कारण-1

“मला तुझा हा निर्णय अजिबात पटलेला नाहीये, सोन्यासारखा जावई आणि तू त्याला सोडून राहायचं म्हणतेय?”

“हो आई, मी लांब राहायला जातेय त्याच्यापासून.. घटस्फोट तर मागत नाहीये ना?”

“अगं तुझ्या जिभेला काही हाड…”

आईनेही तिलाच दोषी धरलं.

पण तिला वाईट वाटलं नाही,

तिच्यासाठी हे नेहमीचंच होतं..

तिचा नवरा…वेदांत..

त्याला नाव ठेवायला कुठेही जागा नव्हती,

जिथे गेलो तिथे त्याचं नाव लोकं काढायची,

“खरंच, इतका चांगला मुलगा आम्ही आजवर पाहिला नाही..”

वेदांत होताच तसा…प्रेमळ, मनमिळाऊ..

सर्वांना मदत करणारा, कुटुंबवत्सल..

एकदा त्याच्या एका मित्राची आई हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती, याने सगळा खर्च उचलला आणि वर हॉस्पिटलमध्येही चार दिवस थांबला..

गावाकडे नातेवाईक तर त्याची कायम वाट बघत,

गेलं की तो सर्वांची चौकशी करायचा,

त्यांना काय हवं नको ते विचारायचा..

आणि अत्यंत बोलका, एखादा मिनिट जर घोळक्यात थांबला तर वर्षानुवर्षे मैत्री असल्यासारखं तो बोलायचा..
*****

क्रमशः

Leave a Comment