तळतळाट-2

पण फारसं बोलता येईना..

संसार करत होती दोघे,

हळूहळू मुलं झाली, व्याप वाढला,

पण पैसा कमी पडू लागला,

तिकडे सुधीर आणि त्याची बायको ऐशोआरामात जगत होते,

एके दिवशी प्रशांतने घरी सांगितलं,

मी सरकारी नोकरी सोडतोय,

व्यवसाय सुरू करतोय,

कुटुंबाची हेळसांड होणार नाही याची काळजी घेईन,

सर्वांना धक्का बसला,

सरकारी नोकरीत भागत होतं त्यांचं,

आता तीही सोडायची म्हणतोय,

प्रशांतची बायको खूप भांडली,

नको ते बोलली,

पण तो ठाम होता,

कुटुंबासाठी त्याने बरीच सेविंग केली असल्याने व्यवसायात नुकसान झाले तरी पुढील काही वर्षे कसलीही अडचण येणार नव्हती,

प्रशांत च्या बायकोने त्याला सगळ्या पद्धतीने समजावलं,

सोडून जायची धमकीही दिली,

पण तो आपल्या मतावर ठाम होता,

त्याकाळी ती तरी त्याला सोडून कुठे जाणार?

पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून होती,

नुसती ती नाही, तर तिची मुलं सुद्धा…

कुढत कुढत आयुष्य जगत होती,

आपल्या वाट्याला हा माणूस आला अन बरबाद झालो हेच तिच्या डोक्यात असायचं,

त्यांनी शहर सोडलं,

दुसऱ्या शहरात आले,

प्रशांतचा व्यवसाय सुरू झाला,

अडचणी आल्या,

सुरवातीला नुकसान झालं,

पण प्रशांत जीव तोडून मेहनत करत होता,

रात्र रात्र जागून काम करायचा,

हळूहळू जम बसू लागला,

दिवस बदलत गेले,

पैसा येऊ लागला,

पण प्रशांत ची बायको काही समाधानी नव्हती,

जे मिळतंय ते खूप उशिरा मिळालं, लवकर मिळायला हवं होतं हेच ती समजायची,


Leave a Comment