कुबड्या-2

“सून आणि पोराला जाऊदेत तिकडे, आपलं काय काम? इथे आपली जमीन आहे, मोठा कारभार आहे..तो सोडून कसं जाणार?”

“माझं लेकरू एवढ्या मोठ्या शहरात एकटं राहील? नाही…माझ्या नजरेसमोर हवा तो..”

आई एक शब्द ऐकायला तयार नव्हत्या. अखेर सासऱ्यांनी हार मानली. सुनबाईने गावातच एका मेस मधून सासऱ्यांच्या दोन वेळची सोय केली आणि तिघेही नागपूरला गेले.

वृंदाला सासूबाई सोबत असल्याचा मोठा आधार होता, त्यांची अडचण तिला कधीच जाणवली नाही. पण नवऱ्याचं असं आईवर अवलंबून राहणं, कुठलीही जबाबदारी अंगावर घ्यायला घाबरणं, एकट्याने निर्णय घेणं जमतच नसायचं. हे त्याच्यासाठी घातक आहे हे तिला समजत होतं.

एके दिवशी नवऱ्याला तिने याबद्दल समजावलं,

“हे बघा, आई आपल्यासोबत आहेत याचा आनंद आहेच पण प्रत्येक गोष्टीत त्यांच्यावर अवलंबून राहणं योग्य नाही. तुम्ही अगदी भाजीपाला आणायचा झाला तरी आईंना विचारता, ऑफिसमध्ये कोणते कपडे घालू हेही विचारता…स्वतः स्वतःचे निर्णय या वयात कुणीही घेतं, तुम्ही मात्र …”

“तुला आईची अडचण होतेय वाटतं..”

“असं वाटुच कसं शकतं तुम्हाला? मुद्दा तो नाही, मुद्दा हा आहे की तुम्ही स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिकावं एवढीच माझी ईच्छा आहे.”

कैलासला मात्र ते कधीच पटत नव्हतं. एक तर प्रत्येक गोष्टीवर तो आईवर अवलंबून असायचा. त्यात आईसुद्धा त्याला खतपाणी घालायची.

ऑफिसमध्ये जाण्यापासून ते येईपर्यंत त्याच्या मागे, त्याच्या हातात सगळं देत. ऑफिसमध्ये सुद्धा दोन वेळा फोन करून चौकशी. हे अति व्हायला लागलं.

घरात वाद नको म्हणून वृंदाने परत हा विषय काढला नाही. तिकडे सासऱ्यांचे हाल व्हायचे, पण आई तिकडे जायला तयारच नव्हत्या.

वर्षभरात वृंदाला दिवस गेले. तिने एक गोंडस मुलाला जन्म दिला. घरात आनंदीआनंद होता. सासूबाई वृंदाला एक काम करू देत नसत. घरातलं सगळं आवरून आणखी बाळाला सुद्धा सांभाळत. वृंदाला मोठा आधार होता त्यांचा.

तीसुद्धा आता सासूबाईंवर अवलंबून राहायला लागली. सासूबाई दोन दिवस गावी गेल्या तेव्हा मात्र तिची चांगलीच तारांबळ उडाली. तेव्हा तिच्या लक्षात आलं की जी चूक नवरा करतोय तीच आपणही करतोय. सासूबाईंवर अवलंबून राहून स्वतःला जबाबदारीपासून दूर लोटू पाहतोय.

426 thoughts on “कुबड्या-2”

  1. Эта статья предлагает живое освещение актуальной темы с множеством интересных фактов. Мы рассмотрим ключевые моменты, которые делают данную тему важной и актуальной. Подготовьтесь к насыщенному путешествию по неизвестным аспектам и узнайте больше о значимых событиях.
    Получить больше информации – https://vyvod-iz-zapoya-1.ru/

    Reply

Leave a Comment