पावसाचा जोर केव्हाच ओसरला होता. सकाळी अचानक धो धो बरसलेला आता अगदी शांत झाला होता. श्रावणातला पाऊस का असतो असा? मानवी मनाचा थांग लागत नाही, तसेच या श्रावणाचे. कधी बरसेल तर एकदम बेभान होऊन आणि मग अचानक निघून जाईल मागे केवळ कोरडेपण झाकाळणारा ओल ठेवून!अंगावरची एकेक आभूषणं काढून चंपा बिछान्यावर ठेवत होती. गळ्यातील जाडसर कंठमाळ, कानातील झुमके, नाकातील चमकी अन् शेवटी कपाळीची टिकली..नुकत्याच ओसरलेल्या पावसासारखा तिने बाजूला सारलेला तिचा शृंगार! स्वतःला आरशात बघून तिच्या ओठावर एक खिन्न हसू उमटले.
‘या श्रावणसरी आणि मी.. आम्ही दोघीही सारख्याच का? एका नाण्याच्या दोन बाजू म्हणतात, तश्याच.’ तिने नजर आरश्यातील तिच्या प्रतिबिंबावर रोखली.
गोऱ्यापान चेहऱ्यावर शोभून दिसणारे ते काळेभोर टपोरे डोळे अन् काठावर जमा झालेला मोत्याएवढा थेंब.‘श्श.. पाऊस सरलाय रे. आता तुलाही बाहेर यायची मुभा नाही.’ डोळे मिटून तिने त्या थेंबाला आतल्या आत गुडूप करून टाकले आणि एक दीर्घ श्वास घेऊन तिची किलकिली नजर परत डोळ्यांवर रोखली.भूतकाळातील एक गोड आठवण जागी झाली होती…ए रत्ना, खरं खरं सांग. तुला मी आवडतो ना?” एक झुळझुळत्या झऱ्यासारखा आल्हाददायक आवाज कानी पडताच ती झपझप पाऊल टाकत ती पुढे निघाली होती.“रत्नाऽऽ, अगं ए, थांब ना.” तिच्या वेगवान पावलांशी बरोबरी करायला तो जरासा धावतच तिच्यामागे गेला.“मी का थांबू? तू मग मला काहीही विचारतोस.” ती पुढे जायला निघाली तसे त्याने तिची वाट अडवली.
“काही कुठे विचारतोय? जे मला ऐकू येतंय तेच तर विचारलं.” मिश्किल हसत तो.“खोटं! मी काहीच न बोलता तुला कसं ऐकू आलं?” टपोरे डोळे त्याच्यावर रोखत तिने विचारले.“तुला कशाला गं बोलायला पाहिजे? तुझे हे डोळेच बोलतात की. तेच मला सांगत असतात की रत्नाला मी आवडतो म्हणून. किती गं तुझे बोलके डोळे? तुझ्या मनातलं सारं सारं तिथे उमटतं आणि मग तू काही न सांगताच मला सारं कळतं.” तिच्या डोळ्यात बघत प्रकाश बोलत होता आणि ती वेंधळी काही न कळून डोळे अगदी गच्च मिटून उभी राहिली.‘बोलके डोळे!श्श्या! असं काही असतं का? डोळ्यांना बोलायचं काम असतं तर मग देवाने तोंड कशाला दिलं असतं? याचं आपलं काहीतरीच.’“वेडाबाई.” तिच्या डोक्यावर एक टपली मारून तो पुढे निघून गेला तशी भानावर येत तिने डोळे उघडले.धावत जाऊन तिने बांधावरच्या झोपडीचे दार झटक्याने उघडले आणि एका कोनाड्यात ठेवलेल्या तळहाताएवढया आरशात नजर किलकिली करून स्वतःच्या डोळ्यांचा वेध घेऊ लागली.“खरंच का माझे डोळे बोलके आहेत?”निरागस मनाने तेव्हा स्वतःला विचारलेला प्रश्न आजही चंपाच्या कानात ऐकू येत होता. ड्रेसिंग टेबलचा तो भलामोठा आरसा आणि त्यातल्या डोकावणाऱ्या प्रतिबिंबातील डोळ्यात उत्तर शोधण्याचा तिचा केव्हाचा प्रयत्न सुरु होता!त्याचे उत्तर तिला आजही मिळाले नव्हते.. तेव्हासारखेच.
