उपकाराचं ओझं-1

“म्हणजे या महिन्यात किराणा भरता येणार नाही..”

ती आवंढा गिळतच नवऱ्याला म्हणाली,

तोही हतबल होता,

एक छोटीशी नोकरी करायचा, पगारात घरातलं भागायचं,

हाताशी काही पैसेही जमवले होते,

खाऊन पिऊन समाधानी होते दोघे,

मुलाला सरकारी शाळेत टाकलं होतं, त्यामुळे तो जास्त खर्च नव्हता,

पण यावेळी परिस्थिती अशी आली की हाताशी पैसेच उरले नव्हते,

कारण अचानक गावाकडून त्याच्या घरच्यांचा फोन आला,

वडील आजारी आहेत, हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करायला सांगितलं आहे,

कमावणारा तो एकटाच,

दरमहा गावी पैसे पाठवायचा,

पण यावेळी अचानक मोठी रक्कम लागणार होती,

त्याने गाठीशी असलेली सेविंग आणि या महिन्याचा पूर्ण पगार सोबत ठेवला,

गावाकडे रवाना झाला, ऑपरेशनला गाठीशी जेवढे पैसे होते त्याच्या चारपट खर्च येणार होता,

बायकोने दागिने गहाण ठेऊन पैसे जमवले, पण तरीही रक्कम कमीच पडत होती,

त्याला कळेना काय करावं,

हॉस्पिटलमध्ये त्याच्या ओळखीचे असल्याने त्यांनी पैसे नंतर देण्याची मुभा देऊन ऑपरेशन केले,
****

Leave a Comment