स्त्री-1


सुभानरावांना आपल्या मुलीच्या लग्नाची प्रचंड चिंता सतावत होती,

तिच्यात काही दोष होता म्हणून?

नाही,

त्यांची मुलगी केतकी, लहानपणापासून प्रचंड हुशार,

शाळेत कायम अव्वल, बोर्डात पहिली, कॉलेजमध्ये पहिली,

युनिव्हर्सिटी गोल्ड मेडलिस्ट, आणि पोस्ट ग्रॅज्युएशन मध्येही अव्वल,

नोकरीसाठी अनेक कंपन्याकडून तगड्या पॅकेजेसच्या ऑफर्स,

अभ्यासात तर ती हुशार होतीच, पण माणूस म्हणून मॅच्युरिटी जबरदस्त,

एखादा प्रौढ माणूस जसा प्रॅक्टिकल विचार करतो तसं तिचं वागणं आणि बोलणं असायचं,

आता याला दोष तर म्हणता येणार नाही, पण इतकी बुद्धीमत्ता पेलायला तेवढ्याच मॅच्युरिटीचा नवरा हवा ना?

पुरुषी अहंकार, सांसारिक जबाबदारी जर तिच्या कर्तृत्वाच्या आड आली तर?

स्थळ अनेक यायची, श्रीमंत, हुशार मुलं.. पण तिच्या इतकं हुशार नव्हतंच मुळी कुणी,

लोकं सुशिक्षित असली तरी बघायला यायची आणि स्वयंपाक येतो का असं विचारायची,

सुभानरावांच्या पोटात तेव्हाच गोळा यायचा,

एवढ्या बुद्धिमान मुलीला शेवटी किचन आणि स्वयंपाकासाठीच वापरलं गेलं तर?

आज अभिमानाने तिची डिग्री मिरवणारा नवरा उद्या तिच्यासमोर फिका पडतोय लक्षात आल्यावर तिला त्रास दिला तर?

पण देवाला काळजी,

तिला शोभेल असा, रुबाबदार, हुशार आणि समजूतदार नवरा तिला मिळाला, पुरुषी अहंकार न बाळगता केतकीच्या हुशारीला पेलून नेणारा एक मुलगा तिला मिळाला..

तिलाही तो आवडला, थाटामाटात लग्न झालं,

ती सासरी आली,

काही दिवसातच तिला अमेरिकेहून ऑफर आली, तिला कळत नव्हतं त्याचं काय म्हणणं असेल,

त्याला कळलं तेव्हा त्याने तडक विचारलं,

Leave a Comment