एका पिसाने मोर होत नाही


जलद कथामालिका लेखन – जानेवारी २०२४विषय – म्हणीवरून कथाएका पिसाने मोर होत नाही – भाग १“समू, अगं जरा अभ्यास करत बस जा. कधीपासून टि.व्ही लावून बसली आहेस.” साधना आपल्या मुलीला, समताला म्हणाली.“करेन गं आई नंतर. त्याला असा कितीसा वेळ लागणार आहे!” समता बेफिकीरपणे आपल्या आईचं बोलणं उडवत लावतच म्हणाली.“अगं तुझी परीक्षा जवळ आली आहे, म्हणून बोलतेय ना. एरवी तुला कोणी काही बोलतं का?” साधना शांतपणे म्हणाली.“असुदेत परीक्षा! मला चांगलेच गुण मिळतील, हे मला माहितीये. तू नको इतकं टेन्शन घेऊस.” समताचा स्वर आताही तसाच बेफिकीर होता.“ते गुण मिळवण्यासाठी पण कधीतरी नीट लक्ष द्यावं लागतं; पण हल्ली तर तू पुस्तकांचं तोंडच बघत नाहीयेस.” साधना म्हणाली आणि समताने वैतागलेल्या चेहऱ्याने तिच्याकडे पाहिलं.“ए आई गं… काय उगीच माझ्या मागे लागली आहेस! माझा अभ्यास मला काय माहीत नाही का? मी बरोबर अभ्यास करते. आतापर्यंत उगीच नेहमी टॉप करत आलेले नाहीये. मला माहितीये मला लगेच सगळं समजतं आणि मी परीक्षेत पण ते सगळं बरोबर लिहिते.” समता जराशा वैतागलेल्या आवाजात म्हणाली.“तू आतापर्यंत चांगलाच अभ्यास करत आली आहेस हे आम्हाला पण माहितीये गं; पण हल्लीचा तुझा आणि अभ्यासाचा संबंध बघता आम्हालाच काळजी वाटायला लागली आहे.” साधना काळजी व्यक्त करत म्हणाली.“उगीच काहीही हां! तुम्ही नको त्या गोष्टींचा विचार करत बसताय.” समता म्हणाली.“माणसाने इतकंही बेफिकीर असू नये.” मधेच कमलताईंनी, समताच्या आजीने म्हटलं.“काय आहे यार तुम्हां लोकांचं! धड सुखाने टि.व्ही पण पाहू देत नाहीत.” समता चिडचिड करतच म्हणाली आणि टि.व्हीचा रिमोट तिथेच काहीशा रागाने आपटतच आतल्या खोलीत निघून गेली.“कसं समजवायचं या मुलीला! तिच्या भल्यासाठीच सांगितलं ना.” साधनाने रागाने आत जाणाऱ्या समताला पाहून एक हताश सुस्कारा सोडला आणि कमलताईंना म्हणाली.“तिच्या भल्यासाठी सांगितलं हे आपल्याला कळतंय गं; पण तिला कळतंय का? नाही ना! मग आता थोडी शांत रहा पाहू.” कमलताई आपल्या सुनेला, साधनाला समजुतीच्या स्वरात म्हणाल्या.“कसं शांत राहणार ओ आई? ही मुलगी हुशार आहे हुशार आहे म्हणून आपण आतापर्यंत तिचं कौतुकच करत आलोय; पण आताशा तिचं वागणं बोलणं पाहता मलाच स्वतःच्या संस्कारांवर शंका घ्यावीशी वाटतेय.” साधना म्हणाली आणि बाजूलाच बसलेल्या कमलताईंनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला.“अगं… वेडी आहेस का! अशा गोष्टींवरून कोणी संस्कारांवर शंका घेतं का? संस्कारांचं म्हणशील तर आपले संस्कार उत्तमच आहेत. कसं असतं ना की मुलांचं हे वयच असं असतं की त्यांना वाटू लागतं आपल्याला चांगलीच समज आली आहे. बरं, समज तर आली आहे आणि तरीही घरचे लोक आपल्याला ज्ञान वाटत फिरत आहेत, जसं काय आपण लहानच राहिलोय. या नादात आपलं चांगलं सांगणं पण त्यांना उलटंच वाटतं. म्हणूनच म्हणतेय तू आता शांत रहा.” कमलताई साधनाला शांतपणे समजावत म्हणाल्या.“तुम्ही म्हणताय ते बरोबरच आहे ओ आई; पण म्हणून काय आपण हे वागणं फक्त बघत बसायचं? अशाने ती बिघडणार नाही का? योग्य वेळी मुलांना योग्य ती समज पण द्यायलाच हवी ना.” साधना म्हणाली.“आता बघ, स्वतःच काय म्हणालीस? योग्य वेळी योग्य ती समज द्यायलाच हवी! मला सांग, आपली समता अगदीच वाईट मार्गाला लागली आहे का? हां म्हणजे बेफिकीर वागणं वाढतंय; पण वाईट मार्गाने जात आहे का?” कमलताईंनी साधनाला विचारलं.“नाही. वागण्यात फरक पडला आहे हे खरं असलं तरी ती वाईट मार्गाला तर नक्कीच नाही लागलेली.” साधना ठाम स्वरात म्हणाली.“मग आता योग्य वेळ आलीच, तरच काही बोलायचं. तिला अभ्यासात बेफिकीर राहायचं आहे ना? मग राहू दे. स्वतःला ठेच लागल्याशिवाय अक्कल जागेवर येणार नाही. शेवटी तिला स्वतःलाच जाणीव व्हायला हवी की एका पिसाने मोर होत नाही! कळतंय का मला काय म्हणायचंय?” कमलताईंनी आपलं बोलणं पूर्ण करत विचारलं.यावर साधनाने होकारार्थी मान डोलावली.क्रमशः© कामिनी खानेकमलताईंचा विचार योग्य ठरेल का? ‘एका पिसाने मोर होत नाही!’ याची समताला जाणीव होईल का?जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा. 

