कल्पकता-2

एकंदरीत कडक स्वभावाच्या तिला सगळं अगदी मनासारखं हवं असायचं,

थोडीही चूक नको असायची,

मग त्या पार्लरवाल्या ताईने जरासा बिचकतच मेकप केला,

नवीन लेयर लावतांना तिला धाक पडे..

असं करत करत मेकप छान झाला,

पार्लरवाल्या ताईने सुस्कारा सोडला, बहीण घरी गेली..

आता अक्षयाचा मेकप सुरू झाला,

अक्षयाने तिला काहीतरी सांगितलं आणि तिने होकारार्थी मान हलवली,

तासाभरात तो झाला आणि ती घरी परतली,

बहिणीने तिला पाहिलं आणि बघतच राहिली,

अक्षयाचा मेकप जास्त सुंदर झालेला, ती खूप सुंदर दिसत होती…

प्रसंग 2

कावेरीबाईंच्या मुलाचं नुकतंच लग्न झालेलं,

नवीन सून घरात आली,

लग्नघरातले पाहुणे अजून 7-8 दिवस मुक्कामाला थांबणार होते,

नवीन नवरीला लग्न झाल्या झाल्या पाहुण्यांचं आवरणं पुरत होतं,

पण पहिल्याच दिवशी सासूबाईंनी तिला काहीतरी सांगितलं,

दुसऱ्या दिवसापासून तिने सगळी जबाबदारी आनंदाने स्वतःवर घेतली,

सर्व पाहुण्यांचं उत्तमरीत्या पाहुणचार केला,

लग्नाच्या काळात अस्ताव्यस्त झालेलं घर 2 दिवसात आवरलं,

किचन तर अगदी न बघण्यासारखा झालेला, तिने एका दिवसात सगळी मांडणी व्यवस्थित केली,

एके दिवशी स्वतः बाजारात जाऊन काही वस्तू घेऊन आली, बरण्या, काही डबे..आणि छानपैकी सगळं त्यात रचून दिलं..

आलेले पाहुणे बघतच राहिले,

त्यातल्या बायका कावेरीबाईंना म्हणू लागल्या,

आम्ही इतक्या सुना वागवल्या पण तुमची सून खरंच कौतुक करण्यासारखी आहे हो..

प्रसंग 3

एक सरकारी कॉन्ट्रॅक्ट मिळावं म्हणून काही कंपन्या शर्यतीत होत्या,

त्यापैकी दोन कंपन्यांची निवड झालेली,

त्यातून पुन्हा एक निवडायची होती,

भाग 3

कल्पकता-3

3 thoughts on “कल्पकता-2”

Leave a Comment