एक इजाजत भाग 7

एक इजाजत!भाग-७काळ्या साडीत तिचे साधे ओलेते रूप अधिकच सुंदर दिसत होते. अंगावरची काळी साडी. ओलसर केसातून खांद्यावर विसावलेले थेंब.. तिला पुन्हा हिरवेवाडीच्या आठवणीत घेऊन गेले.साऱ्या आठवणीतील ती पहिली आठवण.. प्रकाशच्या भेटीची. श्रावणातील त्या रात्रीच्या पावसाचे ते रौद्ररूप.. गौरीने भूत म्हणून ठोकलेली आरोळी..हिरवेपाटलांच्या वाड्याच्या दाराबाहेर मुसळधार पावसात चिंब भिजलेली, काळ्या रंगाच्या चोळी परकरमधील सात-आठ वर्षांची ती कोवळी पोर आणि दाराच्या आतअसलेला दहा वर्षांचा तो हळवा जीव!“रत्ना.. तू शाळेत जातेस का?” दारापलीकडे उभ्या असलेल्या रत्नाला प्रकाश विचारत होता. तसे तर तिच्याशी त्याला खूप काही बोलावे वाटत होते; पण काय बोलावे हे त्याला कळत नव्हते.“हं? शाळा?” तिला हा प्रश्न अपेक्षित नव्हता.“नाही जात ना? मला तू न सांगताच ते कळलं.”“कसं?”“तुझ्या डोळ्यांनी सांगितलं. तुझं उत्तर तुझ्या डोळ्यात दिसतेय की.” तो हसून म्हणाला तशी ती थोडीशी खिजली.“शाळेपेक्षा पोटाची भूक आम्हाला जास्त छळते. तुमाला नाय कळायचं.” ती त्याच्यावर डोळे रोखत म्हणाली.
तिची ती नजर त्याच्या नजरेत आरपार गेली. तिच्यापेक्षा जरासा मोठा असला तरी तोही लहानच तर होता. दुनियादारीचा अनुभव त्याच्या गाठीशी कुठे होता?
“रत्ना, तुझ्यासाठी मी माझे दोन फ्रॉक आणलेत. तुला आवडतील.” एका पिशवीत कपडे घेऊन गौरी धावत बाहेर आली.“मला नकोत ही कापडं. माझी कापडं नि तुमची कापडं वेगळी हाईत.” नम्रपणे तिने गौरीचे फ्रॉक नाकारले. बिचारी गौरी मात्र हिरमुसली.प्रकाशकडे बघून तिने इशाऱ्याने ‘काय झाले?’ असे विचारले. उत्तरादाखल त्याने केवळ खांदे हलवत ठाऊक नाही अशी मान डोलावली.“आबासाहेब, अहो एवढ्या तातडीनं बोलावलंत? काही झालंय का?” गौरी आणखी काही बोलणार तेवढ्यात डोक्यावर घोंगडे आणि हातात कंदील घेऊन शिरपा तिथे येऊन ठेपला.
“शिरपा, ये गड्या. अरे ही चिमणी बघ, रत्ना नाव आहे हीचं. तिकडं आडोशाला हिच्या घरचे थांबले आहेत. ही छत्री घे आणि समद्यांना तुझ्या झोपडीत घेऊन जा. धाकल्या पाटलीणबाई भाकऱ्या बांधून देत आहेत त्याही घेऊन जा. सकाळी मग कुठली सोय करता येईल का ते पाहू.”आबासाहेबांनी म्हटले तसे शिरपाने मान डोलावली. हातातील कंदील वर करत एका हातात इंदूताईंनी दिलेल्या भाकऱ्यांची चळत पकडत त्याने रत्नाकडे पाहिले.“रत्ना ही छत्री घे. तुझा भाऊ ओला व्हायला नको ना?”इतकावेळ पावसात ओली झालेल्या तिने कदाचित ती छत्री नाकारली असती; पण आबासाहेबांनी तिच्या भावाचे निमित्त पुढे केले नि तिने तिचा चिमुकला हात समोर केला.“मालक, तुमचे लै धन्यवाद बघा. खूप उपकार झालेत.” तिचे दोन्ही हात कृतज्ञतेने जोडले गेले. लहानवयात आलेले शहाणपण.. आणखी काय?“पोरी, इथे मला सगळी आबासाहेब म्हणतात. तूही तेच म्हणालीस तर चालेल. असं मालक वगैरे म्हणू नकोस. जा आता.” ते म्हणाले तशा तिच्या गुलाबी पाकळ्या लागलीच हलल्या.“आबासायेब..” तिचा मधुर स्वर किणकीणला.“आबासाहेब.” प्रकाश तिची चूक दुरुस्त करत म्हणाला.“मी तेच तर म्हणलं.”