जावे त्याच्या वंशा-1

माया आणि नीरज एकाच कंपनीत कामाला,

दोघेही सॉफ्टवेअर इंजिनिअर, दोघेही एकाच डिपार्टमेंटला,

मतं जुळली, विचार जुळले आणि मनही जुळले,

प्रेम जुळलं आणि लग्न झालं…

संसाराला सुरवात झाली,

तिला स्वतःचं घर सजवण्यात, मांडण्यात भारी आनंद..

नोकरी नकोशी वाटू लागली,

तो म्हणाला नोकरी नाही तर दुसरं काहीतरी कर, अशी स्वस्थ बसू नकोस,

तिच्या हाताला भारी चव होती,

तिने दाबेलीचं एक छोटंसं शॉप टाकलं,

स्वतः दाबेली बनवायची, कामाची लाज नव्हती तिला…

हळूहळू त्याचं रूपांतर हॉटेलमध्ये केलं,

कामं वाढली, व्याप वाढला…

दोघेही आपापल्या कामात व्यस्त असायचे,

पैसा भरपूर येत होता,

तक्रारी सुरू झाल्या,

“तुला माझ्यासाठी वेळच नसतो” ती म्हणायची…

“मला कामाचं कमी टेन्शन असतं का?” तो म्हणायचा..

हळूहळू वाद होऊ लागले,

“मीही तुझ्या ठिकाणीच नोकरी करायचे बरं का, मला नको सांगू कामाचा व्याप असतो म्हणून..”

“मीही हॉटेल सांभाळलं आहे बरं का तू नसतांना, नको सांगू की तुलाही खूप कामं असतात..”

दोघांना वाटे की समोरच्याला काही टेन्शन नाही,

एके दिवशी वाद विकोपाला गेला,

तडकाफडकी निर्णय घेण्याआधी त्यांनी ठरवलं,

कामाची अदलाबदल करायची,
*****


Leave a Comment