आयुष्याचं वरदान-3

हे सगळं आता का बोलताय पण? काही उपयोग आहे का?”

“माहितीये, काही उपयोग नाही..पण आज किंमत कळतेय तुझी..”

“अशी अचानक?”

“नाही, दुसरं लग्न केलं मी..मान खाली घालुन वावरणारी दहावी पास असलेली, सुरवातीला छान वाटायचं, तुला आयुष्यातून काढलं याचा आनंद व्हायचा..पण हळूहळू एकेक अडचणी येत गेल्या, आर्थिक अडचण येत गेली..त्यात आईचं वागणं..माझी दुसरी बायको तीही तिचे रंग दाखवू लागली..कधी न मिळाल्यासारखी वस्तू मागायची, साड्या, कपडे, दागिने..हे लग्न टिकावं म्हणून मीही ऐकत गेलो..कंगाल होत गेलो..आईचं आणि तिचं भांडण झालं आणि वेगळं राहायला भाग पाडलं तिने..आज आर्थिक, कौटुंबिक आणि सामाजिक संकटांशी लढतोय मी..तू असती तर परिस्थिती वेगळी असती..”

तिने सगळं ऐकलं, ती फक्त हसली आणि म्हणाली..

“देव तुला शक्ती देवो..”

एवढं म्हणून निघाली,

घरी गेली,

आज घर भकास वाटत नव्हतं,

स्वतःबद्दल वेगळाच आदर निर्माण झाला होता,

घरातली प्रत्येक वस्तू तिला नमस्कार करत होती,

आणि तिचं आयुष्य तिला मनोमन धन्यवाद देत होतं..


463 thoughts on “आयुष्याचं वरदान-3”

Leave a Comment