“काय पातक केलं होतं गेल्या जन्मी, ही पोर डोईजड व्हायला लागलीये आता”
आई वडिलांचं वाक्य तिने दारामागून ऐकलं आणि तिला चक्कर यायचीच बाकी राहिली होती. अखेर तिने नाईलाजाने कार्तिकशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
क्रांती, एक शिकलेली, हुशार आणि प्रेमळ स्वभावाची मुलगी. दिसायला सुंदर,
एक महिन्यापूर्वी,
नुकताच तिचा साखरपुडा झाला होता, तोही तिच्या आवडीच्या मुलाशी. मुलगा सुद्धा श्रीमंत आणि देखणा. तिच्याच कोलेजमधला, घरच्यांना पैसा बघून नकार देण्याचं काही कारण नव्हतंच. छानपैकी साखरपुडा आटोपला होता अन लग्नाची तयारी सुरू होती.
“आज पेपर आला नाही अजून?”
“अहो आता लग्नाची तयारी सोडून कुठे पेपर वाचत बसताय..”
“सकाळी सकाळी काय लग्नाची तयारी करणार? आणि अजून अवकाश आहे लग्नाला..”
“लग्नाची तयारी अशी एका दिवसात होत नाही..जाऊद्या, तुम्हाला सांगून उपयोग नाही, मलाच सगळं करावं लागतं” – क्रांतीची आई..
तेवढ्यात कार्तिक, त्यांचा पेपरवाला..धावत पेपर घेऊन आला आणि त्याने मोठ्याने आरोळी ठोकली..
“पेपर…”
आवाज ऐकताच वडील लगबगीने दारात गेले,
“काय रे? इतका उशीर??”
“सॉरी काका, रात्री जागरण झालेलं स्टडी करत करत”
असं म्हणत तो निघून गेला, वडील हसू लागले,
“साधा पेपर वाला, अन काय एकेक इंग्रजी शब्द फेकतो”
भाग 2
https://irablogging.in/%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%a4%e0%a4%be-2/