आईची जागा-2 अंतिम

तिच्या आवडीचा खाऊ बनवला, तिच्या सासूला साडी आणि जावईबापूना कपडे घेतले, लेकीच्या घरी गेले, तिच्या सासूने आनंदाने स्वागत केलं, “स्वाती येईलच थोड्या वेळात.” असं म्हणत तिच्या सासूने स्वाती येईल म्हणून तिच्यासाठीही कॉफी करायला ठेवली, “स्वातीला कॉफी आवडत नाही..” आई म्हणाली, “नाही ओ, उलट कॉफी आवडते..आल्या आल्या तिला कॉफ़ी लागते..” काही वेळाने स्वाती आली, माय लेकींनी … Read more

आईची जागा-1

आयुष्यातली 20-25 वर्षे ती आई वडिलांजवळ राहिलेली,प्रत्येक आईप्रमाणे, तिचीही आई तिची नस अन नस ओळखे,तिला काय आवडतं,काय आवडत नाही,तिला काय चालतं,काय चालत नाही…आईला सगळं माहीत असतं.. एके दिवशी अचानक फोन आला, “स्वातीसाठी उत्तम स्थळ शोधलं आहे, लवकरात लवकर आटोपून घ्या” आईच्या काळजात धस्स झालं, मुलगी सोडून जाणार, तिथे ओळखतील का तिला? समजून घेतील का तिला? … Read more

पक्याची डायरी-3

“काय चाललंय मुलींनो?” तो ओरडला.. “अरे मामा आलाय” हे ऐकताच पक्याने केस नीट केले, आरशात पाहिलं.. बाहेर गेला, मामा बसला होता, तो तिला शोधत होता.. तिच्यावर नजर पडली आणि तो चक्कर यायचाच बाकी होता, गोलमटोल, केसांचा पिंजरा आणि दोन पुढे आलेले दात.. “ही तीच का???” त्याच्या सर्व स्वप्नांवर पाणी फेरलं गेलं.. मामा म्हणाले, “काय पक्या, … Read more

पक्याची डायरी-2

संध्याकाळी सार्वजण जेवायला बसले, ताटात कारले बघून पक्या जेवायला नाटकं करत होता, त्याचे वडील त्याला खूप रागावले, “नुसतं चमचमीत खायची सवय झालीये, ताटात वाढलेलं खा गपचूप” पक्याला राग आला, रागारागतच तो जेवू लागला, आई वडिलांना सांगत होती, “अहो माझा तो भाऊ नाही का, मुंबईला राहतो तो..या शनिवारी तो येणार आहे त्याच्या मुलीला घेऊन” हे ऐकताच … Read more

पक्याची डायरी-1

नवीन काहीतरी खूळ डोक्यात घालून घ्यायचं आणि माती खायची, पक्यासाठी हे नवीन नव्हतं, नववीतला आपला पक्या, मास्तरांनी शाळेत सांगितलं, रोज डायरी लिहायची, त्यातूनच एखाद्या लेखक जन्माला येतो, पक्या इरेला पेटला, दुकानात गेला, एक डायरी मागितली, दुकानदार तीक्ष्ण नजरेने त्याच्याकडे बघत होता, पक्याच्या डोळ्यात वेगळीच चमक दिसत होती, एखादा प्रतिभावंत लेखकाला पुरस्कार मिळाल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर असणारं … Read more

आवाज-3 अंतिम

तिची शेवटची आशा सम्पली, नव्या जोडीदारासोबत नव्याने प्रेम शोधू लागली, प्रेम एकदाच होतं का? माहीत नाही, पण प्रयत्न आपल्या हातात आहेत… लग्न झालं, तिचा जोडीदार, एखाद्या राजकुमाराला शोभेल असा, आणि एखादीच्या स्वप्नातला जोडीदार असेल अगदी तसा.. इतर मुलींना हेवा वाटायचा तिचा, पण जे जवळ असतं त्याची किंमत नसते, पण एखादी गोष्ट लांब असेल तर तिची … Read more

आवाज-2

एका कॅफेमध्ये ओळख झाली होती, ती तिच्या मैत्रिणीची वाट बघत होती, आणि तो त्याच्या मित्राची, एवढ्यात बाहेर धो धो पाऊस कोसळू लागला, दोघांच्या मित्रांनी येणार नाही असं सांगितलं, तिथे ते दोघे, एकटेच आपापल्या टेबलापाशी बसलेले, त्यांच्या नजरा एकमेकांवर खिळल्या, एका नजरेत प्रेम झालं, ओळख झाली, ती वाढली, तो स्वच्छंद, मनमुराद आयुष्याचा आनंद घेणारा, आणि ती … Read more

