कुलिंग पिरेड-4

सर्वजण जेवायला बसले, अक्षताने सर्वांना बटाट्याची भाजी वाढली. आधीपेक्षा बरी झालेली पण थोडी कच्ची राहिलेली. अक्षताच्या हे लक्षात आलं तेव्हा तिला घाम फुटला, तेवढ्यात सासरे म्हणाले, “छान झाली हो भाजी..” तिच्या देराण्या आणि सासू हसायला लागले, अक्षता म्हणाली, “पण थोडी कच्ची…” “असुदेत, कुलिंग पिरेड आहे..” च्यायला परत तेच…. शेवटी तिने नवऱ्याला विचारायचं ठरवलं, रात्री खोलीत … Read more

कुलिंग पिरेड-3

अक्षता सासरी आली. घरात इतकी सारी मंडळी होती की रोज तिला पाहुणे आल्याचाच भास होई. तिच्या माहेरी इन मिन 3 लोकं. ती एकुलती एक. भावंडं नसल्याने एकटेपणाची सल तिच्या मनात होतीच, त्यामुळेच तिने हे एकत्र कुटुंब पसंत केलेलं. सासूबाई अक्षताकडे आल्या, “चला सुनबाई, आज तुमच्या हातची भाजी खायचिये सर्वांना…कुलिंग पिरेड पर्यंत कर काय करायचं ते..” … Read more

कुलिंग पिरेड-2

“ही गोष्ट आई बाप समजून घेतात, सासरचे नाही..जाऊद्या तुम्हाला नाही कळणार..अक्षता, चल आजपासून तुझ्या ट्रेनिंगची सुरवात… आज बटाट्याची भाजी टाक बरं तुझी तूच..” “कशी करतात?” “ते डोकं आता तूच लाव.” अक्षताने तिचं डोकं लावून भाजी बनवली. वडील जेवायला बसले, समोरची भाजी बघून त्यांना कसंतरी झालं. बटाट्याची भाजी काळपट दिसत होती. “काय टाकलं गं यात?” “कांदे, … Read more

कुलिंग पिरेड-1

“पिंकू तुला काहीच येत नाही गं, कसं होईल तुझं त्या घरात?” “आई मला आधीच टेन्शन आलंय त्यात तू बोल अजून हे…” “लग्नाची तारीख इतक्या लवकर काढतील माहीत नव्हतं, बरं आता जेवढा वेळ आहे तेवढ्या वेळात शिकून घे जेवढं येईल तेवढं..” “चालेल, पण आई.. तिकडे इतकी माणसं आहेत…एकत्र कुटुंब आहे, मला जर सर्वांचा स्वयंपाक बनवायला लावला … Read more

उद्धार-3 अंतिम

घरी गेल्यावर प्रदीप च्या चेहऱ्यावर असलेली निराशा माधवने बरोबर हेरली.. “दादा, तुला वाईट वाटलं ना??” प्रदीप मौन राहिला.. “दादा मी लहान तोंडी मोठा घास घेतो, पण ऐक… तू प्रत्येकवेळी प्रत्येक ठिकाणी सगळीकडे असतोस, सगळीकडे फिरतोस, त्यामुळे लोकं तुला गृहीत धरतात…असं माणूस दुरावण्याची भीती त्यांना कधीच नसते, ते म्हणतात ना..अतिपरीचयात अवज्ञा… तेच झालंय… मी गावी नसतो, … Read more

उद्धार-2

प्रदीपचं सगळं अगदी सुरळीत होतं. थोडक्यात तो कम्फर्ट झोन मध्ये होता. पैसे येत असायचे, सगळे नातेवाईक, सगळा गाव त्याच्या सोबत असायचा. गावात कुणाच्याही घरी काहीही कार्यक्रम असो, लग्नकार्य असो. प्रदीप सर्वात पुढे असायचा. गावातली लोकं त्याला खूप मान देत. तो सुद्धा यातच खुश असायचा. प्रदीपने दुसऱ्या शहरात राहून खूप प्रगती केली. स्वतःचा व्यवसाय सुद्धा टाकला. … Read more

उध्दार-1

“तुला पुन्हा एकदा सांगतो, जाऊ नकोस…” प्रदीप आपल्या लहान भावाला जीव तोडून सांगत होता.. “दादा मलाही तुम्हाला सोडून जाण्यात धन्यता वाटत नाहीये, पण भविष्याच्या दृष्टीने मी जाणं रास्त आहे.” “कसलं भविष्य? तू गेलास तर तुझ्यापासून सगळे नातेवाईक, मित्रमंडळी सुटतील…अरे आपण आजवर त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी झालोय…तू गेलास तर तिकडचाच होऊन जाशील..” “दादा दूर गेल्याने नाती … Read more

