अधीर मन झाले भाग 13

“हॅलो.. ओवी…काय गं… नेमकं काय झालंय?” समरने विचारले.”अहो काळजी करण्यासारखं एवढं काही झालं नाही वकीलसाहेब. तुम्ही नका टेन्शन घेऊ.””अगं पण सांग तरी ओवी. इकडे आम्हाला दोघांनाही खूप टेन्शन आलंय गं.””बरं..सांगते. अहो, थोड्या वेळापूर्वी एक टू व्हिलरवाला येऊन धडकला मला. त्यामुळे गाडी स्लीप होऊन मी खाली पडले. डाव्या हाताला मार लागलाय थोडा. पण डोन्ट वरी आता दवाखान्यातच आहे मी. जस्ट ड्रेसिंग झालंय. मेडिकल मधून औषधं घेऊन निघणारच आहे मी लगेच.””ओवी तू तिथेच थांब आम्ही येतोय तिकडे लगेच.” समर म्हणाला.”नाही…त्याची काही आवश्यकता नाहीये. मी ठीक आहे आता.””आता तू काहीही बोलू नकोस, आम्ही येतोय लगेच.” असे म्हणून समरने फोन ठेवला.”समर काय झालंय?” काळजीच्या सुरात कार्तिकीने विचारले.
घडलेला सर्व प्रकार समरने मग कार्तिकीला सांगितला. लगेचच त्याने गाडी काढली आणि दोघेही ओवीकडे जायला निघाले.”तरी मी म्हणत होते तिला, तू थांब आमच्यासोबत; पण ही मुलगी ऐकेल तर शप्पथ. आधीच आपलं लग्न पंधरा दिवसांवर आलंय. त्यात हे असं. आता आई, छोटी आई, आजी सगळे मिळून आमची शाळाच घेतील बघ तू.””आता तू पॅनिक होवू नकोस. शांत हो बरं. होईल सगळं ठीक. उलट आहे त्यापेक्षा जास्त काही घडलं नाही यातच देवाचे आभार मानायचे.””हो ना.”थोड्याच वेळात समर आणि कार्तिकी ओवीने दिलेल्या पत्त्यावर पोहोचले. गाडी पार्क करून दोघेही दवाखान्याच्या आत गेले.”ओवी…काय हे! कसं झालं गं असं?” काळजीच्या सुरात कार्तिकीने विचारले.”अगं जास्त काही नाही, काळजी करू नकोस.””आणि कोण होता तो? असा कसा येवून धडकला तुला?””काय माहिती.. कसली घाई होती त्याला. मला ओव्हरटेक करून पुढे जायच्या नादात धडकला.””अगं पण तू त्याला जाऊच कसं दिलं. दोन द्यायच्या ना ठेवून त्याच्या.”
“अगं बाई लोकांनी त्याला ट्रॅफिक पोलिसांच्या ताब्यात दिलं ते पाहून घेतील काय करायचं ते. जाऊ दे तसंही काही गोष्टी घडायच्या असल्या की त्या घडतातच.””ओवी.. अगं किती लागलंय पण ते. किती मोठं बँडेज बांधलंय त्यावरूनच अंदाज येतोय. घरी गेल्यावर आपलं काही खरं नाही आता.””जाऊ दे आता तो विचारच करु नकोस. जे होईल ते होईल. पाहू तेव्हाचं तेव्हा.”
“अगं पण ओवी. आता गाडी नाही चालवता येणार तुला.” समर म्हणाला.”येईल की त्यात काय अवघड आहे. एवढ्या तेवढ्याने काही होत नाही ओ मला. तसंही उजवा हात चांगला आहे ना. चालवेल मी बरोबर.””वेड लागलंय का ओवी तुला? ह्या अशा अवस्थेत तू गाडी चालवणार आहेस?” काळजीपोटी समर बोलला.”हो मग काय झालं त्यात?””एक काम कर कार्तिकी घेईल गाडी तू मागे बस.””ह्ममम…मला वेड लागलंय हिच्यापाठी बसायला. म्हणजे दुसरा ॲक्सिडेंट फिक्स समजायचा.” हसतच ओवी बोलली.”ओवी… अगं काय हे! समर समोर माझी इज्जत नको काढूस गं.” हळू आवाजात ओवीच्या कानात कार्तिकी बोलली.
