तिची शेवटची आशा सम्पली,
नव्या जोडीदारासोबत नव्याने प्रेम शोधू लागली,
प्रेम एकदाच होतं का?
माहीत नाही,
पण प्रयत्न आपल्या हातात आहेत…
लग्न झालं,
तिचा जोडीदार, एखाद्या राजकुमाराला शोभेल असा,
आणि एखादीच्या स्वप्नातला जोडीदार असेल अगदी तसा..
इतर मुलींना हेवा वाटायचा तिचा,
पण जे जवळ असतं त्याची किंमत नसते,
पण एखादी गोष्ट लांब असेल तर तिची ओढ आवरता येत नाही,
या दहा वर्षात तिने त्याला विसरायचा प्रयत्न केला,
ती विसरली सुध्दा,
आता दिवसातून फक्त एकदा त्याची आठवण येते,
एवढंच..!
आपल्या सांसारिक कर्तव्यात, जबाबदारीत कधीही मागे पडली नाही,
तिचं हृदय ती गमावून बसली होती,
आता फक्त उरलं होतं ते यांत्रिक शरीर,
तिने त्या शरीराला प्रशिक्षण दिलेलं,
वेडीवाकडी वाट चालायची नाही,
आणि याचमुळे तिची नजर जागेवरून हलली नव्हती,
कार्यक्रमात एकटक नजरेने ती समोर बघत होती,
मात्र आवाजाचा मागोवा घेत तिची नजर कान बनून त्याला शोधत होती,
ती प्रचंड एकरूप झाली होती आवाजाचा कानोसा घेत,
तो आहे, इथेच कुठेतरी…
मागच्या कुठल्या तरी खुर्चीवर,
मला आवाज येतोय, तोच आहे हा…दहा वर्षानंतरही तसाच्या तसा अगदी कानात घुमतोय…
पण तिची कर्तव्य, तिचे संस्कार आणि तिचं पातिव्रत्य,
तिला जागेवरून हलू देत नव्हतं,
असं वाटायचं हा आवाज बंद व्हावा, आणि मनाची सैरभैरता थांबावी,
पण तो तिथेच होता..!
तिची ही अवस्था तिच्या नवऱ्याच्या नजरेतून सुटली नव्हती,
तो बराच वेळ तिच्याकडे बघत होता,
शेवटी त्याने विचारलं,
“काय झालं?”
ती घाबरली, काय उत्तर द्यावं तिच्या स्तब्धतेचं?
“काही नाही, जराशी चक्कर आली होती”
तो हसला, म्हणाला…
“तो बघ, तिथे बसलाय…”
नवऱ्याने बोट दाखवलं तसं तिने आधाश्यासारखं मागे पाहिलं..
तोच होता, तिथेच..!!
ती भानावर आली,
नवऱ्याकडे अपराधी भावनेने पाहिलं,
मटकन खुर्चीवर बसली,
लग्नानंतर तिने नवऱ्याला त्याच्याबद्दल सांगितलं होतं प्रामाणिकपणे,
पण आज हे सगळं…
तोही खाली बसला, तिच्याकडे पाहिलं,
ती म्हणाली, “सॉरी..”
तो हसला, म्हणाला…
“तू त्याचा आवाज ओळखतेस, आणि मी तुझं मन…”
समाप्त
Sundar 👌🏻
Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?