एका पिसाने मोर होत नाही – भाग २असेच पुढचे काही दिवस गेले. आपल्याला सगळं काही जमतंय, जास्त अभ्यास करण्याची गरज लागत नाही, आपण नेहमी अव्वलस्थानीच असू, या अन् अशा अनेक विचारांमध्ये समता जगत होती. आता हे विचार खरे ठरणार की भ्रम ठरणार, हे तर तिला येणारा काळच सांगणार होता.“तुझा अभ्यास तर झालाच असेल ना?” समताची वर्गमैत्रीण तन्वीने तिला विचारलं.“हो, त्यात काय एवढं! माझा अभ्यास पटकन होतो.” समता आपल्या हुशारीचा अहं दाखवतच म्हणाली.“हां ना. तुझं बरं आहे गं. सगळं पटकन समजतं म्हणूनच तर स्कॉलर आहेस. नाहीतर आम्हाला बघ, एका विषयाचा अभ्यास करतानाच नाकी नऊ येतात.” दुसऱ्या एका मैत्रिणीने, तृप्तीने म्हटलं.“हो ना. त्यामुळे आम्ही टॉप करणं तर दूरच राहिलं. तुला मात्र मानलं पाहिजे हां.” तन्वी म्हणाली.या सर्व कौतुकाने हुरळून गेल्यामुळे समताच्या चेहऱ्यावर अहंभाव साफ झळकत होता.समता आणि तिच्या या मैत्रिणी नवव्या इयत्तेत शिकत होत्या. समता लहानपणापासूनच खूप हुशार असल्याने दरवर्षी पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण व्हायची. सोबतच इतरही स्पर्धांमध्ये पहिल्या तीन क्रमांकांमध्ये तिचं नाव जवळपास ठरलेलंच असायचं. स्वभावानेसुद्धा छान असल्याने ती शिक्षकांचीही आवडती विद्यार्थिनी होती. घरातूनही तिच्या हुशारीचं नेहमी कौतुक होत असे.गेल्या दीड वर्षापासून मात्र हळूहळू तिच्या स्वभावात बदल होत चाललेले. तिच्या या काही मैत्रिणी अति कौतुकाचे पूल बांधायच्या. ‘तू मुळातच हुशार आहेस’, ‘तुला सगळं जमतं’, इ. गोष्टी तिच्या मनावर बिंबवल्या जात होत्या. जरी हे सर्व बऱ्याच अंशी खरं असलं तरी समंजस असणाऱ्या समताचं मन चुकीच्या पद्धतीने मनावर कोरल्या जाणाऱ्या या गोष्टींना भुलत होतं. परिणामी, जास्त अभ्यास न करताही आपणच नेहमीप्रमाणे पुढे असणार आहोत ही बाब तिच्या डोक्यात पक्की होत चाललेली.चाचणी परीक्षा सुरू झाली होती आणि आपल्याला सर्व काही येतंय या विचारात असलेल्या समताला आता मात्र प्रश्नपत्रिकेत बऱ्याच गोष्टी लक्षातच येत नव्हत्या.‘हा प्रश्न मी वाचलेल्या भागातलाच आहे ना? हो… पण मग वेगळं काहीतरी का वाटतंय बरं? जाऊ दे! कदाचित आजचा पेपरच कठीण काढला असेल.’ पहिलाच पेपर सोडवताना समता मनोमन विचार करत होती आणि स्वतःच स्वतःला दिलासाही देण्याचा प्रयत्न करत होती.पुढचे दोन पेपर पण असेच गेले आणि आता मात्र तिला काळजी वाटायला लागली होती. कधीही परीक्षा अवघड न वाटल्याने यावेळच्या स्वतःच्या अवस्थेला पाहून तिचं पुढील विषयांच्या अभ्यासात पण लक्ष लागत नव्हतं. अखेर कशीबशी परीक्षा संपली होती.आज चाचणी परीक्षेचा निकाल लागला होता. नेहमी वर्गातच काय, तर सर्व तुकड्यांमधून पहिली येणारी समता आज मात्र जेमतेम गुणांनी उत्तीर्ण झालेली. गुण जरी चांगलेच असले तरी तिच्या नेहमीच्या गुणांपासून बरंच अंतर राखूनच होते.“तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती गं समता. इतकी हुशार मुलगी तू, एवढे कमी गुण कसे काय मिळाले? काही अडचण होती का? अभ्यास झाला नव्हता का?” वर्गशिक्षिकांनी समताला विचारलं; पण समता काहीच नाही म्हणाली.“बरं असुदेत. होतं असं! यावेळी जे झालं ते झालं; पण पुढच्या वेळी मला आधीसारखीच समता दिसायला हवी हां. चल, आता जास्त विचार करू नकोस.” समताला गप्प बसलेलं पाहून त्यांनीच पुन्हा म्हटलं. तसं समता आपल्या जागेवर जाऊन बसली.आज समोर इतरांच्या होत असलेल्या कौतुकाने तिच्या मनात असूया जरी नसली तरीही स्वतःसाठी वाईट नक्कीच वाटत होतं. आपण स्वतःच स्वतःला इतकं महान समजायला लागलो होतो, या गोष्टीचा तिला पश्चात्ताप वाटत होता.घरी आल्यावर आजी आणि आईला समोर पाहून आतापर्यंत रोखून ठेवलेला भावनांचा बांध फुटला आणि ती आईच्या कुशीत शिरून हमसून हमसून रडायला लागली होती.साधना आणि कमलताई, दोघींनाही नक्की काय झालं हे कळत नव्हतं.क्रमशः© कामिनी खाने 

