काखेत कळसा


विषय – मराठी म्हणी काखेत कळसा आणि गावाला वळसा भाग १
 
” रोह्या,अरे ये लवकर .उशीर होतोय. इथेच चार वाजले. एक तास प्रवासात जाणार.परत यायचं आहे.तिथेच राहायचं नाहीये.” सुधा तिच्या मोठ्या मुलाला आवाज देत होती.
“आई, आलो.पाच मिनिट.तुम्ही बसा गाडीत .” “म्हणजे अजून अर्धा तास आरसा फुटणार”.
आई काही बोलण्या आधीच कुणीतरी बोललं. तसा तो लगेच बाहेर आला.
“ए,शिंगे गप्प बस.तुला काय करायचं”. मावशी,बघ ना कसा बोलतो. मी त्या दिवशी केसांचे दोन बो बांधले होते.तर”
“नीती,पुरे.तुमचं रोजचं च आहे. आपण नंतर बोलूया.आता आम्ही बाहेर जातीय.ठीक आहे.” सुधाने तिला मध्येच थांबवले.
“ठीक आहे. मावशी तू म्हणशील तस. ह्या जाड्या दादा ला मी नंतर बघते .म्हणत तिने दार ओढत तिच्या घरी पळून गेली .
“ए, जाड्या कोणाला बोलते’.तो मागून ओरडुन बोलेपर्यंत ती वर पळाली .
जाताना रस्त्यातून येणाऱ्या त्याला एका हाताने हलकी टक्कर दिली. त्याने तिच्याकडे रागाने पहिले आणि दरवाजा उघडला.
 
“रोहू दा,तू पण काय तिच्याशी लहान असल्या सारखं भांडतो. सोड ना.आई,चल निघुया. बाबा गाडीत बसून चिडलेत”.
सोहन दरवाज्यातून दोघांना बोलवत होता. तिघेही बिल्डिंग मधून बाहेर आले. “चला लवकर किती उशीर.कधी पासून बसून आहे. तुम्ही जा . मी घरी थांबतो.”मोहन गाडीतून डोकावून तिघांकडे बघून बोलले.
 
तिघेही पटकन गाडीत बसले.
रोहन आणि त्याची आई सुधा मागे बसले. तर सोहन गाडी चालवत होता बाजूला त्याचे बाबा मोहन बसले होते. “आज तरी काम होऊ दे. “
“आज होणारच. माने बाई सांगत होत्या.मुलगी आपल्या रोह्या शोभेल अशीच आहे.”
रोहन मात्र शांतपणे मोबाईल मध्ये डोकं घालून बसला होता.आणि सोहन गाडी चालविण्यात मग्न दाखवत होता.
सुधा एक गृहिणी होती ,तर मोहन निवृत्त शिक्षक होते.
रोहन हा सुधा आणि मोहन यांचा मोठा मुलगा .वय २९, दिसायला गोरा,थोडासा वजनदार,आई च सर्व ऐकणारा .एका सॉफ्टवेअर कंपनीत मोठ्या पदावर होता.
रोहन आणि सोहन दोघांमध्ये तीन वर्षाचं अंतर होत.
सोहन सरकारी शाळेत शिक्षक होता. सायन्स टीचर.
___
नीती धापा टाकत वरच्या मजल्यावर तिच्या घरी आली.
“अग नीतू,हळू काय वाघ मागे लागला का. प्रीती ने तिला पाणी आणून दिलं.”
“नाही वाघ नाही .बोका. जाड्या बोका.”
“काय ग.एव्हढा पण जाडा नाहीये.थोडासा तर” ती बोलतच होती.
आणि नीतीने पटकन तिच्याकडे बघितलं. तश्या दोघीही हसायला लागल्या .
आई येताना दिसली तशा लगेच गप्प झाल्या.
“काय ग. काय झालं.हसा की आता का.किती वेळा सांगितलं आहे.कोणाच्या शरीरावरून नावे ठेवू नये.आणि तो पाहिले होता थोडा जाडा पण आता कमी झालाय. नीट बघितल का. तुम्ही आपल्या पाच वर्षापूर्वीच घेवून बसल्या आहात”. त्यांना समजावून त्यांची आई वसुधा आत मध्ये निघून गेल्या.
क्रमशः
 मधुरा