“जे खरं ते मी बोलले आणि हे तुलाही माहितीये आणि नसेलच तुला मान्य करायचं तर मग ही घे गाडीची चावी. मी घेते तुझ्यापाठी बसण्याची रिस्क.” खोचकपणे ओवी बोलली.”काही नको. राहू दे तुझ्याकडेच. मला भीती वाटते.” कार्तिकीनेही तिची भीती मान्य केली.”काही कोणी गाडी घेऊ नका मी सोडतो तुम्हाला घरी… चला.””अहो वकिलसाहेब, काळजी करू नका, खरंच मी तुमच्या बायकोला व्यवस्थित घेऊन जाईल. विश्वास ठेवा माझ्यावर.” ओवीने जणू समरला टोमणा मारला.”काय हे ओवी… कार्तिकीची एकटीचीच नाही तर तुमच्या दोघींचीही काळजी आहे मला म्हणून मी बोलतोय. समजलं…””पण खरंच आम्ही जाऊ व्यवस्थित. डोन्ट वरी.””नक्की ना?””हो… य….नक्की.””ओके चालेल काही हरकत नाही.””अरे पण जेवणाचं कसं करायचं, तुम्हाला दोघींना भूक नाही लागली का? काहीतरी खाऊन घेता का आधी.” समरने विचारले.”नाही नको, आधी आपण घरी जाऊयात ओवी. आधीच मला खूप टेन्शन आलंय. तू पण थोडं समजून घे ना समर.”
“आता झालं ते झालं. तुझ्या टेन्शन घेण्याने झालेल्या गोष्टी बदलणारं आहेत का दी. चल आता जेवायचं नाही मग निघायचं का?” ओवी बोलली.”हो चल.”तेवढयात समरचा फोन वाजला.”कार्तिकी दोनच मिनिट थांब ना.””आता काय झालं?””अगं आज माझ्या भावाला मी प्रॉमिस केलं होतं की आज तुझी आणि त्याची व्हिडिओ कॉलवर भेट घडवून देईल. नेमकी मी विसरलो होतो ही गोष्ट. त्याचा फोन येतोय आता. दोन मिनिट बोल ना त्याच्यासोबत.””तू पण ना समर. मला खरंच सवय नाही रे असं व्हिडिओ कॉलवर बोलायची.” कार्तिकी म्हणाली.”आज जर तू जर नाही बोलली ना त्याच्याशी तर खूप टोमणे मारेल तो मला. आधीच रात्री मी त्याला सांगितले होते आपण आज भेटतोय म्हणून. मग तर आणखीच खेचेल तो माझी. त्यामुळे काही तरी बोल पण बोल बाई.””अरे पण…””काय हे दी…आता लग्न होणार आहे तुझं. हे  असं वागून कसं चालेल. जा बोल बरं. वकील साहेबांचे भाऊच आहेत फोनवर कोणी परकं नाहीये.”L”हो मग…मी कसं तुझ्या बहिणीसोबत बोलतो. मग तुला माझ्या भावाशी बोलायला काय प्रॉब्लेम आहे?” लटक्या रागातच समर बोलला.”बरं बोलते बाबा. पण इथे? ही जागा आहे का बोलायची? लोकं काय म्हणतील?””आली का पुन्हा तू लोकांवर. नको ना विचार करू जगाचा.” समर बोलला.”अरे आवरा रे पटकन्. किती टाइमपास करता राव तुम्ही. जरा माझाही विचार करा ना. मला त्रास होतोय.” ओवी म्हणाली.”सो सॉरी ओवी. समर तू लाव फोन. बोलते मी.” ओवीसाठी कार्तिकीने मग फोनवर बोलायला लगेचच होकार दिला.समरनेही मग लगेचच त्याच्या धाकट्या भावाला कॉल केला.”ये हाय संभव. आज काय सुट्टी, मज्जाये तुझी.””माझी काय मज्जा? आज तर तुझी मज्जा बाबा. तुझी सुट्टी कारणी जे लागली.” समरची खेचत संभव बोलला.’वकील साहेबांपेक्षा हे मॉडेल तर खूपच वेगळं दिसतंय.’ संभवचे बोलणे ऐकून मनातच ओवी बोलली.कार्तिकी आणि ओवी दोघीही मग एकमेकींकडे पाहून हसल्या. हे समरच्या नजरेतून काही सुटले नाही.”हो का..आता पुरे मी रूममध्ये नाहीये. जरा कंट्रोल.” समरने मग संभवला हलकाच दम भरला.”सॉरी सॉरी..मी विसरलोच आणि काय हे दादू..