एका पिसाने मोर होत नाही – भाग ३ अंतिम“समू, अगं काय झालं? काही दुखतंय का? की कोणी काही बोललं?” साधनाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत विचारलं.समताचं रडू मात्र थांबतच नव्हतं.“अगं तू सांगशील तेव्हा कळेल ना आम्हाला? पटकन सांग पाहू. उगीच जीवाला घोर लावू नकोस.” कमलताई पण काळजीने म्हणाल्या.अखेर समताचं रडणं थांबलं आणि ती हुंदके देतच म्हणाली,“आज चाचणी परीक्षेचा निकाल लागला.”“अगं मग यात इतकं रडण्यासारखं काय आहे? कमी गुण मिळाले का? की नापास झालीस? असेल तरी ठीक आहे.‌ पुढच्या वेळी चांगला अभ्यास कर.” साधना तिला समजावत म्हणाली.हे ऐकून समताच्या मनातले अपराधी भाव वाढले होते. इतके दिवस आपण घरच्यांचं न ऐकूनही ते आपल्याला समजून घेत आहेत हे पाहून तिला तिच्या कौतुकाचे पूल बांधणाऱ्या मैत्रिणी आठवल्या, ज्या आज मात्र तिला जराही भावही देत नव्हत्या.“नापास नाही झाले; पण खूप कमी गुण मिळाले. मी… मला कधीच एवढे कमी गुण मिळाले नव्हते आणि यावेळी…” हुंदके देत बोलत असताना पुन्हा तिचं रडू बाहेर पडलं.“असुदेत गं. उत्तीर्ण झाली आहेस ना? मग बस झालं. आताच्या अनुभवावरून शिकवण घेऊन पुढच्या वेळी चांगला अभ्यास कर.” साधना शांतपणे तिची समजूत घालत म्हणाली.“अगदी खरं आहे. अनुभवानेच माणूस शिकत असतो. मला सांग, आम्ही सांगून काही फरक पडला असता का? नाही ना? पण आता तुला स्वतःलाच जाणीव झाली असेल की आपल्या भल्यासाठी काय गरजेचं असतं. तू हुशार आहेसच गं, फक्त हुशारीचा गर्व करायला जाऊ नकोस. एकदा किंवा काही वेळा मिळालेल्या यशामुळे पुढे पण आपणच यशस्वी असू, हा समज कधी ठेवायचा नाही. यश मिळतंय, तर मेहनतीची पण तितकीच कदर ठेवायची. हुरळून गेल्यामुळे नुकसान आपलंच होणार असतं. एक म्हण पण आहे, ‘एका पिसाने मोर होत नाही!’ सांगण्याचा उद्देश काय की, तुझं यश तुझंच असणार आहे गं; पण त्या यशाने हुरळून न जाता आणखी मेहनत करण्याची तयारी ठेव.” कमलताई समताला म्हणाल्या.“आई अगदी बरोबर बोलत आहेत. हे बघ, आम्ही काय तुला दिवसरात्र अभ्यासाला जुंपत नाहीयेत आणि हे तुला पण चांगलंच माहितीये. फक्त आज तुला स्वतःलाच हे जे दुःख होतंय ना ते जर का तुला टाळायचं असेल, तर स्वतःसाठी काय योग्य अन् काय अयोग्य हे ओळखायला शिक. तुला जमेल तितकं कर. सगळं यायलाच हवं, सगळीकडे अव्वल स्थान कायम राखलंच पाहिजे, आमच्या तुझ्याकडून अशा काहीच अपेक्षा नाहीयेत. तुझं चांगलं भविष्य घडावं, तू