जैसे ज्याचे कर्म-3 अंतिम

तिला लवकर कळा सुरू होतील असं वाटत नव्हतं त्यामुळे सगळे निर्धास्त होते, घरातही कुणी नव्हतं, त्यामुळे आता तिची बहीण घाबरली होती. सतीश पटकन कपडे बदलून निघायच्या तयारीत होता, त्याने आईला आणि दुर्गाला सांगितलं.. “वसुंधराला कळा सुरू झाल्या…मी निघतो..” “अरे तिच्या घरी कुणी नाही का? इकडे दुर्गाला कधीही कळ येईल.” “आई इकडे धावपळ करायला अख्ख गाव … Read more

जैसे ज्याचे कर्म-2

तिकडे आई आणि दुर्गा तिच्या नवऱ्याने पाठवलेला सुकामेवा मोठ्या उत्सुकतेने बघत होत्या. आई म्हणाली, “जावईबापू बघ, किती काळजी त्यांना…लाखात एक आहे माझा जावई..” हे ऐकताच दुर्गा लाजली. आई म्हणाली, “जावईबापूंना म्हणा इकडेच या राहायला काही दिवस… तेवढाच तुझ्यासोबत वेळ घालवता येईल..” दुर्गाचा चेहरा फुलला, तिने लगेच आपल्या नवऱ्याला फोन लावला.. “हॅलो, अहो मी काय म्हणते…थोडे … Read more

जैसे ज्याचे कर्म-1

सतीशची बहीण दुर्गा बाळंतपणासाठी माहेरी आली होती. आईने लेकीचे सगळे हट्ट पुरवत होती. दुर्गाचं हे पहिलं बाळंतपण त्यामुळे घरातले सर्वजण पुरेपूर काळजी घेत होते. दुर्गाला दोन भाऊ, सतीश आणि बजरंग. सतीशचं लग्न झालं होतं, त्याचीही बायको बाळांतपणासाठी माहेरी गेलेली. तिला सातवा महिना होता आणि बहिणीला आठवा. सतीश इकडे बहिणीची काळजी घेतच होता आणि सोबतच बायकोचीही … Read more

कर्तव्य-4 अंतिम

मितालीने ठरवलं, आईला याबद्दल सूनवायचं… त्या दिवशी मिताली सासरी जाण्याची तयारी करत होती. आई जवळ बसूनच तिला मदत करत होती. “काय गं? आता सासरी किती दिवस राहणार?” “पंधरा दिवस राहीन..” “कशाला इतकं? त्यापेक्षा इथे थांब अजून काही दिवस… शेवटचे दोन चार दिवस जा..” “का? माझ्या सासू सासऱ्यांना पण आमची सोबत हवीहवीशी वाटते ना..” “सोबत कसली, … Read more

कर्तव्य-3

“काय गं? काय झालं??” “काही नाही…” “मला माहितीये, आई काहीतरी बोलली असणार..हो ना?” “त्या दोघी मायलेकीत वाद नको म्हणून…” “समजलं, नेहमीप्रमाणे मिताली तुझी बाजू घेऊन बोलली असणार आणि तू वाद मिटवला असणार..” “तेच योग्य वाटतं मला..” “स्वतःचा विचार कधी केलाच नाहीस तू…कॅनडाला जायला मी तयार होतो पण तू आई वडिलांकडे बघून मला थांबवलं…आणि तिकडे मी … Read more

कर्तव्य-2

“तिचं कामच आहे ते..” हे वाक्य आपल्या आईकडून मितालीला खूपदा ऐकावं लागे. आई असली तरी आपल्या वहिनी बद्दल तिला थोडंही कौतुक असू नये? हे तिला सतत वाटे. दुपारची वेळ होती. सर्वजण जेवण करून आपापल्या खोलीत गेले. वहिनी आपली किचनमधला पसारा आवरत होती. आई बाहेर गेलीये हे लक्षात येताच मिताली वहिनीकडे गेली. कारण आई घरी असली … Read more