किती वेट करायला लावतो यार. सकाळपासून तुझ्या कॉलची मी वाट पाहतोय. वहिनी सोबत आहे म्हटल्यावर तू मला विसरणार हे मला आधीच माहीत होतं म्हणून न राहवून वाट पाहून शेवटी मीच कॉल केला. बरं आहे कुठे माझी वहिनी?” उत्साहात समरने विचारले.”आहे की इथेच, बोल.” कार्तिकीला मोबाईलच्या फ्रेममधे घेत समर बोलला.”ये हाय वहिनी…कशीयेस?” अगदी फ्रँकली संभवने विचारले. जणू काही त्याची आधीपासूनच कार्तिकीसोबत ओळख होती आणि तसेही संभव अगदी मनमोकळ्या स्वभावाचा मुलगा होता.”मी मस्त आणि तुम्ही?” कार्तिकीने थोडं अवघडल्यासारखंच उत्तर दिलं.”मी पण लय भारी वहिनी. दादू काहीही म्हण, सॉरी अरे; पण वहिनी तुझ्यापेक्षा थोडी जास्तच स्मार्ट आहे बरं का.” हसतच संभव बोलला.हे ऐकून कार्तिकीलाही मग हसू आले.”आताच पार्टी चेंज! दिस इस नॉट फेअर आ संभव!” लटक्या रागातच समर बोलला.”हे बघ आतापर्यंत मी तुझ्याच पार्टीत होतो की नाही मग आता वहिनीची साईड घ्यायलाही कोणीतरी हवंच ना.””हो ना..अगदी बरोबर आहे बाबा तुझं. आता काय बोलणार मी आणखी.” खांदे उडवत आणि भुवया उंचावत समर बोलला.”तू काहीच बोलू नकोस आता. तुम्ही दोघेही मला एक सांगा फक्त, कशी झाली तुमची आजची डेट? काय काय मज्जा केली? ये सांगा ना प्लीज मलाही ऐकायला आवडेल.”संभवच्या या अशा अनपेक्षित प्रश्नावर कार्तिकी आणि समरने एकमेकांकडे चमकून पाहिले. काय बोलावे ते दोघांनाही समजेना.”काय हे संभव…आधीच कार्तिकी तुझ्याशी बोलताना कन्फर्टेबल नाहीये, त्यात हे असे काहीबाही प्रश्न विचारून तू तिला अजून अनकनफर्टेबल फील करवतोयेस. हे योग्य नाही बरं का.””सो सॉरी वहिनी..तू असं काही वाटून घेऊ नकोस गं. मला सवय आहे दादूची खेचायची. इव्हन त्याशिवाय आमचं बोलणंच कंप्लीट होऊ शकत नाही आणि त्यात आता तू पण ॲड झालीस बरं का. त्यामुळे तूही आता सवय करुन घे माझ्या बोलण्याची.””हो घेईल पण मला थोडा वेळ द्याल?” कार्तिकी बोलली.”तुला हवा तेवढा वेळ घे तू.” हसतच संभव उत्तरला.”बरं झालं असेल तुमचं बोलणं तर ठेवा ना आता फोन.” केविलवाण्या सुरात ओवी बोलली.”सॉरी गं ओवी एक्सट्रीमली सॉरी. संभव आता ठेव फोन रात्री बोलू आपण. इकडे आमच्या मेहुणीबाई ताटकळत उभ्या आहेत. त्यात तिची तब्येत जरा खराब आहे. आपण नंतर बोलू.””दादू… म्हणजे तुम्ही आज तिघंजण डेटवर गेला होतात की काय?” आश्चर्यकारकरित्या संभवने विचारले.”संभव…अरे काहीही काय बोलतोस. कंट्रोल यार. तू समजतोस तसं काहीही नाहीये. म्हटलं ना आपण रात्री बोलुयात म्हणून.” दोन चार पावलं बाजूला जात हलक्या आवाजात समरने संभवला दम भरला.”बरं बरं…बाय बोलू रात्री; पण आजचा तुमचा दिवस कसा गेला ते सगळं तू मला सांगणार आहेस. आधी प्रॉमिस कर मला.””बरं बाबा प्रॉमिस. मी सांगेल तुला सगळं. आता ठेवतो फोन… बाय.” म्हणत समरने अखेर फोन ठेवला.”बरं कार्तिकी…ओवी… माझं जरा ऐकता का. तुम्ही आधी खाऊन घ्या काहीतरी. चला बरं. आधीच खूप उशीर झालाय. तसं जाऊ नका. मला नाही आवडणार ते.””पण वकील साहेब..तुमच्या मॅडमच म्हणाल्या नको जेवायला. घरी जायला हवंत. मला तर कुणी विचारलं सुद्धा नाही. तसंही मला तर खूप भूक लागलीये, पण आता दी नाही म्हणत आहे तर राहू द्या. शेवटी बायकोचा शब्द पहिला.””