तिने गर्दीतही तो आवाज ओळखला आणि ती स्तब्ध झाली,
एका संगीताच्या कार्यक्रमात ती आणि तिचा नवरा गेले होते,
प्रचंड गर्दी, खुर्च्या अगदी एकमेकांना खेटून लावल्या होत्या,
लोकांचा आवाज, प्रचंड वर्दळ..
ती आणि तिचा नवरा शांतपणे बसून कार्यक्रम सुरू होण्याची वाट बघत होते,
पण तिने या गर्दीतही एक आवाज ओळखला,
ती सुन्न झाली,
तोच आवाज,
दहा वर्षांपूर्वी जो सतत आजूबाजूला असायचा,
तिच्या मनात,
तिच्या गाण्यात,
तिच्या हृदयात..
तिला समजलं होतं,
आज कार्यक्रमात तोही आलेला दिसतोय,
त्यालाही आवड होती संगीताची,
या गायकाचा एकही कार्यक्रम तो चुकवत नसायचा,
आज तो इथे येईल याची तिला कल्पनाही नव्हती,
तिची स्थिर नजर गर्दीत त्याला शोधत होती,
वाटत होतं उठावं आणि त्याला शोधावं,
दहा वर्षांनी, त्याला एकदा डोळे भरून पहावं,
जिवाच्या आकांताने विचारावं त्याला…
“का असं केलंस? का असं वागलास?”
दहा वर्षांपूर्वीचा काळ सरसर डोळ्यांसमोरून गेला,
तो आणि ती,