आईची जागा-1

आयुष्यातली 20-25 वर्षे ती आई वडिलांजवळ राहिलेली,
प्रत्येक आईप्रमाणे, तिचीही आई तिची नस अन नस ओळखे,
तिला काय आवडतं,
काय आवडत नाही,
तिला काय चालतं,
काय चालत नाही…
आईला सगळं माहीत असतं..

एके दिवशी अचानक फोन आला,

“स्वातीसाठी उत्तम स्थळ शोधलं आहे, लवकरात लवकर आटोपून घ्या”

आईच्या काळजात धस्स झालं,

मुलगी सोडून जाणार,

तिथे ओळखतील का तिला? समजून घेतील का तिला?

मुलगा खरंच उत्तम होता,

दोघांकडून होकार आला,

थाटामाटात लग्न झालं..

मुलगी सासरी जायला निघाली,

आईने जड अंतःकरणाने निरोप दिला..

वर्ष सरत गेले,

स्वातीचं सासर खूप दूर,

तिथेच तिने नोकरीला सुरवात केलेली, चांगला जम बसला तिचा..

स्वातीला आता वेळच नसायचा,

आपली आठवण तिला येत नाही याला आनंदही म्हणतात हे फक्त मुलीचे आई वडील जाणतात,

एके दिवशी तिच्या सासरी जायचा योग आला,

आईने भरपूर सामान घेतलं,
क्रमशः

भाग 2 अंतिम

Leave a Comment