कारण-2

तिच्या मैत्रिणीपण तिला म्हणायच्या..

“असा नवरा मिळायला भाग्य लागतं हो..”

ती हसायची, तिलाही आधी कौतुक वाटायचं…

पण नाण्याची दुसरी बाजू कुणालाच दिसत नव्हती.. असो..

सोसायटीत एकदा चोरांचा सुळसुळाट झालेला, तेव्हा वेदांतने स्वतः जबाबदारी घेऊन रात्रभर जागरण करायचं आणि कॉलनीत गस्त घालायचा निर्णय घेतला,

त्याच्या या वागण्याने सर्वजण हुरळून गेले होते,

असा हा सर्वगुणसंपन्न वेदांत,

आता तुम्ही म्हणाल वेदांत इतका चांगला असताना तिने वेगळं राहायचा निर्णय का घेतला?

तिचे आई वडील, नातेवाईक, मित्र मैत्रिणी तिलाच दोष देऊ लागले..

तो किती चांगला आणि तू किती वाईट हेच तिच्या मनावर बिंबवू लागले..

अखेर तिने ठरवलं, या लोकांच्या सान्निध्यात राहायचंच नाही..लांब कुठेतरी जायचं,

हाताशी शिक्षण आहे, नोकरीचा अनुभव आहे..कुठेही गेले तरी पोट भरेल…

पण तिची एक मैत्रीण होती, अगदी जिवलग..

ती हिला चांगली ओळखून होती,

काहीतरी ठोस कारणाशिवाय ती इतका टोकाचा निर्णय घेणार नाही हे तिला माहीत होतं.

तिने विचारलं,

“काहीतरी कारण असल्याशिवाय तू हा निर्णय घेणार नाही याची मला खात्री आहे, ते कारण सांगू शकशील?”

कुणीतरी आपल्याला समजून घेतलं आहे हे बघून तिला गहिवरून आलं..ती बोलायला सुरुवात करणार तोच तिची आई आली आणि म्हणाली,

“सांग तुझ्या मैत्रिणीला समजावून, डोकं फिरलंय तिचं..”

“थांबा काकू, असा लगेच शिक्का मारू नका..तिची बाजू ऐकून घ्या…तू बोल गं, आम्ही ऐकतोय..”

तिने एक आवंढा गिळला आणि ती सांगायला लागली,

1 thought on “कारण-2”

Leave a Comment