समजलं?-2

“मग? आर्थिक अडचण आहे का?”

“अजिबात नाही”

“मग?”

“हे बघ, दर महिन्याला हे मला खर्चाला पैसे देतात, त्यातून जे उरतात त्याची मी खरेदी करून घेते”

“अगं पण जीजू घेऊन देत होते ना? मग नाही का म्हणालीस?”

“नाही आवडत मला”

“स्वाभिमान होय, पण हे ठीक नाही..म्हणजे बघ, तू घरातलं सगळं बघते, सर्वांचे डबे, येणं जाणं, नातेवाईक… त्या बदल्यात जिजूंनी तुला काही घेतलं तर स्वाभिमान कसला त्यात? निव्वळ व्यवहार समज की”

मोठी बहीण हसायला लागली,

“तुझं आत्ताच लग्न झालंय ना, समजेल तुला..”

मोठी बहीण परत हसली, लहान बहिणीला काही कळेना..तिने विषय बदलला,

“आमच्या यांनी मला एक करड्या रंगाची साडी आणलीय इंदोर वरून, इतकी सुंदर आहे ना..थांब तुला फोटो दाखवते”

“अय्या, खरंच सुंदर आहे गं, अशी साडी मिळत नाही शक्यतो”

“हो ना? आणि हे बघ, मला आयफोन घेऊन दिला, हे smartwatch घेऊन दिलं..”

“बापरे, चांगलंच महागडं दिसतंय”

“हो ना..फार करतात हे माझ्यासाठी”

मोठी बहीण मनातल्या मनात हसली..

लहान बहीण चार दिवस राहून आपल्या सासरी परतली, जाताना ताई आणि जिजूंनी भरपूर वस्तू देऊन तिची बोळवण केली..

लहान बहिणीच्या सासरी मोठं कुटुंब, सुशिक्षित आणि तेवढंच मॉडर्न,

नातेवाईकांचे सतत येणं जाणं सुरू असायचं, दोघं नवरा बायकोला अनेक कार्यक्रमांना हजेरी लावावी लागायची, 2 दिवस झाले की आला एखादा कार्यक्रम..

अश्याच एका कार्यक्रमात जायचं होतं, लहान बहीण कपाटाकडे बघत उभी होती, नवरा म्हणाला, “काय गं, काय बघतेय?”

“साडी कोणती नेसू? सगळ्या नेसून झाल्या आहेत”

“इंदोर वरून आणलेली ती करड्या रंगाची नेस की”

“मागच्या कार्यक्रमाला तीच तर नेसलेली”

“मग काय होतं? परत नेस.. इतकी महागडी साडी आणलीय तर वापर की”

“बरं.. लहान बहिणीने नाक मुरडतच ती साडी नेसली”

“तुझा फोन कुठेय?”

“असेल किचनमध्ये”

“किचनमध्ये? अगं अशी वेंधळ्यासारखी कुठेही फोन नको ठेवत जाऊ, किती महागडा आहे तो..”

लहान बहीण फोन घेऊन आली,


29 thoughts on “समजलं?-2”

  1. can i order cheap clomid without a prescription generic clomid for sale order generic clomid online can you get cheap clomid pills can you buy generic clomiphene without a prescription where can i get generic clomiphene without dr prescription how to get generic clomiphene tablets

    Reply

Leave a Comment