नणंद-1

“मेघा असती तर तिने एका दमात सगळं आवरलं असतं…”

सासूबाई आपल्या लहान सुनेसमोर तिला ऐकू जाईल असं पुटपुटत होत्या,

साक्षीचा चेहरा पडला, तिच्याकडून काहीही कमीजास्त झालं की मोठ्या जाउबाईंचं नाव निघे,

साक्षी घरातील लहान सून आणि मेघा घरातली मोठी सून,

लग्न झालं तेव्हापासून मेघा आणि तिचा नवरा फक्त 2 महिने सासरी राहिले, दोन महिन्यात तिच्या नवऱ्याने परदेशात नोकरी शोधली आणि दोघेही तिकडे स्थायिक झाले,

साक्षीच्या नवऱ्यालाही संधी होती पण त्याला कुटुंबासोबत राहायचं होतं, साक्षीला सुद्धा हेच वाटायचं, पैसा…राहणीमान याहीपेक्षा आपली लोकं आपल्यासोबत आहेत हे सुख तिच्यासाठी मोलाचं होतं..

साक्षी लग्न करून आली तशी तिने सगळी जबाबदारी स्वतःवर घेतली.

तिला आधीपासूनच घरकामाची आवड होती, शिक्षण आणि नोकरीत तिला रस नव्हता, नवरा चांगलं कमावून आणे आणि तिच्या हातात तिच्या हक्काचे पैसे देई, त्यामुळे तिला कुठेही असुरक्षितता वाटत नव्हती, अगदी सुखाने सगळं सुरू होतं..

पण जेव्हा जेव्हा सासूबाई मोठ्या सुनेशी फोनवर बोलायच्या तेव्हा मात्र साक्षीची तगमग व्हायची,

इतकी वर्षे सर्वांचं करून कधी कौतुक नाही, आणि जाउबाई फक्त 2 महिने इथे होत्या तर ते दोन महिने सासूबाई चघळत बसतात…

एके दिवशी नेहमीप्रमाणे साक्षीची घरातली कामं आवरणं सुरू होतं. मुलांना शाळेत सोडलं, नवऱ्याला टिफिन दिला, सासू सासऱ्यांना नाष्टा दिला, झाडू मारून झाला आणि आता पुन्हा ती चहा ठेवत होती तोच हॉल मधून सासूबाईंचा बोलतानाचा आवाज ऐकू आला…त्या मोबाईलमध्ये बघून म्हणत होत्या..


1 thought on “नणंद-1”

Leave a Comment