आदिपुरुष: प्रामाणिक मत | Adipurush Genuine Review

आदिपुरुष ची तिकिटे बुक केली होती, मिस्टरांना म्हणाले, “लोकं उगाच ट्रोल करताय इतक्या चांगल्या चित्रपटाला, आधुनिक दाखवलं म्हणून काय, रामायण आहे ते, आजच्या पिढीला ज्या भाषेत कळेल त्या भाषेत दाखवलं आहे”. मुळातच फक्त चांगलं तेवढं उचलायचं असा स्वभाव असणाऱ्या मला चित्रपट बघतांना यातलं नेमकं काय उचलावं हा प्रश्न पडला.अनेक review वाचूनही चित्रपट बघण्याचा अट्टहास केला, कारण वाटायचं की लोकं आजकाल काही झालं की लगेच boycott करतात, म्हणून काय लोकांच्या मतावर आपण जायचं?

चित्रपटाला गेलो, सुरवातीला एनिमेटेड इमेज स्वरूपात छानपैकी आधीची कथा सांगितली. चित्रपट पाहून झाल्यानंतर वाटलं की यांनी या चित्रांचा नुसता स्लाईड शो दाखवला असता तर बरं झालं असतं.

VFX चे 600 कोटी नक्की कुठे खर्च केले समजलं नाही, भयाण अंधार, अंधारातच सगळे सिन. छान असा सूर्योदय, रम्य पहाट, स्वच्छ सुंदर सकाळ, ताजातवाना चेहरा असं काही दिसलंच नाही.

रावणाने शिवस्तुती साठी शिवतांडव म्हटलेले तर इथे केवळ सीतेसमोर शायनिंग मारायची म्हणून रावण ते म्हणतोय, किती हा वेडेपणा. हो पण रावण म्हणून सैफ च्या अभिनयाला 10/10. आता त्याला जसा रावण सांगितला तसाच त्याने तो सादर केला, सुरवातीला त्याला मिळालेले वरदान आणि त्याबाबत त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव, अप्रतिम ! डोळ्यातून या माणसाने रावण दाखवून दिला. सैफचा अभिनय बघायचा असेल तर मात्र जरूर चित्रपट बघा.

चित्रपटात संवाद कमी आणि VFX effect जास्त. ते बघून बघून प्रेक्षक कंटाळतात,

प्रभासला आम्ही बाहुबली मध्ये तरी का पसंत केलं हा प्रश्न आम्हाला पडायला लागला. बाहुबली म्हणजे पूर्णपणे दिग्दर्शकाची हुशारी, त्यामुळेच तो चित्रपट चालला. पण इथे मात्र माती खाल्ली. या ना त्या अँगल ने प्रभासमध्ये राम शोधायचा प्रयत्न केला पण तो सापडलाच नाही. राम निर्विकार, शांत होते पण म्हणून चेहऱ्यावर शून्य भाव असावेत असं नाही. इथेच कस लागतो ते अभिनय डोळ्यातून कसा सादर करायचा ते. राम म्हणजे तेजस्वी, सुंदर चेहरा. पण प्रभासचे ते फुगलेले गाल, काळवंडलेले ओठ, राक्षसी डोळे आणि नको ती हेअरस्टाईल बघून डोक्यावर हात मारून घेतला. लक्ष्मण ची भूमिका करणारा तर कधी एकदा पॅकप होतेय आणि घरी जातोय या घाईत acting करतांना दिसला. चित्रपटात नावंही राम, सीता, लक्ष्मण अशी न घेता राघव, जानकी, शेष अशी का घेतली हे ओम राऊतच जाणे. क्रिती सेनॉनने अगदीच निराशा नाही केली पण सीतेचा अभ्यास कमी पडला. सीता म्हणजे केवळ सुंदर एवढीच तिची ओळख नव्हती, सुंदर तर मंदोदरी, शुपर्णखाही होत्या.. पण सीतेमध्ये एक विशेष तेज होतं, ती तेजस्वी होती, हुशार होती, तिला धर्माची जाण होती. हे सगळं चित्रपटात यायला हवं होतं. रामायणाचा गाभा काय? धर्म, अधर्म, नीतिमत्ता, शौर्य, प्रेम यांची शिकवण देणं. पण या चित्रपटातून रामायण न वाचलेला एखादा शिकेल की राम जंगलात वटवाघूळांशी युद्ध करायचे, रावण अजगारांकडून आपली मालिश करून घ्यायचा, वनवासात राम, लक्ष्मण, सीता सोडून बाकी सगळे कार्टून होते, लक्ष्मणाने सीतेच्या रक्षणासाठी लेझर लाईट सोडले होते, रावणाचा भाऊ मेघनाथ याला टॅटूचा छंद होता, लक्ष्मणाला संजीवनी बुटी bath टब मध्ये देण्यात आलेली, रावण पार्ट टाइम म्हणून वेल्डिंग करत असायचा.

एकंदरीत VFX चा वापर, कथानकाचे सादरीकरण, प्रसंगांचा गर्भितार्थ, पात्रांचे निर्माण आणि संवाद यांची भट्टी जमली नाही की आदिपुरुष सारखा सिनेमा बनतो.

काहीजण म्हणतील बोलायला काय जातं, जो करतो त्यालाच कळतं.. पण मी जर त्या जागी असते तर खालील सल्ले दिले असते.

  1. रामायणाची सुरवात एका उल्हासित वातावरणात असलेला सिन घेऊन शूट.
  2. राम म्हणून राम चरण, सीतेच्या जागी सई पल्लवी
  3. राम सीतेचा विरह, विरहातून निर्माण झालेले काव्य हे प्रसंग
  4. राम, लक्ष्मण आणि सीतेची धर्म अधर्म यांबाबत चर्चा
  5. Background ला वेगवेगळे संस्कृत श्लोक, आधुनिक संगीताचे सूर आणि लय पकडून.
  6. हनुमान आणि राम यांची उत्कट भेट. Bgm साठी हळवे संगीत.
  7. शूर्पणखा आणि राम यांच्यात अधिक संवाद, परस्त्री अथवा परपुरूष यांबद्दलची भावना अधार्मिक आहे याचे विवेचन, त्यासाठी उत्कृष्ठ संवाद

एकंदरीत माझ्याकडून आदिपुरुष साठी 2/10 रेटिंग. यातला 1 गुण ओम राऊत यांच्या हिमतीसाठी आणि एक गुण vfx वर खर्च केलेल्या करोडो रुपयांसाठी.

10 thoughts on “आदिपुरुष: प्रामाणिक मत | Adipurush Genuine Review”

  1. cost cheap clomiphene without insurance can i order cheap clomid for sale can i purchase generic clomid without insurance clomid cost australia where buy cheap clomid without prescription can you buy clomiphene without a prescription how can i get clomid

    Reply

Leave a Comment