“अहं, तू आबासायेब म्हणालीस. सायेब नाही, साहेब म्हणायचं. ‘य’ऐवजी ‘ह’. कळलं? शाळेत जात नाहीस ना म्हणून हा घोळ.” पुष्टी जोडायला तो विसरला नाही.“साहेब.. बरोबर ना?”“हम्म.” प्रकाशचे ओठ आपसूकच रुंदावले.“हं, चल आता. तुझे आयबाबा वाट बघत असतील.” शिरपा पुढे होत म्हणाला तसे त्याच्यामागून झपझप पाऊल टाकत ती निघाली.चालताना मध्येच तिने एक नजर वळून मागे पाहिले. दारात उभा असलेला प्रकाश तिच्याकडेच पाहत असलेला तिला दिसला. दोघांची नजरानजर झाली आणि तिच्या चेहऱ्यावर एक गोड हसू फुलले.
“हिरवेपाटलांच्या वाड्यातून कोणीच रिकाम्या हाती जात नसतील, व्हय ना काका?” झपाट्याने चालणाऱ्या शिरपाच्या वेगाला पकडण्यासाठी काहीशी धावत चालणाऱ्या तिने विचारले.“व्हय तर. आमचे आबासाहेब देवमाणूस आहेत अन् अण्णासाहेब? ते बी त्यांच्याचं तालमीत तयार झाले हायेत. सरपंच हाईत गावचे. घरात एवढी लक्ष्मी पाणी भरतेय पण थोरल्या पाटलीणबाई आन धाकल्या पाटलीणबाई दोघींनाबी जराही घमंड नाही. तुमच्यासाठी कशा गरम गरम भाकरी दिल्या पाहिलं ना?” आबासाहेबांच्या घराण्याचे गुणगान गायला शिरपा थकत नव्हता.“चला आता, समद्यानी माझ्या झोपडीत येऊन चार घास खाऊन घ्या. या माझ्या मागंमागं.” शिरपा रत्नासोबत तिच्या कुटुंबाला त्याच्या झोपडीत घेऊन गेला.______“गौरी, तू का असा चेहरा पाडून घेतला आहेस?” जेवताना प्रकाशने गौरीच्या चेहऱ्याकडे पाहत विचारले.“जा, तू बोलू नकोस माझ्याशी.” नाक मुरकटून गौरीने दुसरीकडे मान वळवली.“अगं? मी आता काय केलंय?” त्याचा प्रश्न.“वर मलाच विचार. ती रत्ना तुझ्याबरोबर घडाघडा बोलते, तू म्हटलंस ते एकते आणि माझ्याकडे साफ दुर्लक्ष करते. मी दिलेले फ्रॉक सुद्धा तिने घेतले नाही.” गौरीच्या डोळ्यात पाणी होते.“गौरी, केवढ्याश्या गोष्टीला रडतेस गं? आजोबा आता तुम्हीच हिला समजावा.” प्रकाश हसत म्हणाला आणि त्याचे हसणे बघून गौरीने भोकाड पसरले.
“गौराई अहो, दादा मोठा आहे की नाही? म्हणून तिने दादाचे ऐकले आणि ती तुझ्यासारखी फ्रॉक घालत नाही ना? म्हणून तिने तो फ्रॉक घेतले नाहीत. तुला सांगू बाळा, गरीब असले तरी काही लोक स्वाभिमानी असतात बरं. गरज नसेल तर कोणाची मदत ते घेत नसतात. रत्नाला त्यावेळी जेवणाची गरज होती म्हणून तिने स्वतःहून ते मागितले. कदाचित तिच्याकडे पुरेशी कापडं असतील म्हणून तिने नकार दिला असेल, पटलं का?”“हो आबा तुम्ही सांगितलेलं लगेच पटलं.” तिची कळी खुलली होती. रडू थांबलं होतं तरी प्रकाशला नाकाचा शेंडा हलवून चिडवायला ती विसरली नाही.______“ए चंपा, खाना खाने के लिए तुम नीचे क्यू नही आयी?” हातात जेवणाचे ताट घेऊन शीलाआँटी चंपाच्या खोलीत विराजमान झाली होती.भूतकाळाच्या रिंगणात अडकलेली चंपा तिच्या आवाजाने आरशासमोरून बाजूला हलली.“आँटी, आज भूकच नाहीये गं. मग उगाच जबरदस्तीने कशाला खा?” ओले असलेले केस झटकत चंपा.“भूक नहीं हैं म्हणजे? अगं आपण इतकं मरमर राबतो ते पोटाची ही खळगी भरण्यासाठीच ना गं? मग भूक नाही म्हणून कसे चालेल? आणि तुझं भूक न लागण्याचं कारण मला चांगलंच ठाऊक आहे. तुला तुझ्या त्या डॉक्टरची आठवण आली म्हणून भूक पळाली ना?”“आँटी..”