लोका सांगे ब्रह्मज्ञान-3 अंतिम

मागच्या पुढच्या सर्व कुरापती काढून तिने त्याला सुनावलं, तो गप्प झाला…

ट्रिपच्या 4 दिवस आधी तो एक जुना अलबम काढून तिच्याजवळ बसला,

तिला सांगू लागला,

“हे बघ, मी लहान होतो तेव्हा आई कशी मांडीवर घेऊन बसायची मला..”माझ्यावर खूप जीव तिचा..मी आजारी पडलो तेव्हा सैरभैर व्हायची”

नवऱ्याला हे सगळं आत्ता का आठवतंय तिला कळेना..

मग तो हळूच म्हणाला,

“ज्या आईने माझ्यासाठी एवढा त्याग केला तिला एकटं सोडणार तू???”

ती त्याच्याकडे बघतच राहिली,

त्वेषाने उठून उभी राहिली आणि म्हणाली,

“अगदी बरोबर…आईची सेवा केलीच पाहिजे…पण त्यांच्या बाळाने…तुमचं ते प्राथमिक कर्तव्य नाही का? तुम्हा माणसांना आईची सेवा करायची असते..पण बायकोच्या जीवावर..

नातेवाईकांच्या पंगती उठवायच्या असतात- बायकोच्या जीवावर

बहिणीचे लाड पुरवायचे असतात- बायकोच्या जीवावर..

चार लोकांत मोठायकी करायची असते- बायकोच्या जीवावर..

अहो स्वतःहुन कधीतरी काहीतरी करत जा ना? आईचा एवढा पुळका आलाय ना? सांगा बरं मग त्यांचं काय दुखतंय? कसला त्रास आहे त्यांना? ट्रीटमेंट कुठे सुरू होती??

त्याच्याकडे उत्तर नव्हतं,

“नाही माहीत ना? स्वतः मातृप्रेम बाळगा आधी मग बायकोला शिकवायला या..”

“अगं पण माझी आई ही तुझ्या आईसारखीच ना? तुझ्या आईसमान आहे ना ती..”

“मोठ्या प्रेमाने, आपुलकीने त्यांचं सर्वकाही केलं असतं मी
…पण मी त्यांना आई मानावं अशी वागणूक आजवर एकदाही त्यांनी दिलेली नाही…दिलाय तो केवळ त्रास, अतोनात छळ..त्यामुळे त्यांच्याबद्दल मला प्रेम निर्माण होईल अशी आशा बाळगू नका…आजवर त्यांच्यामुळे आपण कधी बाहेर गेलो नाही की कधी एकत्र फिरलो नाही…मी चार दिवसांनी जातेय ट्रीपला..तुम्हाला मला थांबवण्याचा अधिकार कुणीही दिलेला नाहीये त्यामुळे चुपचाप आईकडे जा आणि त्यांची सेवा करा..”

ती बोललेलं सगळं खरं होतं, त्यामुळे तो निरुत्तर झाला,

इतक्या दिवसांचं साचलेलं तिने आज बाहेर काढलं आणि तिने मोकळा श्वास घेतला , छानपैकी ट्रिप करून आली..

घरी आल्यावर सासूबाई दिसत नव्हत्या,

नवरा म्हणाला,

“गावी सोडलं मी तिला..”

एक कटाक्ष टाकत ती म्हणाली,

“लोका सांगे ब्रह्मज्ञान…”

समाप्त

2 thoughts on “लोका सांगे ब्रह्मज्ञान-3 अंतिम”

Leave a Comment