कर्तव्य-1

“आत्या माझ्यासाठी काय आणलं??” कॅनडावरून आलेल्या आत्याभोवती भाच्यांचा गराडा जमला. आज तब्बल 2 वर्षांनी आत्या माहेरी आली होती. घरातले दादा, वहिनी, आई, बाबा डोळ्यात प्राण आणून लेकीची परत यायची वाट बघत होते. चार वर्षांपूर्वी मितालीचं लग्न झालं होतं. मिताली दिसायला सुंदर, शिकलेली..माहेरची परिस्थिती पण बरी होती. त्यांना आशिष रावांचं स्थळ आलं आणि बघताक्षणी होकार दिला … Read more

कुबड्या-3 अंतिम

बाळ मोठं होत होतं. तो चालायला शिकत होता. सासूबाई कायम त्याच्या अवतीभवती असत, त्याला काही लागू नये, तो पडू नये म्हणून. एकदा असंच सासूबाई पोळ्या लाटत असतांना मागून बाळ चालत आलं आणि हळूच पडलं, अगदी जागच्या जागी. आई घाबरल्या, “वृंदा…अगं घे त्याला..माझे हात भरलेत..” वृंदा मागून आली, “थांबा आई, उचलू नका त्याला…तो चार वेळा पडेल … Read more

कुबड्या-2

“सून आणि पोराला जाऊदेत तिकडे, आपलं काय काम? इथे आपली जमीन आहे, मोठा कारभार आहे..तो सोडून कसं जाणार?” “माझं लेकरू एवढ्या मोठ्या शहरात एकटं राहील? नाही…माझ्या नजरेसमोर हवा तो..” आई एक शब्द ऐकायला तयार नव्हत्या. अखेर सासऱ्यांनी हार मानली. सुनबाईने गावातच एका मेस मधून सासऱ्यांच्या दोन वेळची सोय केली आणि तिघेही नागपूरला गेले. वृंदाला सासूबाई … Read more

कुबड्या-1

“आई माझी बदली नागपूरला झालीये..” कैलास काकुळतीला येऊन आईला सांगत होता. त्याची बायको शेजारीच उभी होती. तिला कळेना हे काय चाललंय. बदली झाली म्हणजे कैलासचं प्रमोशन झालं, पगार वाढला. मग ही गोष्ट इतक्या रडकुंडीला येऊन का सांगावी? हे ऐकताच आईला रडू फुटलं. आईने स्वतःला सावरलं आणि म्हणाली, काळजी करू नको, माझं लेकरू एकटं नाही पडणार, … Read more

पाहुणा-3 अंतिम

सासूबाई आणि कावेरीबाई गप्पा मारत असतांना साधना सासूबाईंना सांगायला गेली की इस्त्रीचे टाकलेले कपडे मी आणायला जातेय..सासूबाईंनी मान डोलावली, पण कावेरीबाई त्याच्यावरही काहीतरी बोलणार हे तिला माहीत होतं.. “7 वाजले, आता कुठे बाहेर जातेय? आमच्याकडे सातच्या आत बायका घरात असतात…हे शोभत नाही हं माई तुझ्या सुनेला..” साधनाने हातातली पर्स खाली ठेवली. इतक्यात मोठ्या जाउबाई सुद्धा … Read more

पाहुणा-2

सासूबाई आणि कावेरीबाईंचं बोलणं साधनाच्या कानावर पडलं. त्या दोघी बेडरूममध्ये गप्पा मारत होत्या. साधना किचनमध्ये स्वयंपाकाची तयारी करत होती. तेवढ्यात तिची मोठी जाऊ तिथे आली आणि तिनेही कामाला सुरुवात केली. साधनाला राहवलं नाही, तिने हळू आवाजात भाजी चिरता चिरता मोठ्या जाउबाईंना विचारलं, “काय ओ ताई, या मावशी अश्याच आहेत का??” मोठ्या जावेला हसू आलं, “म्हणजे … Read more

पाहुणा-1

“काय गं? तुझी सून जोडवे नाही घालत??” कावेरीबाई साधनाच्या सासूबाईंना विचारत होत्या. सासूबाईंना एरवी त्याचा काही फरक पडत नव्हता पण कावेरीबाई, म्हणजेच त्यांच्या मोठ्या बहीण असं बोलल्या आणि त्यांनाही कुठेतरी खटकायला लागलं. कावेरीबाई म्हणजे अगदी कडक शिस्तीच्या. स्वतःच्या घरात सून मुलांना त्यांनी असं काही ताब्यात ठेवलं होतं की त्यांच्यासमोर कुणाचं काही चालत नसे. कावेरीबाई आणि … Read more