माणूस म्हणून उत्तम घडावीस, हीच काय ती आमची इच्छा आहे. तुझा दादा कसा स्वतःच्या मेहनतीने बाहेर शिकायला गेलाय, तसं तू पण स्वतःचं अस्तित्व जपण्यासाठी प्रयत्न करावेस असं आम्हाला वाटतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू कोणत्याही प्रकारचं दडपण न घेता हे सगळं करायला पाहिजेस. ते करताना तुला यश मिळेल या गोष्टीची तर खात्री आहेच आम्हाला, फक्त तुझी आजी म्हणाली तसं थोड्याफार यशाने हुरळून जाऊ नकोस. असं वागलीस ना, तर आपोआप तुझ्या मनाचं समाधान होईल.” साधना मायेने तिला जवळ घेत म्हणाली.आई आणि आजीचं बोलणं ऐकून समताला आता बरंच मोकळं झाल्यासारखं वाटत होतं. मनात दाटून आलेल्या भावनांना आवर घातला गेलेला.“थॅंक यू आई आणि आजी! मी तुमच्यासोबत कसं पण वागत होते ना? मलाच अचानक माझ्या हुशारीचा मोठेपणा वाटायला लागलेला. आज कळतंय की आपली जागा काही क्षणांत बदलू पण शकते. आतापासून मी अजिबात असं काही करणार नाही. खरंच खूप खूप सॉरी!” समता पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाली.“तुझं तुला कळलं ना, बस झालं! आता चल, आवरून ये. रडून रडून चेहरा बघ कसा झाला आहे.” साधना किंचित हसतच म्हणाली आणि यावर समता पण लगेचच आवरायला निघून गेली.समाप्त© कामिनी खानेथोड्याशा यशाने हुरळून जाण्याने झालेले परिणाम दाखवण्याचा हा छोटासा प्रयत्न कसा वाटला नक्की कळवा. 

6 thoughts on “एका पिसाने मोर होत नाही”

 1. Hello! Do you know if they make any plugins to help with SEO?
  I’m trying to get my blog to rank for some targeted keywords but I’m not seeing very good success.
  If you know of any please share. Cheers! You can read similar article here:
  Dobry sklep

  Reply
 2. Hi there! Do you know if they make any plugins to help with Search Engine Optimization? I’m
  trying to get my website to rank for some targeted keywords but I’m not seeing very good gains.
  If you know of any please share. Appreciate it!
  I saw similar article here: Backlink Building

  Reply
 3. Wow, marvelous weblog structure! How long have you ever been running a blog for?
  you make running a blog glance easy. The full glance of
  your web site is great, let alone the content! You can see similar here e-commerce

  Reply

Leave a Comment