आवाज-1

तिने गर्दीतही तो आवाज ओळखला आणि ती स्तब्ध झाली, एका संगीताच्या कार्यक्रमात ती आणि तिचा नवरा गेले होते, प्रचंड गर्दी, खुर्च्या अगदी एकमेकांना खेटून लावल्या होत्या, लोकांचा आवाज, प्रचंड वर्दळ.. ती आणि तिचा नवरा शांतपणे बसून कार्यक्रम सुरू होण्याची वाट बघत होते, पण तिने या गर्दीतही एक आवाज ओळखला, ती सुन्न झाली, तोच आवाज, दहा … Read more

मरणयातना-3 अंतिम

राहुल कुमारच्या वागण्याने वडिलांना दुखापत झाली, अपमानास्पद वागणुक मिळाली… पोलीस हसायला लागले, “कुणाविरुद्ध बोलताय? पुरावा आहे का?” “हॉस्पिटलचा सगळा स्टाफ साक्ष देईल..” “ठीक आहे, मग त्यांना घेऊन या..” तिने स्टाफला कळवलं, सर्वजण साक्ष द्यायला तयार झाले, पोलिसांनी दुसऱ्या दिवशी सर्वांना घेऊन यायला सांगितलं, ही कुणकुण राहुल कुमारला लागली, आणि त्याने त्याची पॉवर वापरून प्रकरण दाबण्याचे … Read more

मरणयातना-2

हॉस्पिटलमध्ये सर्वजण तयारीत बसलेले, आत्ता येईल, तेव्हा येईल म्हणत सगळेजण वाट बघत होते, पण सेलिब्रिटी लोकं ती, वेळेवर कसली येतात, राहुल कुमारने दिलेल्या वेळेच्या तब्बल पाच तास उशीर केला, कित्येकांनी तो केव्हाही येऊ शकतो म्हणून जेवण टाळलं, पण पेशंटकडे दुर्लक्ष होणार नाही याचीही पुरेपूर काळजी घेतली, अखेर तो आला,त्याच्याच तोऱ्यात, आजूबाजूला गर्दी बघून त्याने तोंड … Read more

मरणयातना-1

“शीला येतेस ना? राहुल कुमार येईलच आत्ता थोड्यावेळात” वडील आपल्या मुलीला फोन करून सांगत होते, “बाबा लगेच येते..” राहुल कुमार, एक मोठा नट, देशात त्याची प्रचंड लोकप्रियता, त्याची एक झलक बघण्यासाठी लोकं लाईन लावत, आज तो एका हॉस्पिटलला भेट देऊन त्यांना देणगी देणार होता, देणगी कसली, टॅक्स वाचवण्यासाठी काहीतरी उद्योग, त्याच हॉस्पिटलमध्ये तिचे वडील कर्मचारी … Read more

जेव्हा त्या उमगतात-3 अंतिम

दुसऱ्याच दिवशी सासूबाई खूप वेळ झाला तरी उठत नव्हत्या, जे नको होतं तेच झालं, झोपेतच त्यांना एटॅक आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली, ती खूप रडली, कुटुंब पोरकं झालं, तिला त्यांची कमी जास्तच जाणवत होती, काम करतांना मधूनच तिला भास होई त्यांच्या ओरडण्याचा, आज ते ओरडणं, रागावणं तिला हवंहवंसं वाटत होतं, आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झालेली, … Read more

जेव्हा त्या उमगतात-2

मला काय धाड भरलीये? वयानुसार थोडीफार दुखणी लागतातच.. डॉक्टरकडे जायचं म्हटलं की त्यांना राग येई, तात्पुरत्या गोळ्या घेऊन आराम करत, एखाद्या दिवशी तिला खूप जीव लावत, एखाद्या दिवशी झेपणार नाही इतकं काम सांगत, सकाळी ती आज सासूबाईंचा काय मूड असेल या चिंतेतच उठत असे, एके दिवशी कहरच झालं, दिवाळीची खरेदी सुरू होती, मुलगा आई आणि … Read more