 काखेत कळसा आणि गावाला वळसा भाग २
 
“तुम्ही आपल्या पाच वर्षापूर्वीच घेवून बसल्या आहात.” त्यांना समजावून त्यांची आई वसुधा आत मध्ये निघून गेल्या.
“हमम्म. “दोघींनी एकदम हुश केलं.
“आईसमोर हसू कंट्रोल करायचं.कठीण आहे”.नीती मस्त आळस देत म्हणाली.
“पण आई म्हणते त्यात काही चूक नाहीये. आता तुझा जाड्या दादा पहिल्यासारखा जाडा नाही राहिला.”प्रीती
“तुझ बर लक्ष असत.”निती
अग मी सकाळी क्लास साठी जाते ना तेव्हा तो पण जॉगिंग ला जात असतो.”प्रीती
 “त्याला पण न्यायचं ना.”निती
“नको. खूप चिडका आहे.”प्रीती
“हो ते तर आहेच . आणि मावशी त्याच्या साठी मुलगी बघत आहेत. ती पण त्याच्यासारखी .”निती
 “कठीण आहे.बर नीती बाई तुमचा आराम झाला.तुमचं केक च दुकान वाट पाहत असेल.चार वाजून गेले.
“प्रीती “प्री डि,ते दुकान नाही ती बेकरी असते. निदान केक शॉप तरी म्हण .”निती
 “ओके.बेकरी.त्या दोघी जणी एकट्या पडल्या असतील.”
“ठीक आहे.चल निघते मी “
नीती आणि तिच्या दोन मैत्रिणींनी मिळून केक शॉप सुरू केलं होत.
प्रीती एका योगा सेंटर मध्ये योगा टीचर जॉब करत होती.
त्यांच्या बाबांचं अशोक च बिल्डिंग च्या खालीच तळ मजल्यावर टेलरींगच दुकान होत. त्यांची आई पण त्यांना मदत करत असे.
पाच वर्षांपूर्वी ते बिल्डिंग मध्ये राहायला आले होते . सुधा मुळातच हसमुख आणि प्रेमळ स्वभावाच्या  असल्याने त्यांनी लवकरच सर्वाशी ओळख करून घेतली. सुधा बरोबर त्यांचं चांगल जमत असे.
__________
 
रात्रीचे आठ वाजले होते. नुकतेच सुधा आणि सर्व घरी परतले होते.
“आई,तू जा थोडा आराम कर. तोपर्यंत मी बाहेरून जेवण मागवतो”.सोहन
 “फक्त भाजी ऑर्डर कर. पोळ्या सकाळीच करून ठेवल्यात. जेवायला बसण्या आधी खिचडी बनवेन”.सुधा
 सुधा आणि मोहन त्यांच्या खोलीत गेले.
“बर,दादा,तू पण जा. ” म्हणत सोहन ने फोन वरून जवळच्या हॉटेलमध्ये भाजी ऑर्डर केली.
सगळे जेवायला बसले. “अरे,हळू गरम आहे”.सुधा
“सुधा,आता जरा थोडे दिवस हे कार्यक्रम नको करूया.अग गेली तीन महिने झाले आपण बघत आहोत त्यातली ही आठवी मुलगी होती.
दर वेळेला तुला काहीनाकाही तरी खोटं वाटतेच आणि ती बरोबरच असते . जरा थांबशील का?”मोहन
“हो,तुम्ही बरोबर बोलत आहात. “
“आई,अग नको काळजी करू. तुझ्या मनासारखी सून मिळेल.त्याच अजून एवढं वय झालं नाहीये”. सोहन
“हो,आई नको काळजी करू. मी तूला आवडेल अश्या मुलीशी लग्न करेन.आपली पसंत एकच असेल “रोहन
“ठीक आहे .चला आवरा आता. सकाळी लवकर उठायचं आहे.” ________
“काय ग.आई आज तुमची टेरेस मीटिंग नाही का.मावशी आल्या नाही का?.”.
“अग दमल्या असतील .”
“दमल्या नसतील.मुलगी आवडली नसेल.म्हणून नाराज असतील”
“सकाळी जाऊन बघते .तुम्ही झोपा दोघी.’ वसुधा विचार करतच होती.
तिच्या फोनवर सुधाचा मेसेज आला.
“टेरेस वर ये.”
 