एक उसासा टाकून तिने तिच्या मोकळ्या केशसंभारात माळलेला गजरा काढून हातात घेतला. विरत चाललेल्या मोगऱ्याचा सुगंध अजूनही दरवळत होता. तशीही ती केसात कायम गजरा माळायची; पण या गजऱ्याची बात काही औरच होती. तो गजरा आदीने आणलेला होता.दोन वर्षांपासूनचा त्याचा तो शिरस्ता होता. पैशांच्या गठ्ठीबरोबरच सोबतीला गजऱ्याचा पुडका असायचा. तिने तो माळावा म्हणून हट्ट नाही की स्वीकारावा याचा तगादा नाही. तो केवळ जाताना तेवढा तो पुडका बिछान्यावर ठेवून जायचा.आजही त्याने तेच केले होते आणि तो गेल्यावर तिने त्या मोगऱ्याचा सुगंध नासिकेत भरून घेत गजरा केसात माळला होता.‘वेडाच आहे आदी! का वागतो हा असं? इथे येऊ नकोस असं सांगूनही का ऐकत नसावा हा?’ मोगऱ्याचा सुगंध पुन्हा एकदा साठवून घेत तिने स्वतःलाच प्रश्न केला.“का वागतोस असं?” तिने दरवेळीप्रमाणे आजही त्याला प्रश्न केला होताच ना.त्यानेही त्याचे ठरलेले उत्तर तिला दिले होते.काय तर म्हणे, “ तुमच्या सौंदर्याने मला पार झपाटून टाकलेय. हे सौंदर्य केवळ डोळ्यांनी अनुभवायचे असते. आपल्या स्पर्शाने गढूळ करायचे नसते.”त्याचे उत्तर आठवून तिचे ओठ हलले. गुलाबी ओठाआड दडलेली शुभ्र दंतपंक्ती क्षणभरासाठी चमकून गेली.
‘वेडा आहे हा मुलगा.. अगदी प्रकाशसारखाच. तोही तर असाच होता. कायम माझ्या अवतीभोवती वावरणारा पण स्वतःच्या हद्दीत असणारा. आदीला पाहिलं की आठवणीतील प्रकाश पुन्हा जास्तचआठवतो.’ स्वतःशी हितगुज करत तिने हातातील गजरा बाजूच्या टेबलवर ठेवला.“..त्या धनराज सेठचा छोकरा आला की तुझ्या प्रकाशची आठवण येते मला.” शीलाआँटी म्हणत होती ते कुठे खोटं आहे? एकदोनदा भेटलेल्या प्रकाश आजही शीलाआँटीच्या लक्षात आहे, मग तिच्या हृदयात कायमचा असलेला तो.. ती त्याला कसे विसरू शकत होती?तिच्या काळजात एकदम चर्र झाले. तिला तिच्या प्रकाशला कधी विसरायचे नव्हतेच. उलट त्याच्यासोबतची प्रत्येक आठवण आजही मनात तशीच साठलेली होती; जशी ती घटना घडली, अगदी तशीच्या तशी.त्या दोघांनी एकत्र केलेला अभ्यास, त्याने तिच्या काढलेल्या खोड्या, कधी लुटपटीची भांडणं आणि कधी उगाच एकमेकांना मनवणं.. सारं आजही तसंच तर मनात साठलं होतं अगदी आत्ताआत्ताच घडल्याप्रमाणे!दोघांनी एकत्र मिळून पाहिलेले डॉक्टरकीचे स्वप्न, त्याचा एमबीबीएसला लागलेला नंबर, त्यानंतरची ती काजुकतली. पुन्हा एकदा श्रावणातील चिंब थरथर.. त्याची ओलेती मिठी आणि तिचा शहारलेला स्वर!आजही सारे तेवढेच स्पष्ट आठवत होते आणि मग आठवत होती तिचे आयुष्य बदलणारी ती रात्र! जी आठवण तिला कायम पुसून टाकायची होती ती आठवण मात्र तिला नको असतानाही नजरेसमोर उभी होती.डोळे गच्च मिटून घेत तिने तिचे ओठ घट्ट दाबून घेतले. हाताच्या मुठी आपोआप आवळल्या गेल्या. अंग थरथरून हलायला लागले.“स्सऽऽ”एक वेदनेचा हुंकार बाहेर पडला. दात घट्ट रुतल्यामुळे ओठाला जखम झाली होती आणि त्यातून रक्त बाहेर पडले होते.मिटलेल्या डोळ्यातून गालावर पाण्याचे थेंब ओघळले. आवळलेल्या मुठी जराश्या सैल झाल्या. थरथरणाऱ्या अंगावर घामाचे थेंब उमटले.तिच्या घशाला कोरड पडली होती. पापण्या हलवून तिने बाजूला असलेली पाण्याची बाटली ओठाला लावली.“रत्नेऽ, तू ती प्रकाशची रत्ना नाहीयेस आता. चंपा आहेस तू. शीलाआँटीच्या कोठीवरची चंपा.” आरशातील स्वतःचा चेहरा न्याहळत ती स्वतःची समजूत घालत होती.स्वतःच्या देहावरून एक घृणपूर्ण नजर टाकून तिने तिचे हात झटकले. आता स्वतःबद्द्दल किळस दाटून आली होती.कशीबशी ती न्हाणीघरात जाऊन पोहचली आणि तिथल्या शॉवरच्या पाण्यात स्वतःला स्वाधीन केले.