जेव्हा त्या उमगतात-1

सुनबाई कसं वाटतंय आता?” सासूबाई सूनबाईच्या डोक्यावर हात ठेवून प्रेमाने विचारत होत्या, तापाने फणफणलेल्या तिला या प्रेमळ शब्दांनी बरं वाटलं, दुसऱ्या दिवशी तिला बरं वाटायला लागलेलं पण अशक्तपणा अजूनही होता, तेवढ्यात सासूबाईंनी आवाज दिला, “लोळत पडणार का आता दिवसभर? चला कामाला या..” तिला हे नवीन नव्हतं, सासूबाईंचा स्वभाव तिच्या आकलनाच्या पलीकडे होता, कधी कधी अश्या … Read more

पट्टी-3 अंतिम

आजवर कधीच त्याने आपला मोबाईल बायकोच्या नजरेस पडू दिला नव्हता, अंघोळ करतानाही सोबत घेऊन जाई, पण तिनेही शिताफीने त्याचा पासवर्ड माहीत करून घेतला होता, आज संधी मिळाली, त्याचा मोबाईल तिच्याकडे होता, तिने पटकन पासवर्ड टाकला आणि सर्व चेक केलं, एकेक गोष्ट बघून तिच्या पायाखालची जमीन सरकत होती, त्याचे आणि मुलींचे चुकीच्या स्थितीतील फोटो, दारू, व्यसनं … Read more

पट्टी-2

एखादी गळाला लागली तर तिला फूस लावून फिरवत असे, तिचा फायदा करून घेत असे, हे सगळं करताना कुणाला समजणार नाही याची पुरेपूर काळजी तो घ्यायचा, आईला वाटायचं मुलगा किती कष्ट करतोय, दिवस दिवस बाहेर असतो, पण बायकोला हळूहळू त्याचं आकलन व्हायला लागलं होतं, तिला त्याची प्रत्येक हालचाल संशयास्पद वाटायची, एकदा त्याच्या बॅगेत महागडी लिपस्टिक तिला … Read more

पट्टी-1

माझा मुलगा असं करूच शकत नाही” वसुधाताई सुनेवर चिडल्या होत्या, मुलाचं बाहेर प्रेमप्रकरण चालू आहे हे सुनेला कळलं तेव्हापासून तिने घरात मोठं आकांडतांडव केलं होतं, वसुधाताई मान्य करायला तयारच नव्हत्या.. त्यांच्या मुलांचं वर्षभरापूर्वीच लग्न झालं होतं, त्यांनी स्वतःच त्यांच्या पसंतीची सून करून आणलेली, मुलाचं लग्न आटोपलं आणि त्या जबाबदारीतुन मोकळ्या झाल्या, त्यांच्या नवऱ्याने 4 वर्षांपूर्वी … Read more

चूक-3 अंतिम

पण या एका मदतीमुळे त्याला खूप दिलासा मिळाला होता, नयना वेळोवेळी येऊन त्यांची काळजी घेत होती, एके दिवशी त्यांनी तिला विचारलं, “बाळा कुठे राहतेस? लग्न झालंय का?” “बाबा मी हॉस्पिटलशेजारीच एक खोली घेऊन राहतेय, दिवसभर हॉस्पिटलमध्ये जातो” “आणि लग्न??” “आयुष्यात एकदाच प्रेम केलेलं बाबा, ते विसरता येणं शक्य नाही..” एवढं बोलून ती पटकन तिथून उठली … Read more

चूक-2

तो धावतच हॉस्पिटलमध्ये गेला, पैसे भरले, जेवणाची वेळ झालेली, आता घरी कधी जाणार, बनवणार केव्हा.. ऐन वेळी कुणी विकतचा डबाही देणार नाही, तो आधी वडिलांकडे गेला, त्याने तिथे वेगळंच चित्र पाहिलं, एक नर्स तिच्या डब्यातलं जेवण वडिलांना भरवत होती, आणि वडिलांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते, त्याला काही कळेना, त्याने जवळ जाऊन पाहिलं आणि त्याच्या अंगावर … Read more

चूक-1

वडिलांना ऍडमिट केलं तेव्हापासून त्याची प्रचंड धावपळ सुरू होती, डॉक्टरांना भेटणं, गोळ्या औषधं आणणं, वडिलांकडे लक्ष देणं, डबा बनवणं, ते खाऊ घालणं, आई बऱ्याच वर्षांपूर्वी सोडून गेलेली, बायको होती, पण अवास्तव अपेक्षा आणि उच्च जीवनमानाची सवय असलेल्या तिला नवऱ्याबरोबर राहायला लाज वाटू लागलेली आणि 2 वर्षांपूर्वीच ती माहेरी जाऊन राहिली, लग्नानंतर 2 वर्षातच घटस्फोटाचे पेपर … Read more