कुलिंग पिरेड-1

“पिंकू तुला काहीच येत नाही गं, कसं होईल तुझं त्या घरात?”

“आई मला आधीच टेन्शन आलंय त्यात तू बोल अजून हे…”

“लग्नाची तारीख इतक्या लवकर काढतील माहीत नव्हतं, बरं आता जेवढा वेळ आहे तेवढ्या वेळात शिकून घे जेवढं येईल तेवढं..”

“चालेल, पण आई.. तिकडे इतकी माणसं आहेत…एकत्र कुटुंब आहे, मला जर सर्वांचा स्वयंपाक बनवायला लावला एकटीला तर??”

“आईच्या हातातलं भांडं खाली पडलं..”

“म्हणजे माझा उद्धारच…”

तेवढ्यात तिच्या वडिलांनी ते बोलणं ऐकलं..

“काय तुम्ही मायलेकी इतकं टेन्शन घेताय..”

“तुम्हाला नाही कळणार… मुलगी एकदा सासरी गेली की तिच्या एकेक हालचालीकडे लक्ष दिलं जातं… काही आलं नाही तर टोमणे बसतात..एक तर तिची मोठी फॅमिली..सगळ्या अगदी सुगरणी..”

” मग चांगलंच आहे की, त्यांच्या हाताखाली शिकेल की ती…त्यांनाही माहितीये आपल्या अक्षताचं चांगलं शिक्षण झालंय, शिक्षण आणि नोकरीत व्यस्त असणाऱ्या मुलींना घरकामाची फारशी सवय नसते..”

Leave a Comment