”

“कशी करतात?”

“ते डोकं आता तूच लाव.”

अक्षताने तिचं डोकं लावून भाजी बनवली. वडील जेवायला बसले, समोरची भाजी बघून त्यांना कसंतरी झालं. बटाट्याची भाजी काळपट दिसत होती.

“काय टाकलं गं यात?”

“कांदे, टमाटे आणि मसाले..”

“कोणता मसाला?”

“काळा मसाला..”

आईने कपाळावर हात मारून घेतला.. आता आईचं टेन्शन अजूनच वाढलं.

पुढे लग्नाची तयारी सुरू झाली. वेळ कमी होता. त्यात साड्या, लेहेंगा, त्यांची ब्लाउज, मॅचिंग ज्वेलरी… खरेदी काही संपतच नव्हती. तिकडे आई बाबा गुरुजींना भेटून आले. मांडव, हळद पूजेसाठी लागणारं सामान आणणं, सोनं बनवायला टाकणं यात सगळं घर व्यस्त झालं.

बघता बघता लग्नाचा दिवस उजाडला. अक्षताच्या सासरची मंडळी खूप चांगली होती, असं ते ऐकून होते. लग्नाआधी सर्वजण असंच सांगतात म्हणा…

तिच्या सासरी तिचे सासू सासरे, तिचा नवरा, 3 दिर आणि एक नणंद. तिघेही दिरांचे लग्न झालेले, त्यांच्या बायका आणि त्यांची मुलं. मोठा गोतावळा असल्याने लग्नात तेवढी मंडळीही आलेली. प्रत्येक जावेच्या माहेरची मंडळी, सासू सासऱ्यांच्या गावाकडची मंडळी…लग्नाचा हॉल अगदी भरून गेलेला. लग्न छानपैकी पार पडलं.

400 thoughts on “कुलिंग पिरेड-2”

Leave a Comment