“तुने ए काले रंग की साडी पहनी तभीच मै जान गयी. जब तुझे उसकी याद जादा सताती हैं तभीच ये साडी तू पहनती हैं ना? मै सब जानती हूं रे.” तिच्या चेहऱ्यावर नजर गाडत शीलाआँटी विषण्णपणे म्हणाली.“शीलाआँटी, मागच्या जन्मात तू माझी आई होतीस का गं? माझ्या मनातील तुला सारं कसं कळतं?” चंपा हळवी झाली होती.“मागच्या जन्मातलं काही ठाऊक नाही; पण या जन्मात मी कुणाची आई नाहीये हे तेवढंच खरं आहे.” निर्विकारपणे ती.“आँटी, असं का बोलतेस?”“खरं तेच बोलतेय ना चंपा. तु ही बता, कौनसी माँ अपनेही बच्चोको ऐसे कोठे पे बिठाती हैं?” तिच्या भावना डोळ्यात साठून आल्या होत्या.“आँटी असे नको ना बोलूस. स्वतःच्या आईचा हात सुटलेल्या इथल्या प्रत्येकीची तू आई झालीस. आमची काळजी घेतेस, प्रेम करतेस.. ते का उगाच?”“येडी हैं तू चंपा. अरे तुमच्या सगळ्यांची मी काळजी घेते कारण तुमच्याकडून मला धंदा करवून घ्यायचा असतो. ही शीलाआँटी उगाच कोणाला फुकटमध्ये पोसत नसते. तू गलतफहमीयाँ मत पाल मेरी जान और चुपचापसे खाना खा ले.” थोड्या त्रागाने तिने चंपाच्या पुढयात ताट ठेवले आणि ती जायला वळली.“शीलाआँटी.. तू सच्चीमें मुझे प्यार नही करती?” तिचा हात पकडत चंपाने ओल्या स्वरात विचारले तशी शीलाआँटी सुद्धा काही क्षणासाठी हळवी झाली.“प्यार..”तिचा शब्द मोठ्याने ओठात घोळवत शीलाआँटी फिसकन हसली.“चंपा, अगं प्रेमाच्या नादी लागून तू या कोठीवर पोहचलीस आणि तरीही तुझा प्रेमावर विश्वास आहे?” तिने चंपाला उलट सवाल जेला.“हम्म. विश्वास तर आहेच. प्रेमापेक्षा मोठी ताकद कशातच नसते शीलाआँटी आणि हे मला आज कळलंय. तूच सांग, नाहीतर प्रकाशने आजवर लग्न का केलं नसतं? माझ्यावरच्या प्रेमापोटीच ना?” तिच्या डोळ्यात आरपार पाहत चंपाने प्रश्नासोबत स्वतःच उत्तर दिले.“बावली हैं रे तू.” तिच्यासमोर बसकन मांडत शीलाआंटीने कमरेत खोचून ठेवलेली बाटली काढून तोंडाला लावली.:क्रमश:पुढील भाग लवकरच.©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)*साहित्यचोरी गुन्हा आहे.******

8 thoughts on “एक इजाजत भाग 7”

 1. Howdy! Do you know if they make any plugins
  to assist with SEO? I’m trying to get my blog to rank for some targeted keywords but
  I’m not seeing very good gains. If you know of any please share.
  Appreciate it! You can read similar art here: E-commerce

  Reply
 2. Good day! Do you know if they make any plugins to assist with
  SEO? I’m trying to get my website to rank for some targeted keywords
  but I’m not seeing very good success. If you know of any
  please share. Many thanks! I saw similar article here: Auto Approve List

  Reply
 3. Hi! Do you know if they make any plugins to assist
  with SEO? I’m trying to get my website to rank for some targeted
  keywords but I’m not seeing very good gains.
  If you know of any please share. Many thanks! You can read
  similar text here: Scrapebox AA List

  Reply

Leave a Comment