हेतू-1

वृंदा खूप दिवसांनी तिच्या माहेरी आली होती,

नेमकी त्याच वेळी तिची आत्याही घरी आलेली,

दोन्ही माहेरवाशीण बनून आपापलं माहेरपण अनुभवत होत्या,

एवढ्यात वृंदाला सासूबाईंचा फोन आला,

“अगं वृंदा, आपली ताई आलीये घरी…”

वृंदाने काही क्षण विचार केला, आणि म्हणाली,

“अरे वा, ताईंना सांगा जमलं की इकडे भेटायला या मला..”

“बरं..”

असं म्हणत सासूबाईंनी फोन ठेऊन दिला,

त्यांना अपेक्षा होती की नणंदबाई घरी आलीये ऐकल्यावर वहिनी म्हणून वृंदाने तातडीने घरी यावं आणि तिचे लाड करावे..

हे सगळं बोलणं वृंदाची आई ऐकत होती,

आई म्हणाली,

“काय गं? तुझी नणंद आलीये मग जा की सासरी..नंतर वाटल्यास परत ये, इतकं दूर नाही तुझं सासर..”

“नको गं आई..”

आई वृंदाला समजवायला लागली,

“बाळा लग्नाला 6 महिने झालेत आत्ताशी, घरात सर्वांचं मन जिंकायला हवं तू..घरात सर्वांना आपलं बनवायला हवं..”

वृंदा हसली आणि म्हणाली,

“तेच करत होते आई सहा महिन्यांपासून.. “

“मग आता काय झालं?”

“सांगते, मागच्या वेळी नणंदबाई घरी आलेल्या. त्यांना काही खरेदी करायची होती. माझ्या नवऱ्याला खरेदीचा जाम कंटाळा, प्रत्येक ठिकाणी घाई करणार”

“मग त्याचं काय?”

“मग मी नणंदबाईंना म्हटलं की ताई आपण दोघी जाऊयात खरेदीला, मला इथली काही चांगली दुकानं माहितीये तिथे जाऊ..ताई तयार  झाल्या आणि संध्याकाळी निघायचं ठरलं..”

“मग गेला होतात का?”

“संध्याकाळी मी तयार झाले आणि अचानक सासूबाई आणि ताईंचं काहीतरी बोलणं झालं आणि त्या मला म्हणाल्या, तू काही येऊ नकोस, दादा येईल माझ्यासोबत”

“असं अचानक?”

“मलाही कळलं नाही, म्हटलं जाऊद्या…पण जाताना त्यांना मी म्हटलं की मेन रोडला प्रिया नावाचं दुकान आहे तिथून कपडे घेऊ नका…तिथले कपडे मी वापरलेत, सर्वांचा रंग उडतो..”

त्यांनी ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि माझा नवरा आणि ताई खरेदीला गेल्या..

“मग पुढे काय झालं?”
****

3 thoughts on “हेतू-1”

  1. I just discovered this brilliant website, they provide valuable content for customers. The site owner understands how to engage visitors. I’m so happy and hope they maintain their awesome efforts.

    Reply
  2. I’m really impressed with your writing talents as smartly as with the structure for your blog.

    Is that this a paid subject matter or did you modify it yourself?
    Anyway stay up the nice quality writing, it is rare to look a nice blog like this one these days.
    Lemlist!

    Reply

Leave a Comment