रात्री घरातली सर्व काम आवरल्यावर पंधरा मिनिट दोघीही टेरेस वर भेटायच्या.
दिवसभरातील गप्पा बोलून मान मोकळ करून शांत व्हायच्या.
वसुधा ने मेसेज वाचला आणि लगेच टेरेस वर गेली.सुधा तिच्या आधीच तिथे बाकावर बसली होती.
 क्रमशः
 मधुरा

काखेत कळसा आणि गावाला वळसा भाग ३
वसुधा ने मेसेज वाचला आणि लगेच टेरेस वर गेली.सुधा तिच्या आधीच तिथे बाकावर बसली होती.”सुधा, “वसुधा ने तिच्या खांद्यावर हात ठेवला.”अग तू आलीस का”मला येऊन झाले पाच मिनिट.तू कुठल्या विचारात होतीस.””अजून कुठला विचार. वयात आलेल्या मुलाची आई कुठल्या विचारात असणार.”

“सुधा,अग होईल त्याच लग्न.त्या दिवशी ते गुरुजी काय बोलले.”ते गुरुजी बोलले ना त्यांनी जास्त टेन्शन आले आहे.””काय. कसलं टेन्शन””तू नीट एकल नाही का.गुरुजी म्हणाले.ह्याच लग्न अचानक होईल. चट मंगणी पट ब्याह अस. मला वाटतंय कोण मुलगी ह्याने अचानक.नाहीतर एखादी मुलगी अचानक ह्याच्या आयुष्यात आली तर..'”अग सुधा शांत हो.तू पूर्ण ऐकल नाहीस का.””अचानक लग्न झाल तरी सगळ चांगल होणार आहे.असा पण म्हणाले ना गुरुजी.”हो ते ही आहेच पण “”आता अजून पण आहेच का.बर मी निघते “का ग लगेच चाललीस.”अग उद्या माझीभाची येतेय.भावाची मुलगी. जरा दोन दिवस रहायला. आताच C .A. ची परीक्षा दिलीय.रिझल्टला अजून वेळ आहे .तर मीच तिला बोलले ये जरा थोडे दिवस.एकदा जॉब सुरू झाला की काय जमनार नाही. आणि तिच्या लनाच पण बघतेय वहिनी.” सुधा उठून उभी राहिली.”अच्छा ठीक आहे.”_______”काकू, येऊ का आत.?” प्रीती ने दरवाजातून आवाज दिला.”अग ये की. विचारतेस काय.” सुधाने तिला किचनमधून हाक मारली.बाहेर हॉल मध्ये मोहन आणि रोहन टीवी बघत होते .तीने दोघांकडे बघितलं. रोहन बातम्या बघण्यात गुंग होता.”मोहन काका कसे आहात?””मी मस्त मजेत.ती कशी आहेस. काम कस चालू आहे.'”मी मस्त. काम तर एकदम भारी.”सुधा बाहेर आली.”काकू,हे घ्या. तुमची योगा मॅट.””अग आणलीस पण, बर झाल.””चला निघते मी.क्षिती आलीय ना.””आली का ती. “प्रीती तिच्या घरी गेली. सुधाला क्षितीला भेटायचं होत. काल रात्रीपासून तिच्या डोक्यात विचार चालू होता.विचारायला काय जातंय. म्हणून तीने वसुधाला विचारायचं ठरवलं.संध्याकाळी सुधा वसुधा कडे गेली .क्षिती आणि निती हॉल मध्ये बसून कप केक खात होत्या .”निती, आई कुठे आहे”.सुधा नी आत येत विचारले.”आई, आतमध्ये आहे.ती बघा आलीच.”वसुधा हातात प्लेट्स घेऊन येत होती.तिच्या मागून एक मुलगा एका हातात एक डबा आणि दुसऱ्या हातात कॉफी ट्रे घेऊन येत होता.”सुधा ,तू केव्हा आलीस. बस ना उभी का आहेस.””मी आताच आली. निघते. तुझ्याकडे पाहुणे आलेत तर नंतर येते.कोण पाहुणे.अग काल तुला बोलले ना भाची येणार.””हो.पण हा मुलगा कोण आहे.”क्रमशःमधुरा