केसावरून निथळणारे पाण्याचे थेंब चेहऱ्यावरून खाली ओघळत होते आणि अखेर तिचा बांध फुटला. इतक्या दिवसापासून ठसठसणारी जखम आज आणखी चिघळली होती.कितीतरी वेळ शॉवरखाली ती स्वतःला शुद्ध करण्याचा प्रयत्न करत होती. जेव्हा ती थकली तेव्हा जड अंतःकरणाने उठून तिने अंगावरचे ओले वस्त्र बाजूला केले आणि स्वतःला कोरडे करून टॉवेल अंगाला गुंडाळून ती तिच्या कपाटासमोर उभी राहिली.पांढऱ्या साड्यांनी खचाखच भरलेले तिचे कपाट तिला खुणावत होते. कॉटन, सिल्क, खादी, शिफॉन.. कितीतरी उंची साडया रचून ठेवल्या होत्या. तिने त्या साडयातून हवी असलेली साडी बाहेर काढली. केव्हाची जपून ठेवलेली काळ्या रंगाच्या साडीला सोनेरी कठ असलेली.जणू ती साडी म्हणजे तिच्या काळ्या आयुष्याचे प्रतिक होती आणि सोनेरी काठ म्हणजे या काळ्या जगातून बाहेर पडण्याचा मार्ग!काळ्या साडीत तिचे साधे ओलेते रूप अधिकच सुंदर दिसत होते. अंगावरची काळी साडी. ओलसर केसातून खांद्यावर विसावलेले थेंब..तिला पुन्हा हिरवेवाडीच्या आठवणीत घेऊन गेले.साऱ्या आठवणीतील ती पहिली आठवण.. प्रकाशच्या भेटीची. श्रावणातील त्या रात्रीच्या पावसाचे ते रौद्ररूप.. गौरीने भूत म्हणून ठोकलेली आरोळी..हिरवेपाटलांच्या वाड्याच्या दाराबाहेर मुसळधार पावसात चिंब भिजलेली, काळ्या रंगाच्या चोळी परकरमधील सात-आठ वर्षांची ती कोवळी पोर आणि दाराच्या आतअसलेला दहा वर्षांचा तो हळवा जीव!:क्रमश:पुढील भाग लवकरच.©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)*साहित्यचोरी गुन्हा आहे.******
Good day! Do you know if they make any plugins to help with Search Engine Optimization? I’m trying
to get my blog to rank for some targeted keywords but I’m not
seeing very good gains. If you know of any please share.
Many thanks! You can read similar blog here: Sklep internetowy
It’s very interesting! If you need help, look here: ARA Agency
Howdy! Do you know if they make any plugins to assist with Search Engine
Optimization? I’m trying to get my blog to rank for some targeted keywords but I’m
not seeing very good success. If you know of any please share.
Cheers! I saw similar art here: Link Building
Wow, wonderful weblog layout! How lengthy have you ever been running a blog for?
you made blogging look easy. The whole glance of your site is great, let alone the
content material! You can see similar here dobry sklep
Wow, awesome weblog format!
How lengthy have you ever been blogging for? you make running a blog glance easy.
The whole look of your web site is excellent, let alone the content material!
You can read similar here prev next and that was wrote by Antionette80.
Wow, amazing blog layout!
How lengthy have you ever been running a blog for? you make running a blog look easy.
The entire look of your site is excellent, as smartly as the content!
You can see similar here prev next and
that was wrote by Kip88.
Good day! Do you know if they make any plugins to help with SEO?
I’m trying to get my site to rank for some targeted keywords but I’m not seeing very good success.
If you know of any please share. Thanks! You can read
similar text here: Where to escape room