तिला घ्यायला गाडी आली तशी लगबगीने गाडीकडे गेली,
ऑफिसमधून तिला घ्यायला आणि सोडायला गाडी येत असे, मोठ्या पदावर होती ती,
वय पस्तिशीच्या आसपास,
कंपनीत तिचा मोठा रुबाब,
तिने दिलेल्या आयडियाज आणि सल्ले याने कंपनीची आर्थिक बाजू सुधारायला मदत झालेली,
अशी एम्प्लॉयी आपल्याकडेच हवी यासाठी कंपनीने तिला सर्व सुखसुविधा पुरवल्या होत्या,
बघणाऱ्याला तिचं आयुष्य स्वप्नवत वाटे,
पण तेवढं एकच आयुष्य ती जगत होती,
घरी पोचली की फ्लॅटचं ते बंद दार उघडायला तिला नकोसं वाटे,
नवऱ्याशी घटस्फोट घेऊन ती एकटं जगत होती,
तिच्या बरोबरीच्या बायका मुलांच्या शाळा, नवऱ्याचे प्रमोशन, नातेवाईक, लग्नसमारंभ यांच्या चर्चा करत,
हिच्याकडे काहीही नसायचं,
आपण एका वेगळ्याच प्रवाहात आहोत ही जाणीव तिला होती,
पण आधीच्या वाट्याला आलेल्या नरकापेक्षा कितीतरी पटीने हे आयुष्य चांगलं होतं,
पाच वर्षांपूर्वी,
तिनेही लग्न केलेलं, तिनेही संसार थाटलेला,
चार चौघांसारखा,
तिनेही स्वप्न पाहिलेली,
संसाराची आणि तिच्या करियरची सुदधा,
लग्नाआधी नोकरीसाठी सपोर्ट करू वगैरे भ्रामक बाता झाल्या,
हळूहळू समजू लागलं,
बायकांचं काम करणं त्याला आवडत नसे, त्याच्या घरच्यांनाही,
बाई पुरुषाच्या वरचढ हे त्यांना सहनच होऊ शकत नव्हतं,
कारण तिचा पगार वाढलेला, आणि या मुद्द्याला धरून तो तिरक्या मार्गाने कुरबुरी करे..
“स्वयंपाक जमत नाही तुला नीट…घर पण नीट बघत नाही..आधी घर मग बाकीचं..”
सुरवातीला ती तारेवरची कसरत करे, सगळं अगदी परफेक्ट.. घर पण, स्वयंपाक पण आणि ऑफिस पण..
जीवाची तगमग होई,
पण तिला संसार पण अर्धवट सोडायचा नव्हता,
एके दिवशी घरी आली, ऑफिसमधून..
आज समाधानी होती ती,
घरातलंही अगदी वेळेवर झालेलं,
भाग 2
भाग 3