काखेत कळसा आणि गावाला वळसा भाग ४”हो.पण हा मुलगा कोण आहे.””हा. माझा भाचा.””हिचा भाऊ का..?’
‘नाही .”क्षिती पटकन बोलली.’सुधा, हा नितीश माझ्या भावाचा मुलगा.”
नितीश सुधा कडे बघून गालात हसला.”अच्छा,  बर येते मी.””मावशी,हे घ्या “.प्रीतीने त्यांना प्लेट  मध्ये  थोडे कपकेक दिले .”अग एव्हढे कशाला. जास्तच आहेत.आम्ही चार माणसं.”
‘मावशी.तू एकच खा.दोन जास्तीचे जाड्या साठी आहेत.”प्रीती ने तिच्याकडे डोळे मोठे करून पाहिले.”सॉरी दादा ला दे.”
‘वसुधा जरा बोलायचं होत.””सुधा आपण रात्री बोलूया का.बघतेस ना किती गोंधळ चालू आहे .परत मला उद्यासाठी ह्यांची बॅग पण भरायची आहे.भाऊजींची झाली का बॅग भरून.”
“बॅग कशासाठी ?’
“अग विसरली का.? सकाळी निघायचं आहे ना त्यांची मित्रांची सहल जाणार आहे ना.””अरे हो.  त्यांची बॅग भरून कधीच तयार आहेत.त्यांना तर कधी एकदा सकाळ होते आणि जातोय अस झाल आहे.”‘बर ठीक आहे. रात्री ये वेळेवर. “म्हणत सुधाने  प्लेट घेतली आणि घरी गेली.__________दोघीही रोजच्या सारखं आजही टेरेसवर आपल्या नेहमीच्या बाकावर बसल्या होत्या.
वसुधाचा चेहऱ्यावर आनंद ओसंडून  वाहत होता.”वसुधा,  का ग एव्हडी खुश का आहेस.””अग ,काय सांगू कधीकधी ना  काही गोष्टी अशा अचानक घडतात  ना की आपण विचार पण केला नसतो.”
“अस काय घडल.”
“अग माझी भाची आहे ना क्षिती.””हा ती खूप छान आहे ग.तीच काय.””तीच लग्न ठरलं””काय.  कधी.तू काल काही बोलली नाहीस.”सुधा जोरात म्हणाली.
“अग हो. मला पण मगाशी कळलं.तिच्या आईचा फोन आला होता.लग्नाची पुढची बोलण करण्यासाठी मला घेऊन जायला आलेत दोघं खास.””दोघं कोण.”
“अग ती आणि तिचा नवरा.अरे तुला सांगितलच नाही. नितीश माझ्या बहिणीचा मुलगा .म्हणून तर दोघे  एकत्र आले मला नेण्यासाठी “”उद्या दुपारी निघू. आम्ही. निती येतेय माझ्याबरोबर.प्रीती आहे इथेच.ती नाही येणार.”___दुपारी वसुधा आणि निती  जीना उतरत असताना सुधा ने पाहिलं.”निघालात का.?””हो सुधा.परवा येईन.तू जास्त विचार करू नकोस. काळजी घे.””हो.तू पण नीट जा.”वसुधाला निरोप देवून सुधा घरात आली.
माझ्या रोहन च लग्न कधी  होणार.कुठे असेल ती मुलगी काय माहीत.देवा पाठव रे तिला लवकर. सुधा मनात बोलत होती.विचार करता करता तिला झोप लागून गेली.
“मावशी, ए मावशी .उठ.”सुधा ने डोळे हलके उघडुन बघीतले.
माझी सून  आली. सुधा हळूच पुटपुटली.
क्रमशःमधुरा 

