जावे त्याच्या वंशा-2 अंतिम

तिने नोकरीवर जायचं,

त्याने हॉटेल सांभाळायचं,

ती सगळं आवरून नोकरीवर गेली,

आधीसारखं काहीच नव्हतं, नवीन मॅनेजर आलेला..

आल्या आल्या त्याने सर्वांना दम दिला,

कामाचा भार उभा केला, एकेकाला डेडलाईन दिली…

ती एका दिवसात वैतागली…

तिकडे तो हॉटेलमध्ये मस्तपैकी बसला होता,

आतले कामगार आले,

“सर माल आणायचं आहे, पण छोटू आज कामावर नाहीये”

“उद्या आना मग..”

“साहेब मग आज ग्राहकांना परत पाठवायचं का? आणावाच लागेल”

त्याने गाडी काढली,

मार्केटमध्ये खूप फिरला,

त्याची दमछाक झाली,

त्यात दिवसभर येणारे ग्राहक, काहीजण हुज्जत घालत,

कमगारांकडे लक्ष ठेवावे लागे,

जरा नजर हटली की ते सुस्त होत…

हिशोब करायला नाकी नऊ येत..

तो एका दिवसात दमला,

दोघेही घरी आले,

एकमेकांच्या डोळ्यात पाहिलं,

काही न बोलता एकमेकांना मिठी मारली,

आपापली कामं परत घेतली,

तेव्हापासून वाद बंद झाला..

म्हणूनच म्हणतात,

“जावे त्याचा वंशा तेव्हा कळे..”

समाप्त

2 thoughts on “जावे त्याच्या वंशा-2 अंतिम”

  1. I loved you better than you would ever be able to express here. The picture is beautiful, and your wording is elegant; nonetheless, you read it in a short amount of time. I believe that you ought to give it another shot in the near future. If you make sure that this trek is safe, I will most likely try to do that again and again.

    Reply

Leave a Comment