ये गप गं ओवी. तुझ्या काळजीपोटी मी बोलत होते लवकर घरी जाऊयात म्हणून. उगीच काहीही अर्थ नको घेऊस आ.” कार्तिकी स्वतःची बाजू सावरत बोलली.”तू पण ना ओवी…भूक लागलीय तरी तशीच जाणार होतीस. हक्काने बोलता नाही येत का? चला आता उगीच वाद घालत बसू नका. गाडी राहू दे इथेच. ते बघ तिथे समोरच हॉटेल आहे. चला जाऊयात.”समर मग दोघींनाही घेऊन हॉटेलमधे गेला. त्यांच्या आवडीप्रमाणे सर्व ऑर्डर केले. जेवण झाल्यावर सगळे घरी जायला निघाले.”सावकाश जा ओवी आणि आजूबाजूला लक्ष ठेव. हात सांभाळून गाडी चालव.” काळजीपोटी समर बोलला.”पण काहीही म्हणा वकीलसाहेब..आजचा दिवस मी कधीही विसरणार नाही.””धन्य आहेस बाई तू… कमालच वाटते तुझी मला. शेवटी तू तुझंच खरं केलंस. जा आता सावकाश आणि घरी पोहोचल्यावर मेसेज नाहीतर कॉल करा मला.””होय… चला निघू आता आम्ही.” ओवी म्हणाली.”हो… जा सावकाश. बाय कार्तिकी.” कार्तिकीकडे पाहून समर बोलला.”बाय…” म्हणत कार्तिकिनेही समरकडे पाहून मग गोड स्माईल दिली. खरंतर दोघेही त्यांची ही आजची भेट कधीही विसरणार नव्हते.ओवी आणि कार्तिकी फायनली समरचा निरोप घेऊन घरी जायला निघाल्या. त्या दोघी गेल्यानंतर समरदेखील घरी गेला. कार्तिकीचा चेहरा काही केल्या समरच्या डोळ्यासमोरून जायलाच तयार नव्हता. दिवसभरातील सर्व आठवणी आठवून त्याच्या चेहऱ्यावर आपसूकच स्मित फुलले.तिकडे कार्तिकी मात्र खूपच टेन्शनमध्ये होती. घरी काय आणि कसे उत्तर द्यायचे हेच तिला समजत नव्हते. ओवीची अवस्था पाहून घरचे एक ना अनेक प्रश्न विचारणार आणि या सर्व प्रश्नांचा सामना करताना आणखी खोटं बोलून चालणार नव्हतं. याची दोघींनाही कल्पना होती. आधीच एक खोटं लपविण्यासाठी खूप वेळा खोटं बोलावं लागलं होतं त्यांना. हे आता इथेच थांबायला हवंय. दोघींनीही विचार करून खरे सांगण्याचा विचार अखेर फायनल केला.क्रमशःआता घरच्यांच्या प्रश्नांचा सामना कसा करणार ओवी आणि कार्तिकी? जाणून घ्या पुढील भागात. त्याबरोबरच समर आणि कार्तिकीच्या लग्नाच्या गमतीजमती आणि आणखी बरेच काही जाणून घेण्यासाठी पुढचा भाग मिस करू नका. परंतु, त्याआधी आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. तुमची एक छोटीशी कमेंट सुद्धा लिखाणाचा उत्साह द्विगुणित करून जाते. त्यामुळे कथा आवडत असेल तर प्लीज लाईक कमेंट जरूर करा.धन्यवाद©® कविता वायकर

6 thoughts on “अधीर मन झाले भाग 13”

 1. Hey! Do you know if they make any plugins to assist with Search Engine
  Optimization? I’m trying to get my blog to rank for some targeted keywords but I’m not
  seeing very good results. If you know of any please share.
  Appreciate it! You can read similar art here: Najlepszy sklep

  Reply
 2. Hey! Do you know if they make any plugins
  to help with SEO? I’m trying to get my site to rank for some targeted keywords but I’m not
  seeing very good results. If you know of any please share.
  Thank you! You can read similar text here: Hitman.agency

  Reply

Leave a Comment