काखेत कळसा आणि गावाला वळसा भाग ५ अंतिम भाग(कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.)
“मावशी, ए मावशी .उठ.”सुधा ने डोळे हलके उघडुन बघीतले.”माझी सून  आली”. सुधा हळूच पुटपुटली.”मावशी मी प्रीती”.  प्रीती, तू काय करतेस इथे.
“अग मावशी संध्याकाळ होत आली .तू इथे बसल्याजागी झोपली.काळोख बघ किती झालय.दार पण नुसतच लोटून घेतलंस.  मी आताच आली.  बरी आहेस ना.”सुधा ने पूर्ण डोळे उघडले .”हो ग मी बरी आहे.थांब जरा तोंड धुवून आले.तू बस.”सुधा आत गेली.तशी प्रीती ने लाईट लावली. आणि समोर असलेला पेपर वाचत बसली.बराच वेळ झाला ,मावशी अजून कशी आली नाही.विचार करत प्रीती आत गेली.सुधा किचन मध्ये  खुर्चीत डोक्याला हात लावून बसली होती.”मावशी काय होतंय ग तुला.””डोकं अचानक दुखायला लागलं.काय माहित.””थांब तू बस.मी तुला बाम लावून देते.पण त्या आधी चहा ठेवते.प्रीतीने पटकन चहा ठेवला.  आणि  तिच्या पर्स मधून बाम ची डबी काढली. आणि सुधा जवळ गेली.”बर वाटतंय का. ” प्रीतीने तिच्यासमोर चहाचा कप ठेवला.”हो.तुझ्या हातात जादू आहे .खूपच बर वाटतय.””चल मग मी निघते.””कुठे निघालीस.”?”घरी. अजून कुठे.?वाजले बघ किती ,? जेवण पण बनवायचय एकटी साठी.””कशाला जातेस.आज रहा इथेच.  मागे पण तुमचे आई बाबा  अचानक गावी गेले होते,तेव्हा मी तुमच्याकडे आली होती .आठवत.तस आज तू माझ्याकडे रहा. तसही तुझ्या आईने मला तुझ्याकडे लक्ष ठेवायला सांगितलं आहे.””अग पण .मी कशी .मला सकाळी लवकर जायचं असत.आणि तू एकटी कुठे आहेस.तुझी मुलं आहेत की.””माझी मुलं. छोटा गेलाय मित्राच्या हळदीला. मोठ्याचा घरी यायचा काही ठरविक वेळ नाही.”
सुधा ने खूपच आग्रह केल्यावर प्रीती राहायला तयार झाली.ती घरी जाऊन तिचे कपडे घेऊन आली.सुधाच डोकं बऱ्यापैकी थांबलं होत.तरी प्रीतीने तिला काहीच काम करू दिलं नाही.  जेवण बनवत प्रीती तिच्याशी गप्पा मारत होती.सुधा मात्र तिला बघतच होती. तीची प्रत्येक गोष्ट ऐकत होती .
दोघींनी जेवून घेतल .  प्रीती किचन आवरत होती. सुधा हॉल मध्ये  गोळी घेत होती.तितक्यात रोहन आला .”आई,  तू अजून झोपली  नाहीस.आणि ही गोळी कसली घेतेस.””अरे संध्याकाळी डोकं खूप दुखत होत. “
तो पटकन त्यांच्याजवळ आला .”अग मग एक फोन करायचा एकटीच अंगावर काढल असशील.”रोहन ने तिला सोफ्यावर बसवले.आणि तीच डोकं दाबू लागला.तेव्हढ्या वेळात त्यांनी त्याला संध्याकाळपासून चा सगळा वृत्तांत सांगितला.प्रीती आतून बाहेर आली.त्याने तिचे आभार मानले.आणि तो त्याच्या रूम मध्ये निघून गेला.”काकू, मी उद्या लवकर उठून घरी जाईन.””अग पण तू उद्याचे कपडे आणलेस ना.मग इथूनच जाणार होतीस ना””हो, पण मला टिफीन न्यावा लागेल.तो बनवायला जावं लागेल ना.”
“मग इकडे बनव की. नाहीतर मी बनवू का? तुझा पहिला छान पदार्थ तू  ह्याच किचन मध्ये बनवला होतास विसरली का. काय सुंदर पावभाजी बनवली होतीस. आता कामाला जायला  लागली तशी येणं बंद केलस””अस काही नाही ग.म्हणजे आता तुझी सून येईल ना.मग आमची उगाच मध्ये लुडबुड नको म्हणून   बाकी काही नाही.पण तुझ डोकं दुखतय ना म्हणून नको.”तुला माझ्या हातच्या मऊसूत पोळ्या आवडतात ना. उद्या मी टिफीन बनवून देईन.तसही  रोहन साठी करतेच.   तर तुलाही करेन.”
सुधा चा भावूक स्वर ऐकून प्रीती ने उद्या टिफीन तिच्याकडून घेण्याचं कबूल केलं.
