“या गोष्टी तू स्वतःहून करायला हव्यात, सांगायची गरज का पडते दरवेळी?”
“कुठल्या गोष्टीबद्दल म्हणताय?”
“आईला बरं नव्हतं माझ्या, झोपून होती ती..”
“मग? त्यांना बरं नाही म्हणून मी ऑफिसला सुट्टी टाकली, घरातलं सगळं पाहिलं, त्यांना दवाखान्यात नेलं, औषधं दिली…मग कसाकाय असं म्हणतोय?”
“तेवढंच पुरेसं नाही”
“मग? अजून काय करायला हवं होतं?”
“आईच्या उशाशी बसून राहायला हवं होतं तू.”
“काय? उशाशी? आणि मग घरातलं कुणी आवरलं असतं?”
“ते काही माहीत नाही, पण तू घरातली कामं आवरायलाही किती वेळ लावलास”
“एक मिनिट, तू तर घरी नव्हतास, मग तुला काय माहीत हे सगळं?”
त्याच्याकडे उत्तर नव्हतं पण तिला समजलेलं, सासूबाईंनी एवढं सगळं करूनही नवऱ्याला एकूणएक गोष्ट, तीही एवढ्या आजारी असताना सांगितली.
तिने एक दिर्घश्वास घेतला आणि मनातल्या मनात म्हणाली,
“हे लोकं सुधारणार नाहीत”
दामिनी एक उच्चशिक्षित मुलगी, तिच्या हुशारीच्या जोरावर एका संशोधन केंद्रात ती संशोधक म्हणून कामाला होती, वेगवेगळे मशीन डिजाईन करणे आणि त्या प्रत्यक्षात आणणे हे तिचं काम.
भाग 2
भाग 3