“हे काय? स्क्रीनवर डाग कसले?”
“कणिक मळत होती ना तेव्हाच एक फोन आलेला, कणिक लागलं असेल त्याला”
“नीट सांभाळत जा बाई फोन, फार महागडा आहे”
दोघेही आवरून कार्यक्रमाला निघाले,
“तू घड्याळ का नाही घातलंस?”
“अरे हो, विसरलेच की”
ती घड्याळ घालून आली तसं त्याने घड्याळाकडे दोन तीन वेळा पाहिलं,
तिला रागच आला,
कार्यक्रमात दोघेही जेवायला बसले,
तो सारखा तिला विचारे, “किती वाजले गं?”
“घडयाळ तुमच्याकडेही आहे ना, त्यात बघत जा”
“तुझं smartwatch आहे ना..”
“मग त्यात काही वेगळा टाइम दाखवतो का?”
तो हसायला लागला,
तिला समजलं, टाइम साठी नाही, घड्याळ जागेवर आहे की नाही हे बघायला तो विचारत असायचा..
अजून 3-4 महिने गेले, दिवाळी आली,
दिवाळीच्या खरेदीला दोघेही गेले, तिला एक साडी आवडली, पण त्याला एकही पसंत पडेना,
“काय हो? कशी साडी घेऊ नक्की?”
“तुला इंदोर वरून आणलेली ती करड्या रंगाची साडी आहे ना, तीच खुलून दिसते..”
“मग ती नेसू दिवाळीला परत?”
“ग्रेट आयडिया..”
तिला रागच आला, पण साडी तर ती घेणारच होती, तिला एक आवडली,
“मी अंगावर टाकून बघते, आलेच..”
“तुझा फोन आणि घड्याळ दे माझ्याकडे…साडीच्या नादात येशील हरवून..”
तिने रागाने बघतच त्याच्याकडे फोन आणि घड्याळ दिलं..
दिवसभरात एकदा तरी करड्या रंगाची साडी, घड्याळ आणि फोन याबाबत तो विचारे,
तिला आता नको नको झालं,
कशाला या वस्तू घेतल्या तिलाच वाटू लागलं,
काही दिवसांनी मोठी बहीण आणि दाजी त्यांना भेटायला आले,
दोघांनी मोठी बहीण आणि दाजींना शहर दाखवायला नेलं,
तिथे जवळच एक exhibition होतं, सर्वजण तिथे गेले,
लहान बहिणीचा नवरा म्हणाला,
“ए ही पर्स किती छान आहे, घे की तुला”
“महाग आहे हो”
“मी आहे ना, कशाला काळजी करतेस…घे चल..”
लहान बहिणीचा नवरा पैसे काढत असतांना तिच्या पोटात गोळाच आला, मागचे काही महिने सरसर डोळ्यासमोरुन गेले,
करड्या रंगाची साडी, आयफोन आणि घड्याळ तिच्या डोळ्यासमोर नाचू लागले आणि ती जिवाच्या आकांताने ओरडली,
“नाही…..”
आसपासचे सर्वजण तिच्याकडे पाहू लागले,
तिच्या नवऱ्याने पैसे परत पाकिटात ठेवले,
“नको तर नको, ओरडते कशाला..”
मोठ्या बहिणीने हसू दाबलं, आणि म्हणाली,
“अगं जीजू एवढा आग्रह करताय तर घे की..”
लहान बहिणीने तिच्याकडे पाहिलं,
आणि हात जोडले,
“ताईसाहेब, आत्ता कळलं…”
समाप्त
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.