सकाळी प्रीती आणि सुधा ने मिळून नाश्ता आणि टिफीन बनवला. प्रीतीने तिच्याबरोबर सुधालाही चहा नाश्ता  खायला लावल आणि ती तिच्या ऑफिसला निघून गेली.प्रितीची ऑफिसला जायची आणि रोहन ची  जॉगिंग साठी एकच वेळी होती. त्यांना जाताना बघून नेहमीप्रमाणे सुधाच्या डोक्यात विचार आला.दोन दिवसांनी वसुधा आणि निती परत आल्या.पिकनिक साठी गेलेले वसुधा आणि सुधाचे नवरे ही आले होते.संध्याकाळचे सात वाजले होते.आज सुधा तिच्या दोन्ही मुलांना आणि नवऱ्याला घेवून वसुधाच्या घरी आली होती. सगळेजण चहा पीत होते.प्रीतीने गरम भजी आणून ठेवली.रोहन आणि तीची नजरानजर झाली.ती त्याच्या समोर बसली.”काय ग सुधा आज अचानक कशी काय.दुपारी मेसेज केलास संध्याकाळी तुझ्या हाताचा चहा प्यायचा आहे .आणि इथे येवून प्रीतीला चहा करायला सांगितला.””कारण मी चहा पिला आहे. म्हंटल आता घरातल्या बाकी लोकानींही तिच्या हातचा चहा पिवून बघावं. “”वसुधा तुला तर माहीतच आहे मी गेले किती दिवस सून शोधत आहे.सगळ्यांना अस वाटतय मला वेड लागलं आहे. खरच मी वेडी आहे.कस झालय माहित आहे.मला जे हवं आहे.ते  माझ्या इतकं जवळ असूनही मला दिसलं नाही.””सुधा कोड्यात बोलू नकोस ग.काय बोलायचय ते स्पष्ट बोल””बर.स्पष्ट सांगते.तुझी प्रीती माझ्या रोहन साठी बायको म्हणून देशील.””अग पण तीच शिक्षण,राहणीमान आणि त्याच शिक्षण, स्टेटस सगळ किती वेगळ आहे.  आधी त्याला विचार.””माझ्या मुलाला काय हवय हे जितकं त्याला कळत तेवढंच मलाही समजत.त्या दिवशी कधी नव्हे त्याला कोणाकडे अस बघताना पाहिलं. फक्त दोन दिवस होती.पण अस वाटत होत ती इथलीच आहे. तरी पण तुझ्या समोर विचारते. रोहन तुझ काय मत आहे.””आई,तू म्हणशील तस.पण तिला सुद्धा विचार.उगाच जबरदस्तीने नात नको.””काय ग प्रीती.तुला काय वाटतं” वसुधा ने तिला विचारलं.”आई,मला चालेल”.तीने आईच्या कानात सांगीतले.”मी तोंड गोड करायला साखर आणते.”म्हणत वसुधा उठली.”थांब तू कशाला जातेस.मी मिठाई घेवून आलेय.हा घे पेढा ठरल तर मग.”
“वसुधा हे कस झालं.इतके दिवस माझी सून माझ्या समोर होती.पण मी तिला गावभर शोधत होते. ते म्हणतात नाकाखेत कळसा आणि गावाला वळसा.”
समाप्त
मधुरा 

7 thoughts on “काखेत कळसा”

 1. Hello! Do you know if they make any plugins to help with
  SEO? I’m trying to get my blog to rank for some targeted keywords but I’m not seeing very good results.
  If you know of any please share. Appreciate it! You can read similar
  text here: Sklep internetowy

  Reply
 2. Hey there! Do you know if they make any plugins to help with Search Engine Optimization? I’m trying to get my blog to rank for some targeted keywords but I’m not seeing very good success.
  If you know of any please share. Thank you! You can read similar text here:
  Auto Approve List

  Reply
 3. Wow, marvelous blog format! How lengthy have you been running a blog for?
  you make running a blog glance easy. The entire look
  of your web site is fantastic, as well as the content
  material! You can see similar here ecommerce

  Reply
 4. Wow, wonderful blog format!
  How long have you ever been running a blog for? you made blogging look easy.
  The overall look of your web site is magnificent, let alone the content material!
  I read similar here prev next
  and that was wrote by Flora92.

  Reply

Leave a Comment